Wednesday, September 30, 2020

*पाणीपुरवठा योजनांचा सुधारीत प्रस्ताव 15 दिवसात विभागाला सादर करावा* *- राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश*

*पाणीपुरवठा योजनांचा सुधारीत प्रस्ताव 15 दिवसात विभागाला सादर करावा*

*- राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश*

मुंबई दि. 30 :लातूर जिल्हयातील 27 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा सुधारीत प्रस्ताव येत्या 15 दिवसात विभागाला सादर करण्याबरोबरच, नगरपरिषदांच्या पाणी पुरवठा योजना 31 मार्च 2021 पूर्वी पूर्ण कराव्यात असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले.

लातूर जिल्हयातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा आज मंत्रालयात आढावा घेण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त उदय टेकाळे ,पाणी पुरवठा विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री.गजभिये, औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री. लोलापोड यांच्यासह संबंधित अधिकारी आणि जिल्हयातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन अभियानाची अंमलबजावणी कालबध्द पध्दतीने होणे आवश्यक आहे. लातूर जिल्हयात सध्या चालू असलेल्या योजनांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

यावेळी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी जलजीवन अभियान मधील नियोजन, योजनांची सद्यस्थिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाऱ्या नागरी पाणी पुरवठा व भूयारी गटार योजनांच्या कामांचा आढावाही यावेळी घेतला.

Sunday, September 27, 2020

*मुखेड तालुक्यातील कबनुर गावचा समावेश जलजीवन मिशन योजनेत करावा.* *श्रीकांत जाधव यांचे पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना साकडे.*

*मुखेड तालुक्यातील कबनुर गावचा समावेश जलजीवन मिशन योजनेत करावा.*

*श्रीकांत जाधव यांचे पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना साकडे.*

बाराहाली:-मुखेड तालुका हा डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो तालुक्यात वाड्या वस्त्या जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सतत तालुक्यातील लोकांना वणवण करावी लागते त्यामुळेच तालुक्यातील बाऱ्हाळी सर्कल मधील कबनुर या गावात देखील पिण्याच्या पाण्यासाठी बारा महिने माय माऊलींना तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागते उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्याबरोबरच सांडपाण्याच्या पाण्यासाठी देखील खूप वाईट परिस्थिती निर्माण होते टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा लागतो काही वेळेस ते पण मिळत नाही मागील उन्हाळ्यात श्रीकांत जाधव यांनी गावचे काही देणे लागतो या भावनेतून काही सामाजिक संस्थेकडून गावात पाणीपुरवठा सुरुवात केला होता पण हे प्रत्येक वर्षी करणं शक्य नाही त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन कबनुर गावचे भूमिपुत्र व सतत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणारे श्रीकांत जाधव यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना भेटून गावातील नागरिकांची होणाऱ्या गैरसोयीबद्दल माहिती देऊन जलजीवन मिशन योजनेत कबनुर गावचा समावेश करावा यासाठी साकडे घातले राज्यमंत्र्यांनी देखील श्रीकांत जाधव यांना आश्वस्त करून निवेदनाची प्रत संबंधित खात्याच्या स्वीय सहाय्यकाकडे दिले.
              या योजनेत कबनुर गावचा समावेश झाला तर प्रत्येक नागरिकांना घरपोच पाणी मिळेल त्यांची रोज होणारी पायपीट थांबेल व पाण्याचे देखील योग्य नियोजन होईल व गावात केंव्हाच पाणीटंचाईला सामोरे जावाव लागणार नाही असे श्रीकांत जाधव यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रवीण पटवारी उपस्थित होते.

*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* *उदगीर शहरातील विकास कामासाठी 3 कोटी 4 लाखाची तरतूद*

*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 

* उदगीर शहरातील विकास कामासाठी 3 कोटी 4 लाखाची तरतूद*

  लातूर/ उदगीर, दि. 27(जिमाका): उदगीर नगर परिषद अंतर्गत उदगीर शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन संसदीय कार्य, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
     ही सर्व कामे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दलित वस्ती सुधार योजना, नागरी दलितेत्तर योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान (जिल्हास्तर) व स्वच्छ महाराष्ट्र प्रोत्साहन निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहेत.
     उदगीर शहरामधील संमिश्र सोसायटी येथे पेव्हिंग  ब्लॉक व नालीचे कामे करणे, येरमे नगर येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता व अशोक नगर येथे स्मशानभूमी विकसित करणे, शिवशक्ती नगर येथे रस्ता मजबुतीकरण व सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली करणे, खडकाळी गल्ली येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे, तळवेस गल्ली व गांधी नगर येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता, रस्ता दुभाजक व नाली बांधकाम करणे, नालंदा नगर व बनशेळकी रोड येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे व येनकी मानकी रोड येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम करणे या सर्व कामांचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेल्या शहरी बेघर निवारा येथे भेट देऊन तेथील बेघर बांधवांसोबत चर्चा करून निवाऱ्याचे कौतुक ही त्यांनी केले. 
      उपरोक्त नमूद कामासाठी एकूण तीन कोटी चार लाख रुपये इतकी अंदाजपत्रकीय  तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. 
             या भूमिपूजन समारंभासाठी उदगीर नगर परिषदेचे अध्यक्ष बसवराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगर परिषद मुख्याधिकारी भारत राठोड, बांधकाम सभापती मंजूरखां पठाण, बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य कल्याण पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
               *********

Saturday, September 26, 2020

*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत...राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून सुमठाणा येथे नागरिकांची आरोग्य तपासणी*

*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत...
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून सुमठाणा येथे नागरिकांची आरोग्य तपासणी*


उदगीर(श्रीकांत जाधव),दि.26:- महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात दिनांक 15 सप्टेंबर 2020 पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी आरोग्य पथकाकडून केली जात आहे. 
     उदगीर तालुक्यातील सुमठाणा येथे पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांकडून "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत कशा पद्धतीने गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करून त्याच्या नोंदी कशा ठेवल्या जात आहेत याची माहिती जाणून घेतली व या वेळी श्री बनसोडे यांच्या हस्ते सुमठाणा ग्रामस्थांची प्रातिनिधिक स्वरूपात स्वतः आरोग्य तपासणी करण्यात आली.
     यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी या मोहिमेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आरोग्य तपासणी करावी. शहरी व ग्रामीण भागातील एक ही नागरिक आरोग्य तपासणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी व लातूर जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी शासन व प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. 
      लातूर जिल्ह्यात 1हजार 535 आरोग्य पथकांची स्थापना प्रशासनाने केली असून या पथकामध्ये 199 पथके शहरी भागासाठी असून 1336 पथकामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील जवळपास 4 लाख 29 हजार कुटुंबाची आरोग्य तपासणी या मोहिमेअंतर्गत आरोग्य पथकाकडून दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2020 व दिनांक 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 या दोन टप्प्यात केली जाणार आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते अहमदपूर येथून दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आलेला आहे.

*अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पहाणी*

*अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पहाणी* 

*अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विहिरी, नदी काठावरील बंधाऱ्याचे पंचनामे करण्याचे निर्देश*

    उदगीर(श्रीकांत जाधव),दि.26 : उदगीर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसाने मुग , तुर सोयाबीन पीकाचे मोठे  नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यावरण, संसदीय कार्य पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.
    उदगीर तालुक्यातील नागलगाव, सुमठाणा , कासराळ ,वाघदरी, टाकळी, धडकनाळ, बोरगाव,बनशेळकी, येणकी, तोगरी, मोघा येथील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची व बनशेळकी येथील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहाणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली. यावेळी श्री. बसवराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती श्री. शिवाजी मुळे, जि. प. सदस्य श्री. कल्याण पाटील, जि. प. सदस्य श्री. ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जि. अध्यक्ष श्री. चंदन पाटील नागराळकर, उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी सुळे, उपविभागीय कृषी अधिकारी तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी नाबदे, पोलीस निरीक्षक ग्रामीण वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवटे, यांच्या सह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. नुकसानग्रस्त एक ही शेतकरी पंचनामे पासून वंचित राहता कामा नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

   तसेच नुकसान झालेल्या पीकाचे विमा मिळण्यासाठीचे अर्ज शेतकऱ्यांनी तात्काळ भरावे यासाठी कृषी विभागाने आँनलाईन /आँफलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बनसोडे यांनी केले. तसेच भारतीय कृषी विमा कंपनीने या नुकसानीचे पंचनामे बाबत अत्यंत तातडीने कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.

    या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे , नदी काठावर शेतकऱ्यांचे बंधारे वाहून गेले आहेत तसेच बंधाऱ्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशाचे सुद्धा पंचनामे करण्यात यावेत. या शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागामार्फत मदत  करण्यात येईल, आश्वासन राज्यमंत्री  बनसोडे यांनी दिले.
    यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी उदगीर उपविभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती दिली. प्रशासनाकडून पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे ची कारवाई सुरू असून येथील एक ही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunday, September 20, 2020

लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे हाल..

आज माझ्या मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी सर्कल मध्ये काही कामानिमित्त काही गावात गेलो असता तेथील शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जाण्याचा योग आला अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांच्या हाताला आलेले मुगाचे पीक गेले आणि आता गेली पाच ते सहा दिवस झालेल्या अतिवृष्टी मुळे (ढगफुटी) सोयाबीन,उडीद,कापूस,तूर व अन्य तत्सम पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे सोयाबीन च्या शेंगांना तर अक्षरशः मोड फुटले आहे काही शेतांचे तर होत्याचे नव्हते झालेले आहे तरी देखील बाऱ्हाळी सर्कल च्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या व नांदेड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी अंबुलगेकर यांना आजपर्यंत तरी या शेतकऱ्यांची भेट घ्यावी त्यांना धीर द्यावा अस न करणं किती परोपकारी माणसं म्हणायची यांना ज्यांच्या मुळे आज महाराष्ट्रातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारी संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि त्याचा अध्यक्ष होण्याचं बहुमान बाऱ्हाळी सर्कल मधील नागरिकांमुळे मिळाला हे एवढ्या लवकर विसरून जावं हे ज्या नागरिकांनी सौ.अंबुलगेकर मॅडम जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केलेल्या व आपल्या सर्कल च्या सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे आपणच अध्यक्ष असा समज बाळगणाऱ्या नागरिकांच्या भावनांचा जणू अपमानच म्हणायचं याला पण याला सर्वस्वी सौ.अंबुलगेकर मॅडमच जबाबदार म्हणता येणार नाही याला नागरिक देखील तेवढेच जबाबदार आहेत आणि अशी परिस्थिती जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बाबतीतच नाही तर तालुक्याचे आमदार असो,प्रत्येक पंचायत समिती सदस्य असो किंवा सरपंच असो प्रत्येक पदावरील जबाबदार व्यक्ती शेतकऱ्यांच्या दुःखात शेतकऱ्यांना  भेटावं त्यांच्या शेताची पाहणी करावी व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान दाखवावे पण अस घडताना कुठेच दिसत नाही त्यामुळे संबंधित अधिकारी देखील पंचनामे देखील घरी बसूनच करतात आणि शेतकऱ्यांना भेटावा तितका मावेजा भेटत नाही काही शेतकरी पुत्रांनी यासंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना भेटून परिस्थती समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर अश्या शेतकरी पुत्रांना फक्त स्वतःच्या इगो साठी लोकप्रतिनिधी आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आणि हे असेच होत राहणार जोपर्यंत नागरिक धनशक्ती सोडून जनशक्ती चा स्वीकार करणार नाहीत..

-श्रीकांत जाधव
मो.न:-8975704163