Sunday, March 28, 2021

सिरशी येथे मासिक पाळी विषयी कार्यक्रम संपन्न.

सिरशी येथे मासिक पाळी विषयी कार्यक्रम संपन्न.
वार्ताहर:-लातुर तालुक्यातील सिरशी गावात मासिक पाळी विषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.सुषमा कोकाटे यांनी उपस्थित महिला व मुलींना मासिक पाळी बद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन करून मासिक पाळीचे चक्र, सकस आहार, पाळीत वापरावयाचे शोषक साहित्य, सॅनिटरी पॅड वापरण्याची पद्धत, पॅडची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल सखोल माहिती दिली. त्यानंतर आश्विन कंजे यांनी ज्या मासिक पाळीमुळे आपल्या सर्वांचा जन्म होतो ती पाळी अपवित्र असु शकत  नाही व मासिक पाळी ही नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे त्याचा देवाशी,धर्माशी,पवित्रतेशी कसलाही संबंध नाही हे सांगून वयात येताना होणारे भावनिक बदल,निर्माण होणारी शारिरीक आव्हाने, पाळीच्या त्रासावर उपाय, पाळीत घ्यावयाचा आहार याविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास सरपंच कौशल्या कांबळे, आशा स्वयंसेविका सुमन जाधव, सिआरपी अभिषक्ता कदम, सुमित्रा डोरले, गीता जाधव, सुमन शेळके,प्रिया शिंदे,शुभांगी जाधव, प्रिती शिंदे आदी उपस्थित होत्या.या कार्यक्रमानंतर मासिक पाळी बद्दल शास्त्रशुद्ध माहिती व पाळी बद्दल शास्त्रीय दृष्टीकोन तयार करण्यासाठी पुरक अशा शर्वरी-सचिन लिखित "प-पाळीचा"या किशोरी आरोग्य पुस्तिकेचे सर्व महिला व मुलींना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी कांबळे केले तर आभार पवन कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वा.रा.ती.म.विद्यापीठ उपकेंद्र लातुर चे विद्यार्थी आश्विन कंजे, संभाजी कांबळे, सुषमा कोकाटे व पवन कांबळे यांनी प्रयत्न केले.

Thursday, March 18, 2021

*प्रहार जनशक्ती पक्षाच्या लातूर जिल्हाउपाध्यक्षपदी विनोद तेलंगे..*

*प्रहार जनशक्ती पक्षाच्या लातूर जिल्हाउपाध्यक्षपदी विनोद तेलंगे..*
उदगिर (प्रतिनिधी):- उदगीर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे यांच्या कामाची दखल घेउन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, तथा राज्यमंञी बच्चुभाऊ कडु स यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोदभाऊ कुदळे , महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ यांच्या  मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या लातूर जिल्हाउपाध्यक्षपदी  निवड करणात आली आहे.
विनोद तेलंगे दोन वर्षोंपासुन प्रहार जनशक्ती पक्षाचे 
तालुका अध्यक्ष पदावर काम करत असताना उदगीर शहरात व तालुकायात प्रहार जनशक्ती पक्षाचे गाव तिथे शाखा ,शाखा तिथं कार्यकर्ते करत पक्षाची ताकद वाढविन्याचे  प्रयत्नं केले.त्याचबरोबर प्रहार च्या माध्यमातून सर्व सामन्याचे , शेतकरी, कष्टकरी,दिनदुबळ्याचे व अपंग बांधवांच्या समस्या साठी पुढाकार घेऊन न्याय देण्यासाठी प्रयन्त  करत असतात.
कमी काळत  प्रशासन वचक निर्माण केली आहे.या सर्व कामाची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष लातुर उपजिल्हाप्रमुख पदी यांची निवड लातुर जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले यांनी केली.वउदगीर ,जळकोट व देवणी या तीन तालुक्याची  जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.सदरील नियुक्तीपत्र लातूर येथील बैठीकीत देण्यात आले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय भोज, सातपुते मामा, बाळू आमले, मोसीन शेख संदीप पवार , महादेव आपटे, महादेव मोतीपवळे ,रविकिरण बेळकुंदे , व पदाधिकारी व प्रहारसेवक उपस्थित होते.निवडीबदल विनोद तेलंगे सर्वत्र्  अभिनंदन होत आहे.

