Thursday, January 5, 2023

डी.टी.एड, बी.एड स्टुडंट असोसिएशन चे पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण.

डी.टी.एड, बी.एड स्टुडंट असोसिएशन चे पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण.
वार्ताहर:-राज्यात आगामी होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या पार्शवभूमीवर शिक्षक भरतीतील विविध त्रुटींच्या संदर्भात डी.टी.एड,बी.एड स्टुडंट असोसिएशन च्या वतीने 5 जानेवारी पासून बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या...
1) माजी सैनिक, अपात्र,व गैरहजर उमेदवारांच्या याद्या न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून लावण्यात याव्यात, तसेच समांतर आरक्षणातील प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्या वरील झालेला अन्याय दूर करावा.
2) डिव्हिजन नुसार शिक्षक भरती घेण्याच्या निर्णय शासनाच्या विचारधीन असल्यास तो तात्काळ रद्द करण्यात यावा.

3) 10 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासननिर्णयातील मुद्दा क्रमांक 5 नुसार भरती टप्या टप्यात न करता एकाचवेळी जाहिरात प्रसिद्ध करून केंद्रीय पध्दतीने गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात याव्यात. नियुक्ती साठी शिफारस करण्यात आलेला उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद करण्यात यावा.
4) राज्यातील 80% टक्के शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत तसेच भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांचा आकडा प्रथम जाहीर करून परीक्षा घेण्यात यावी व सुमोटो याचिकामध्ये दिलेल्या  रोडमॅप प्रमाणे TAIT परिक्षेची तारीख जाहीर करावी आदि मागण्यांसाठी बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येत आहे.
               सदरील आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर,उपाध्यक्ष संदीप कांबळे,पूनम पाटील,अविनाश वाघ,बालाजी हजारे आदि पदाधिकारी उपस्थित आहेत येत्या एक दोन दिवसात राज्यभरातील संघटनेचे शेकडो पदाधिकारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे...