Monday, October 16, 2023

वाचन हे विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य - ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार

वाचन हे विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य - ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार
 उदगीर : प्रत्येक माणसाने वाचत वाचत काहीतरी नवीन वेचत जावे आणि त्यासाठी वाचन हे खाद्य व्हावे. याकरिता अभ्यासक्रमाबाहेरची वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे मत ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील दिनविशेष समितीच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के हे होते. यावेळी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. जी. कोडचे, वाणिज्य पर्यवेक्षक प्रा. टी. एन. सगर यांची उपस्थिती होती.
             पुढे बोलताना डॉ. पेन्सलवार म्हणाले, तंत्रज्ञानासह पुस्तक वाचनाकडे विद्यार्थ्यांनी वळणे गरजेचे आहे. भौतिक वस्तू या घराला घरपण देत असतात तर घरातील पुस्तके माणसांना शहाणपण देत असतात. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तक वाचण्यावरती भर द्यावा, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. मस्के म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची श्रीमंती यायला हवी. ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची भूक असते त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची भूक असली पाहिजे. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. त्यामुळे आयुष्यभर पुस्तकांशी मैत्री करा, असा आग्रह विद्यार्थ्यांना केला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. एन. घोंगडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ए. के. वळवी यांनी तर आभार प्रा. एम. डी. समगर यांनी केले. यावेळी दिनविशेष समिती प्रमुख डॉ. एस. आर. सोमवंशी, डॉ. सुनंदा भद्रशेट्टे, डॉ. गौरव जेवळीकर यांची विशेष उपस्थिती होती.

Tuesday, September 12, 2023

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खो - खो संघाला उपविजेतेपद.

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खो - खो संघाला उपविजेतेपद.
उदगीर(श्रीकांत जाधव):-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत संजीवनी महाविद्यालय, चापोली येथे आंतर महाविद्यालयीन ब- विभाग खो - खो (पुरुष) स्पर्धा दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चुरशीचा खेळ दाखवीत संघाने *उपविजेतेपद* (द्वितीय क्रमांक) पटकाविला आहे. विजेत्या संघामध्ये - संतोष मोतीपवळे, गोविंद अचोले, श्रीगणेश जाधव, शुभम मोतीपवळे, गजानन चवाळे, सचिन जाधव, सचिन चव्हाण, किरण चव्हाण, अशोक राठोड, अंशुमन गायकवाड, रितिक लांडगे, मल्लिकार्जुन भंडे, राहुल चव्हाण, आकाश शेल्हाळे या खेळाडूंचा समावेश होता. या विजयी खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.सतिश मुंढे, प्रा.रोहन ऐनाडले यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अ‍ॅड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अ‍ॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Friday, May 12, 2023

दहावी सीबीएसई बोर्डात हर्षदा सामाले 80 टक्के गुणांसह उत्तीर्ण.

दहावी सीबीएसई बोर्डात हर्षदा सामाले 80 टक्के गुणांसह उत्तीर्ण.
वार्ताहर:-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी नंतर आता दहावी चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देखील निकालात मुलींने बाजी मारली आहे त्यातच उदगीर येथील आनंदी पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी हर्षदा अर्जुनराव सामाले हि कोणत्याही ट्युशन क्लास विना तब्बल 80 टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे या यशाबद्दल संपूर्ण शाळेच्या वतीने व आई,आजोबा,आजी,मामा,मामी व संपूर्ण मित्रपरिवारांच्या वतीने हर्षदाचे सर्वत्र कौतुक करत आहेत.

Thursday, January 5, 2023

डी.टी.एड, बी.एड स्टुडंट असोसिएशन चे पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण.

डी.टी.एड, बी.एड स्टुडंट असोसिएशन चे पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण.
वार्ताहर:-राज्यात आगामी होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या पार्शवभूमीवर शिक्षक भरतीतील विविध त्रुटींच्या संदर्भात डी.टी.एड,बी.एड स्टुडंट असोसिएशन च्या वतीने 5 जानेवारी पासून बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या...
1) माजी सैनिक, अपात्र,व गैरहजर उमेदवारांच्या याद्या न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून लावण्यात याव्यात, तसेच समांतर आरक्षणातील प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्या वरील झालेला अन्याय दूर करावा.
2) डिव्हिजन नुसार शिक्षक भरती घेण्याच्या निर्णय शासनाच्या विचारधीन असल्यास तो तात्काळ रद्द करण्यात यावा.

3) 10 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासननिर्णयातील मुद्दा क्रमांक 5 नुसार भरती टप्या टप्यात न करता एकाचवेळी जाहिरात प्रसिद्ध करून केंद्रीय पध्दतीने गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात याव्यात. नियुक्ती साठी शिफारस करण्यात आलेला उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद करण्यात यावा.
4) राज्यातील 80% टक्के शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत तसेच भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांचा आकडा प्रथम जाहीर करून परीक्षा घेण्यात यावी व सुमोटो याचिकामध्ये दिलेल्या  रोडमॅप प्रमाणे TAIT परिक्षेची तारीख जाहीर करावी आदि मागण्यांसाठी बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येत आहे.
               सदरील आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर,उपाध्यक्ष संदीप कांबळे,पूनम पाटील,अविनाश वाघ,बालाजी हजारे आदि पदाधिकारी उपस्थित आहेत येत्या एक दोन दिवसात राज्यभरातील संघटनेचे शेकडो पदाधिकारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे...