भेंडेगाव (बु) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशील गोपाळराव देशमुख यांची बिनविरोध निवड..
वार्ताहर:-मुखेड तालुक्यातील भेंडेगाव बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुशील गोपाळराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सुशील देशमुख यांची बिनविरोध निवड जाहीर होताच भेंडेगाव बु. व कबनुर येथे समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
भेंडेगाव बु. ही ग्रामपंचायत मुखेड तालुक्यातील तब्बल सात वेळा बिनविरोध सरपंच देणारी एकमात्र ग्रामपंचायत आहे.
बिनविरोध सरपंच पदाची निवड बाऱ्हाळी नगरीचे चेअरमन राजनजी देशपांडे यांच्या पुढाकाराने व समस्थ गावकऱ्यांच्या पाठिंब्याने करण्यात आली.
सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी सुशील गोपाळराव देशमुख यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुशील गोपाळराव देशमुख यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment