Wednesday, December 30, 2020

उदगीर नगरपालिकेच्या हद्द वाढीला शासनानाची मान्यता. शासनाचा एतिहासिक निर्णय उदगीर शहराचा भुगोल बदलला.. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नास यश.

*उदगीर नगरपालिकेच्या हद्द वाढीला शासनानाची मान्यता.*

  *शासनाचा एतिहासिक निर्णय उदगीर शहराचा भुगोल बदलला..*

*राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नास यश.*

मुंबई :उदगीर नगरपालिकातील सर्वे नंबर .3,155 ते 338.
यांना शासनाने उदगीर नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे .अनेक दिवसांपासून येथील नागरिकाची हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी होती शासनाने  या मागणीला मान्यता दिली आहे अशा माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे  आमदार संजय बनसोडे  यांनी दिली आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की उदगीर शहराचा विकास झपाट्याने होत आहे  शहरात विविध विकास कामे सुरू आहेत  शहराचा विस्तार  होत आहे सर्वे नंबर 3,155,ते 338  येथील नागरिकाची अनेक दिवसांपासून  नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी होती हे सर्वे नंबर लगतच्या   ग्रामपंचायत मघ्ये समाविष्ट नव्हते त्यामुळे येथील नागरिकांना खरेदी खत बनविणे,अशा अनेक महसूली समस्या निर्माण होत होत्या याबाबत राज्य शासनाकडे हद्द वाढीचा प्रस्ताव सादर केला होता. याला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये मलकापूर, सोमनाथ पुर ,निडेबन,पिंपरी मादलापुर येथील काही सर्वे नंबर नगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात येणार आहेत यात उदगीरच्या  
*उत्तरेस* सर्वे नं 97 च्या उत्तर पश्चिम कोपरा ते सर्वे नं 193 च्या उत्तर पुर्व कोपरा पर्यंत 
*पूर्व दिशेला* 
सर्वे नंबर 193 च्या उत्तर पुर्व कोपरा पासून सर्वे नंबर 254च्या दक्षिण पुर्व कोपरा 
*दक्षिण दिशेला*
 सर्वे नंबर 254 दक्षिण पुर्व कोपरा ते सर्वे नंबर 332 च्या पश्चिम दक्षिण कोपऱ्या पर्यंत 
*पश्चिम दिशेला* 
सर्वे नंबर 333 च्या दक्षिण पश्चिम कोपरा ते सर्वे नंबर 97 उत्तर पश्चिम पर्यंत हद्द वाढीस शासनाने मान्यता दिली आहे. नगरपालिकेच्या हद्दी मुळे  या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे नागरिकांच्या महसूली अडचणी दुर होणार आहेत  अनेक वर्षी पासून  शासन स्तरावर प्रलंबित असलेली हद्द वाढीची मागणी सहा माहिण्यात पाठपुराव्याने मार्गि लागली आहे लातूर जिल्हा परिषद, औरंगाबाद विभागीय आयुक्त, व मंत्रालयातील नगरविकास विभागात या संदर्भात सतत पाठपुरावा केला गेला होता आज शासनाने या हद्द वाढीस मान्यता दिली आहे अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

उदगीर तालुक्यातील आधार कार्डचे नवीन नोंदणी व नुतनीकरण केंद्र वाढवा. प्रहार जनशक्ती पक्षाकडून मा.उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन.

उदगीर तालुक्यातील आधार कार्डचे नवीन नोंदणी व नुतनीकरण केंद्र वाढवा.
 प्रहार जनशक्ती पक्षाकडून मा.उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन.

उदगीर:-दि.29/12/20 रोजी उदगीर येथे आधार कार्डची नवीन नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी BRC कार्यालयात नागरिकांची फार हाल होत आहेत. 
यात मोठ्याप्रमाणात EBC विद्यार्थी , जेष्ठ नागरिक, तरुण,दिव्यांग आणि महिलांना त्रास होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाकडून मा.उपजिल्हाधिकारी साहेबांना
आधार कार्डची नवीन नोंदणी आणि नुतनीकरण करण्यासाठी तालुक्यात केंद्र वाढविण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे,उपाध्यक्ष महादेव मोतीपवळ,संदीप पवार,
शहर कार्याध्यक्ष गणेश दावणे आणि प्रहार सेवक उपस्थित होते.

Monday, December 28, 2020

प्रहार जनशक्ती पक्षाची उदगीर महिला कार्यकारिणी जाहीर..

प्रहार जनशक्ती पक्षाची उदगीर महिला कार्यकारिणी जाहीर..
उदगीर:-प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी कांचन भोसगे तर तालुका उपाध्यक्ष पदी विजयमाला पवार, तालुका उपाध्यक्ष पदी सुजाता देवरे, तर तालुका कार्याध्यक्ष पदी शकुंतला रोडेवाड , तालुका संघटक पदी लता कोळी 
यांची निवड करण्यात आली.वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी कांचन भोसगे तर तालुका उपाध्यक्ष पदी विजयमाला पवार, तालुका उपाध्यक्ष पदी सुजाता देवरे, तर तालुका कार्याध्यक्ष पदी शकुंतला रोडेवाड , तालुका संघटक पदी लता कोळी 
  यांची निवड करण्यात आले.
उदगीर ता.अध्यक्ष- विनोदभाऊ तेलंगे, तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे,ता. ता. उपाध्यक्ष-  महादेव मोतीपवळे,तालुका कोषध्यक्ष अंगद मुळे ,
शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे ,शहर सह- सचिव - बालाजी बिरादार, प्रसिद्धी प्रमुख- अभय कुलकर्णी, अनेक प्रहार सेवक इत्यादी उपस्थित होते. यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन प्रहार सेवकांच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..

Monday, December 21, 2020

रेशन दुकानाच्या संदर्भात माहिती

*रेशनिंगचे नियम –* 

● रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.

● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.

● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.

● रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

● एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.

● ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील. तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.

● रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.

● रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.

● रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भाव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते. त्या सोबतच गाव व तालुका स्तरावरील रेशन दक्षता समिती मधील पदाधिकारी चे नाव व संपर्क क्रमांक असलेले फलक दर्शनी भागात लावणे अनिवार्य असते.

● बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

● वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

● दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन
महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.

https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp

रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे

https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp

रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.

http://mahafood.gov.in/pggrams/

वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.....

*महत्वपुर्ण_माहिती*
*🍀स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*🌴
*गहू - २ रू. किलो*
*तांदूळ- ३ रू. किलो* 
*साखर - २० रू . किलो*
*चनादाळ- ४५ रू. किलो*
*तुरदाळ- ५५ रू. किलो*
*उडीद दाळ - ४४ रू किलो*
*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*
(टिप :- संबंधी आपल्य‍ा क्षेत्रातील जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांचा कडून वरील दर / किंमत खात्री करुन घ्यावी. )
            जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर घेत असेल व तुम्हाला माल (रेशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!
*चोरांना खुलेआम आपली लूट करण्याची संधी देवू नका...!*
सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..! 
          जागा ग्राहक जागा ! आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्रार करा.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आपला,
*रविकांत सुर्यकांतजी गाडरे*

 > _*राज्य सरचिटणीस*_ 
 *माहिती अधिकार कार्यकर्ता समिती, महाराष्ट्र राज्य.* 
> _*राज्य दैनिक बाळकडू*_ 
 *पूर्व विदर्भ विभाग प्रतिनिधी* 
( नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली )

 *फक्त कॉल करा.* 

 *मो.नं. ९५८८६१७०३४ / ९७६४९१३५४५*

Saturday, December 19, 2020

त्यांचा साखरपुडा झाला, पण शीतल आमटे नव्हत्या... आठवणीने डोळ्यातून अश्रू वाहिले..

त्यांचा साखरपुडा झाला, पण शीतल आमटे नव्हत्या... आठवणीने डोळ्यातून अश्रू वाहिले..
श्रीकांत जाधव(बाऱ्हाळी):-'संदीप तू तिच्यासोबत बिनधास्त लग्न कर आणि माझ्याकडे ये. मी यथोचित स्वागत करून दोघांनाही जोड आहेर करते व तुला आयुष्यात कधीच मोठ्या बहिणीची कमी जाणवू देणार नाही', हे आपुलकीचे शब्द संदीप कांबळेंना साखरपुड्याच्या दिवशी सारखे आठवत होते. त्या आठवणींनी डोळ्यात अश्रू तरळत होते... आज शीतल आमटे हव्या होत्या, असं सतत संदीप कांबळेंना वाटत होते. मात्र वैवाहिक जीवनात प्रवेश करत असलेल्या संदीप कांबळे आणि रमाई कांबळे यांना मोठ्या बहिणीसारखं आपुलकीने जवळ घेणाऱ्या शीतल आमटे आता कधीच येणार नव्हत्या.
              त्यांचे कारणही तसेच आहे... युवापर्व ऑनलाईन शी बोलताना संदीप कांबळे यांनी मन मोकळे केले... कांबळे हे डीएड-बीएड विद्यार्थी संघटनेमध्ये कार्यरत आहेत. त्यांची डॉ. शीतल आमटेंशी काही वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर फोनवर बोलणं व्हायचं. समाजासाठी, विधवा, परितक्त्या महिलांसाठी काहीतरी चांगलं कार्य करण्याची इच्छा होती. याबाबत शीतल आमटेंशी कॉल आणि चॅटिंगवर नेहमी संवाद व्हायचा. शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल व्हायला हवे असं त्या सांगायच्या.
          घटस्फोटीत महिलेशी लग्न करायचे ठरले
नांदेड येथील मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात संदीप राहतात. रमाई आनंद कांबळे या तरुणीचा तीन वर्षापूर्वी घटस्फोट झालेला. अडचणी अनेक होत्या. या अडचणींबाबत शीतल आमटेंशी बोलणं व्हायचं. 'संदीप तू तिच्यासोबत बिनधास्त होऊन लग्न कर आणि माझ्याकडे ये. मी यथोचित स्वागत करून दोघांनाही जोड आहेर करते व तुला आयुष्यात कधीच मोठ्या बहिणीची कमी जाणवू देणार नाही" असा शब्द शीतल आमटे यांनी दिलेला.
           संदीप कांबळे सांगतात, साखरपुड्याच्या दिवशी ताईचे हे शब्द कानात गुंजत होते. तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार त्यांनी शीतल आमटेंना बोलून दाखवला होता. त्यांनी या लग्नाला प्रेरणा देऊन संपूर्ण पाठिंबा दिला. ७ फेब्रुवारी रोजी हे जोडपं लग्न करणार आहे. तीन वर्षापूर्वी घटस्फोट झालेला. धुळ्याची मुलगी. दिलेल्या घरी जादूटोण करतात असं सांगत होते. शीतल आमटेंच्या संपर्कात आलोय. स्त्रीयांसाठी काम करू असं सांगत होते. नियोजन झालं होतं. महिलांना एकत्र घेऊन काम करू. समाजामध्ये कृतिशील काम करायचे आहे. घटस्फोट, वारांगणा, विधवांंसाठी काम करणार होतो. होकार ही दिला होता. स्वत:पासून काम करत होतो. त्यांच्याशी लग्न कर म्हणून सांगायच्या त्या मला.

