Monday, December 14, 2020

उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थी -शिक्षक व पालक संवाद बैठक संपन्न...

उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थी -शिक्षक व पालक संवाद बैठक संपन्न...

 उदगीर : (दिनांक 13 डिसेंबर 2020 ) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षक संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. मनोहरराव पटवारी होते. यावेळी मंचावर विशेष उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सदस्य ॲड. एस. टी. पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव, सीईटी सेल प्रमुख प्रा. बी. एन. गायकवाड, पालक प्रतिनिधी प्रभाकर सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. यावेळी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी रिया कोटलवार, ऐश्वर्या स्वामी, शेख फैजान जमीर, स्नेहल पांडे ,सुशील बेळकूने, आदित्य गुजराती, लीना खत्री, वैभवी बिरादार, संतोषी बिरादार, नलिनी गुंजरगे, सुखराज कांबळे यांना रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी समृद्धी काकनाळे व ऐश्वर्या स्वामी यांनी विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाने राबवलेल्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करून आपल्या यशामध्ये महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगून शिक्षक व महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रा. पटवारी म्हणाले, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्थेने सर्व सुविधांची उपलब्धता केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पालकांच्या वतीने सुहास जगताप, शिवाजी बीबीनवरे, प्रभाकर सूर्यवंशी यांनी विधायक सूचना केल्या. दहावीत सर्वाधिक गुण घेऊन अकरावी प्रवेश घेतलेल्या शेख सानिया, कोमल मलगे, श्रुती जाधव, यश माने, वाणी घनपाठी, आयुषी येरोळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पालकांना दोन वर्षाच्या टारगेट बॅच विषयी लिखित नियोजन पत्रक देण्यात आले. यावेळी नागराळकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जे यश मिळवले त्यात विद्यार्थी व पालक आणि शिक्षकांचा वाटा आहे. विद्यार्थी जीवनामध्ये कितीही मोठा झाला तरी चांगला माणूस बनला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. पी. वाय. जालनापूरकर यांनी केले. आभार प्रा. नागनाथ खांडेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment