*"मास" विद्यार्थी संघटनेच्या जळकोट तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल बारसुळे तर तालुका कार्याध्यक्ष पदी बालाजी कापसे यांची निवड.*
उदगीर:-मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंट(मास) या विद्यार्थी संघटनेच्या जळकोट तालुकाअध्यक्ष पदी विठ्ठल बारसुळे यांची तर तालुका कार्याध्यक्ष पदी बालाजी कापसे यांची निवड संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर व उदगीर तालुकाध्यक्ष नवनाथ कोकणे यांच्या हस्ते उदगीर येथे करण्यात आली.
शिक्षण क्षेत्रासंदर्भात मराठवाड्यातील अनुशेष भरून काढण्याबाबत किंवा केजी टू पीजी यामधील गुणात्मक कौशल्यावर आधारित
शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडन्ट ही संघटना काम करत असून या संघटनेविषयी कुठेतरी तरुणांच्या मनामध्ये आत्मीयता आहे,
किंवा त्यांना विश्वास आहे.म्हणून अनेक तरुण हे पुढे येत असून कुठेतरी युवकांच्या मनात अजून
व्यक्तीच्या जीवनातील शिक्षणाचे महत्त्व आणि त्याची जाणीवही मृत झालेली दिसत नाही असे श्रीकांत जाधव यांनी उपस्थित विद्यार्थी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले.
खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा तसा उशिराने स्वातंत्र्य झाला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सुविधा, तंत्रज्ञान ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे तेवढे सहज शक्य झालं
नाही आणि मराठवाड्यामध्ये इतर विभागांपेक्षा जास्त मागासलेपण येणार हे साहजिक होतं आणि ते आले. आणि हेच
मागासलेपण दूर करण्यासाठी "मास" सोबत मोठ्या प्रमाणावर तरुण काम करण्यासाठी
उत्साही आहेत.
No comments:
Post a Comment