संदीप कांबळे म्हणतात खूप रडलो.
संदीप कांबळे म्हणाले, 'ते सगळं वेदनादायक होतं. मी खूप रडलो. ट्विट केलेलं होते. त्याच मुलीशी आता माझा साखरपुडा झाला आहे. आम्ही तिच्याशी चर्चा करून लग्नाची तारीख काढणार होतो. काल ताई असायला हव्या होत्या. आम्ही ७ फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहोत. त्याच दिवशी लग्न करेन. त्यांच्या साक्षीने आमचं झालं असतं असतं तर फार बरं वाटलं असतं. मोठ्या बहिणीसारखी उभी राहीन, हे त्यांचे शब्द सतत आठवत आहेत. लग्नाला उपस्थित राहीन म्हणाल्या होत्या. छोट्या भावासारखी वागणूक देत होत्या.'

Monday, December 14, 2020

उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थी -शिक्षक व पालक संवाद बैठक संपन्न...

उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थी -शिक्षक व पालक संवाद बैठक संपन्न...

 उदगीर : (दिनांक 13 डिसेंबर 2020 ) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षक संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. मनोहरराव पटवारी होते. यावेळी मंचावर विशेष उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सदस्य ॲड. एस. टी. पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव, सीईटी सेल प्रमुख प्रा. बी. एन. गायकवाड, पालक प्रतिनिधी प्रभाकर सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. यावेळी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी रिया कोटलवार, ऐश्वर्या स्वामी, शेख फैजान जमीर, स्नेहल पांडे ,सुशील बेळकूने, आदित्य गुजराती, लीना खत्री, वैभवी बिरादार, संतोषी बिरादार, नलिनी गुंजरगे, सुखराज कांबळे यांना रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी समृद्धी काकनाळे व ऐश्वर्या स्वामी यांनी विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाने राबवलेल्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करून आपल्या यशामध्ये महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगून शिक्षक व महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रा. पटवारी म्हणाले, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्थेने सर्व सुविधांची उपलब्धता केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पालकांच्या वतीने सुहास जगताप, शिवाजी बीबीनवरे, प्रभाकर सूर्यवंशी यांनी विधायक सूचना केल्या. दहावीत सर्वाधिक गुण घेऊन अकरावी प्रवेश घेतलेल्या शेख सानिया, कोमल मलगे, श्रुती जाधव, यश माने, वाणी घनपाठी, आयुषी येरोळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पालकांना दोन वर्षाच्या टारगेट बॅच विषयी लिखित नियोजन पत्रक देण्यात आले. यावेळी नागराळकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जे यश मिळवले त्यात विद्यार्थी व पालक आणि शिक्षकांचा वाटा आहे. विद्यार्थी जीवनामध्ये कितीही मोठा झाला तरी चांगला माणूस बनला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. पी. वाय. जालनापूरकर यांनी केले. आभार प्रा. नागनाथ खांडेकर यांनी मानले.

Wednesday, December 2, 2020

*शेतकरी नेते कैलासदादा येसगे यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान..* *मातोश्री शारदाबाई पवार संस्थेने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दिला पुरस्कार.*

*शेतकरी नेते कैलासदादा येसगे यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान..*

*मातोश्री शारदाबाई पवार संस्थेने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दिला पुरस्कार.*


देगलूर:-मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शेतकरी चळवळीत शेतकऱ्यांसाठी जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये देखील अहोरात्र काम करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे देगलूर तालुका अध्यक्ष तथा विश्व परिवाराचे संस्थापक अध्यक्ष कैलासदादा येसगे यांचा देगलूर-बिलोली विधानसभा क्षेत्राचे आमदार रावसाहेब अंतापुरकर साहेब व संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांच्या हस्ते देगलूर येथे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी प्रा.शिवकुमार जाधव,माधव पाटील लिंगणकेरूरकर,तुकाराम पाटील,राजू कांबळे, बालाजी पाटील,सुरेश पाटील,धनराज माने,मेघराज माने आदी उपस्थित होते..