Tuesday, December 6, 2022

अंकुश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांना फळे वाटप करून साजरा...

अंकुश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांना फळे वाटप करून साजरा...
वार्ताहर:-उदगीर तालुक्यातील श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालयात अंकुश ताटपल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त (दि. ५) डिसेंबर वार सोमवार रोजी सायंकाळी विद्यालयातील दिव्यांग मुलांना फळे वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च करण्यापेक्षा दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपण वाढदिवसानिमित्त फळ वाटप करावे कल्पना सुचली व त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने मूकबधिर निवासी विद्यालयात वाढदिवस साजरा करून फळे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक शिक्षक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका उप अध्यक्ष अंकुश ताटपल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होऊन आपला वाढदिवस साजरा केला .
वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च करण्याचे टाळून मूकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेऊन वाढदिवस साजरा करून फळांचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी अंकुश ताटपल्ले यांना विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून व त्यांच्या हव भाव करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा न बोलक्या विद्यार्थ्यांच्या मनातील आहेत आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा ह्या लाखमोलाच्या असून हा आशीर्वाद मिळणं भाग्यच लागतं ते मला लाभल आहे बोलताना अंकुश ताटपल्ले  म्हणाले. यावेळी सतीश पाटील, राहुल आतनुरे, विजय बामणी कर,पंकज कालानी, पवन ढोबळे, श्रीकांत गोपडे, विकास बिरादार,संतोष बिरादार, शिवम शेळके,अमित मगर, समीर, सोमनाथ बिरादार, शरद भोसले, महेश कस्तुरे, विक्रम घोगरे, अक्षय कटमपले, युवराज निलंगे, भानुदास कबनुरे, सचिन सूर्यवंशी, नागेश सूर्यवंशी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment