आज माझ्या मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी सर्कल मध्ये काही कामानिमित्त काही गावात गेलो असता तेथील शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जाण्याचा योग आला अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांच्या हाताला आलेले मुगाचे पीक गेले आणि आता गेली पाच ते सहा दिवस झालेल्या अतिवृष्टी मुळे (ढगफुटी) सोयाबीन,उडीद,कापूस,तूर व अन्य तत्सम पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे सोयाबीन च्या शेंगांना तर अक्षरशः मोड फुटले आहे काही शेतांचे तर होत्याचे नव्हते झालेले आहे तरी देखील बाऱ्हाळी सर्कल च्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या व नांदेड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी अंबुलगेकर यांना आजपर्यंत तरी या शेतकऱ्यांची भेट घ्यावी त्यांना धीर द्यावा अस न करणं किती परोपकारी माणसं म्हणायची यांना ज्यांच्या मुळे आज महाराष्ट्रातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारी संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि त्याचा अध्यक्ष होण्याचं बहुमान बाऱ्हाळी सर्कल मधील नागरिकांमुळे मिळाला हे एवढ्या लवकर विसरून जावं हे ज्या नागरिकांनी सौ.अंबुलगेकर मॅडम जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केलेल्या व आपल्या सर्कल च्या सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे आपणच अध्यक्ष असा समज बाळगणाऱ्या नागरिकांच्या भावनांचा जणू अपमानच म्हणायचं याला पण याला सर्वस्वी सौ.अंबुलगेकर मॅडमच जबाबदार म्हणता येणार नाही याला नागरिक देखील तेवढेच जबाबदार आहेत आणि अशी परिस्थिती जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बाबतीतच नाही तर तालुक्याचे आमदार असो,प्रत्येक पंचायत समिती सदस्य असो किंवा सरपंच असो प्रत्येक पदावरील जबाबदार व्यक्ती शेतकऱ्यांच्या दुःखात शेतकऱ्यांना भेटावं त्यांच्या शेताची पाहणी करावी व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान दाखवावे पण अस घडताना कुठेच दिसत नाही त्यामुळे संबंधित अधिकारी देखील पंचनामे देखील घरी बसूनच करतात आणि शेतकऱ्यांना भेटावा तितका मावेजा भेटत नाही काही शेतकरी पुत्रांनी यासंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना भेटून परिस्थती समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर अश्या शेतकरी पुत्रांना फक्त स्वतःच्या इगो साठी लोकप्रतिनिधी आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आणि हे असेच होत राहणार जोपर्यंत नागरिक धनशक्ती सोडून जनशक्ती चा स्वीकार करणार नाहीत..
-श्रीकांत जाधव
No comments:
Post a Comment