Sunday, September 25, 2022

*पत्रकार सुनील हावा पाटील यांना "समाज भूषण" पुरस्काराने सन्मानित*

*पत्रकार सुनील हावा पाटील यांना "समाज भूषण" पुरस्काराने सन्मानित*                 

   उदगीर(श्रीकांत जाधव):-उदगीर येथील पत्रकार,साप्ताहिक बसवरत्नचे तथा स्टार दर्पण न्यूजचे संपादक,लातुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते  सुनील हावा पाटील यांना नुकताच लिंगायत महासंघ च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 2022 चा"समाज भूषण"पुरस्कार महाराष्ट्रचे माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते सन्मान पत्र,शाल,श्रीफळ,पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आला.                                उदगीर येथील पत्रकार,संपादक सुनील हावा पाटील यांचे सामाजिक व समाजाचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. समाजाचे हित लक्षात घेऊन,त्यांनी समाजहिताचे व सामाजिक अनेक कार्य केलेले आहेत. ते सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. पत्रकाराच्या लेखणीमधून त्यांनी समाज कार्य करत असताना, अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.यांच्या कार्याची दखल घेऊन, लिंगायत महासंघ महाराष्ट्राच्या वतीने दिला जाणारा 2022 यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार त्यांना नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी उदगीर  येथे वीरशौव लींगायात वधू वर परिचय मेळावा घेण्यात आला. या वधू-वर मेळाव्यास महाराष्ट्र, कर्नाटक, आंद्रप्रदेश,तेलंगणा राज्यातून अनेक भावी वधू आणि वर सह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालय, येथे संपन्न होणार आहे. पुरस्कार सोहळा व वधू-वर मेळाव्यास ष.भ्र.प.1008 डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज,औरंगाबाद चे  खासदार चंद्रकांतरा खैरे, लातुरचे खासदार सुधाकर  श्रंगारे,शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, औरंगाबाद महापालिकेचे नगरसेवक विरभ्रद गादगे,माजी आमदार गोविंदराव केंद्रे,माजी आमदार मनोहरराव पटवारी, देवणी तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, बसवराज करेप्पा,अनिल शेटकार,शंकरराव पाटील, इत्यादीच्या उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे लिंगायत महासंघाचे अध्यक्ष सुदर्शन बिरादार यांनी सत्कार केला.

प्रतिक्रिया:-
माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे:-
           उदगीर शहरातील प्रमाणीक  योग्य व एका चांगल्या व्यक्ती ची वतसेच पञकाराची आपन समाज भुषण पुरस्कारासाठी आपन निवड केलात सुनिल हवा यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना भावना व्यक्त केली)

श.भ.प.1008 शंभूलिंग शिवाचार्य महाराज:-
        समाज भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या हातुन समाज कार्य व धार्मीक कार्य असेच समाजात घडत राहो म्हनुन शुभ आशीर्वाद देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment