*....सपंर्क....*
आज मी सकाळी कांही कामा निमीत्य घरातुन बँकत जान्यासाठी निघालो.पण मना भितिचे काहुर होते.कोन भेटेल भेटलेतर कोनी ओळखना गेलेतर बरे ओळखुन रामराम त्यांनी केलातर लांब उभे राहुन रामराम केल्या नंतर जवळ येउन बोलायला त्यांनी सुरुवात केली तर मी मागे सरकुन बोलावे म्हणले तर हे सगळ मनात घोळत होते.मनात येवढी भिती सर्व या कोरोना मुळे सर्वाना वाटत आसताना देखील काही महाभाग मुदाम जवळ येतील मी सुरक्षित तर घर सुरक्षित. घर सुरक्षित तर गली सुरक्षित. गली सुरक्षित तर गाव सुरक्षित .गाव सुरक्षित तर तालुका,जिल्हा ,देश सुरक्षित .वाटत होते पण या विचारात बँके जवळ केंव्हा पोहचलो ते मला सुधा कळले नाही पाहातो तर बँकेच्या समोर लोकाचा गोध़ळ पांगविताना पोलीस केव्हा माझे जवळ पोहचला मला कळलेच नाही.ये मामा मी मानुस बोलतय पोलीस नाही मला पोलीस बनन्यास भाग पाडु नका नाहीतर मला दंडुका दाखवावा लागेल .हे सर्व बघुन बँकेतुन रुपय काढावे का काढना गेले तर घरी किराना साहीत्य कसे न्यावे घरचे लेकरे उपवासी राहातील.कोरोनामुळे भिती होतिच तरी ही आंतर ठेउन लाईनीत बँकेत पोहचलो कँशियर कडुन रुपय घेऊन कसा बसा बाहेर पडलो .रामराम साहेब तुमच्या मुळे मला माझे घर चालवण्या साठी मोदिजीनी शेतकऱ्यासाठी पाठवलेले दोन हाजार बँकेत उचलता आले.कसा बसा किराना बाजार घेऊन घरी आलो. आसेच काही दिवसा नतर आमच्या गावची बातमी दुरदर्शन वर आली की या गावचे पोलीस स्टेशन मधे डिवटीवर आसलेले हे पोलीस याना कोरोनाची लागन झाली त्यांच्या सपंर्कात जेवढे लोक आले त्यांनी कोरोना चाचनी करुन घ्यावी मन सुन्न झाले.मी त्या दिवसी त्यांना बोललो आहे .घरी सागांवे कसे विचारानी गोधंळुन गेलो.तरी सकाळी उढल्या नतंर मन घट करुन सर्वाना या घटणेची माहीती दिली मंग सर्व जन आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी केली पण मन काही स्थिर राहीना सर्व बेचेन तिनदिवसानी रिपोट निघेटीव आला .आता घरच्या नि सागितले उपवासी राहाऊत पण गोधळात जायचे नाही पण त्या देश सेवा करणाऱ्या सेवक हा सुरक्षित रहावा म्हणुन एका तरी नागरीकाने विचार केलातर सर्व ठी होईल.मंग लागा तयारीला विनाकारन घरातुन बाहेर पढणार नाही .देश सेवा करनारे जवानना त्रास देनार नाही त्यांना त्रास देशाला त्रास.
*लेखक*
-बालाजी हणमंतराव देशमुख
विमा सल्लागार
मो:-9764669763