*प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर तालुका अध्यक्ष पदी रविकिरण बेळकुंदे यांची निवड...*

*प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर तालुका अध्यक्ष पदी रविकिरण बेळकुंदे यांची निवड...*

उदगिर(प्रतिनिधी):-वंदनीय राज्यमंञी बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोदभाऊ कुदळे , महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ, लातूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या  मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाऊ तेलंगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 17/03/2021 रोजी प्रहार च्या माध्यमातून सर्व सामन्याचे , शेतकरी, कष्टकरी,दिनदुबळे, आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांनाची व अपंग बांधवांच्या समस्या साठी पुढाकार घेऊन न्याय देण्यासाठी प्रयन्त करणारे रविकिरण बेळकुंदे यांची प्रहार जनशक्ती पक्ष उदगीरच्या तालुकाध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली ...
यावेळी तालुका सह -संपर्क प्रमुख सुनील केंद्रे, तालुका सचिव - महादेव आपटे, तालुका उपाध्यक्ष-संदीप पवार , तालुका उपाध्यक्ष - महादेव मोतीपवळे, तालुका संघटक - सूर्यभान चिखले ,तालुका सरचिटणीस अविनाश शिंदे , तालुका सरचिटणीस सुदर्शन सूर्यवंशी , नळगीर सर्कल प्रमुख विलास भंडे, शहर संपर्क प्रमुख - चंद्रकांत भोसगे , शहर कार्याध्यक्ष - गणेश दावणे, शहर सह-सचिव बालाजी बिरादार ,शहर सचिव - चरणसिंह चौहान, तालुका चिटणीस - रवी आदेप्पा ,तालुका प्रसिद्धी प्रमुख अभय कुलकर्णी, महिला तालुका अध्यक्षा- कांचन भोसगे , तालुका कार्याध्यक्ष -शकुंतला रोडेवाड, तालुका सरचिटणीस -प्रेमलता भंडे,तालुका सरचिटणीस - जयश्री चव्हाण , तालुका संघटक- लता कोळी इतर पदाधिकारी व प्रहारसेवक उपस्थित राहुन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...

Tuesday, March 9, 2021

उदगीर मतदारसंघातील विकास कामासाठी अर्थसंकल्पात 74 कोटीची मंजूरी - राज्यमंत्री सजंय बनसोडे

उदगीर मतदारसंघातील विकास कामासाठी अर्थसंकल्पात  74 कोटीची मंजूरी
                       - राज्यमंत्री सजंय बनसोडे 
 लातूर दि.9(जिमाका):-जिलह्यातील उदगीर-जळकोट मतदारसंघातील विकास कामासाठी राज्य शासनाने सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात सुमारे 74 कोटीची अर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे.यामध्ये उदगीर बनशेळकी उड्डानपुल, शिरुर ताजबंद ते उदगीर रस्ता व अन्य कामाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
              सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील राज्याचा अर्थसंकल्प आज विधानभवनात सादर करण्यात आला.  या अर्थसंकल्पात उदगीर मतदार संघाच्या विकासाला शासनाने भरीव अशी अर्थिक तरतुद केली आहे.  उदगीर येथील बनशेळकी उड्डानपुलासाठी ३५ कोटी   उदगीर शिरुर ताजबंद रस्ता २२ कोटी  बांधकाम विभागाचे कार्यालय बांधकामास ६.७५ कोटी, वाढवणा गुडसुर अतनुर रस्ता ३. ०५ कोटी, कुमठा भाकसखेडा पोचमार्गासह पुलाचे बांधकाम या साठी सुमारे ९ .५० कोटीची तरतुद करण्यात आली आहे. 
मतदार संघातील विविध विकास कामासाठी 74 कोटीची तरतुदीस या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

*प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी च्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न..*

*प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी  च्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न..*
उदगीर प्रतिनिधी:- दिनांक 8/03/2021 रोजी जागतिक महिला दिनानिमित्य प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी उदगीर च्या वतीने , आदर्श महिला आणि कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून ड्युटी उत्कृष्टरित्या पार पाडलेले पोलीस , डॉक्टर , वकील, अंगणवाडी सेविका , यांचा आदर्श महिला आणि कोरोना योद्धा म्हणून प्रहार महिला आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला . 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रहार संहसंपर्क प्रमुख श्री .सुनील केंद्रे , प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुप्रिया जगताप मॅडम, सौ.संगीता बोडके,सो. हाके मॅडम ,अंगणवाडी सुपरवायझर - संगीता हुलसुरकर मॅडम , निडेबन अंगणवाडी सेविका - चंचला हुगे , सोमनापूर अंगणवाडी सेविका -  रंजना शिंदे,  संगीता तोंडारे , सुनीता राठोड ,आदर्श महिला म्हणून प्रेमलता भंडे , सारिका मोतीपवळे ,ज्योती दावणे ,अँडव्हेकेट वर्षा कांबळे मँडम . यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्र संचलन :  रोडेवाड शकुंतला प्रास्ताविक : विजयमाला पवार  आभार : शकुंतला रोडेवाड  संभाषण :  सुजाता देवरे ,लता कोळी यांनी केले ...
महिला अध्यक्ष - कांचन भोसगे तालुका उपाध्यक्ष - विजयमला पवार ता.उपाध्यक्ष - सुजाता देवरे , तालुका सचिव - रचना हल्लाळे, तालुका कार्याध्यक्ष - शकुंतला रोडेवाड, तालुका संघटक - लता कोळी , तालुका सरचिटणीस - प्रेमलता भंडे ,तालुका सरचिटणीस - जयश्री चव्हाण ,तालुका चिटणीस -  विजयमला मठपती , तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे , तालुका उपाध्यक्ष - संदीप पवार , शहर संपर्क प्रमुख - चंद्रकांत भोसगे , तालुका उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे , तालुका प्रसिद्धी प्रमुख - अभय कुलकर्णी , शहर सह - सचिव - बालाजी बिरादार , तालुका चिटणीस - रवी आदेप्पा .कार्यक्रमास अनेक महिला मंडळ उपस्थित होते ....

Monday, March 8, 2021

*पायाभूत विकासाबरोबर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विकास साधणारा अर्थसंकल्प* -राज्यमंत्री संजय बनसोडे *हा अर्थसंकल्प म्हणजे प्रादेशिक समतोल साधून विकासाला चालना देणारा आहे*

*पायाभूत विकासाबरोबर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विकास साधणारा अर्थसंकल्प* 
        -राज्यमंत्री संजय बनसोडे    

*हा अर्थसंकल्प म्हणजे प्रादेशिक समतोल साधून विकासाला चालना देणारा आहे*


मुंबई, दि.8:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासाठी भरीवआर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात दहा हजार किमी रस्त्याचे कामे आगामी काळात करण्यात येणार आहेत. तसेच या सोबत समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय व आदिवासी विभागातील  विविध योजनांसाठी   तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. 
     सन 2021 -22 चा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला या अर्थसंकल्पातुन शेतकरी, कष्टकरी सामान्य नागरिकांना यांना दिलासा मिळणार आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने  तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या सौर ऊर्जा जोडणी साठी पंधराशे कोटी महावितरण कंपनीला देण्यात ची तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प प्रादेशिक समतोल व  विकासाला चालना देणारा असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.
      मराठवाड्याच्या पायाभूत विकासासाठी या अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग आणि नासिक-मुबई मार्गावर मेगा इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधांसाठी सात हजार पाच कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  सामाजिक न्याय विभागा मार्फत  राबविण्यात येणाऱ्या विविध मंडळाना यात बार्टी, सारथी यांना 150 कोटीची तरतूद करण्यात आली. सामाजिक न्यायच्या भुमिकेतून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे संसदीय कार्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
              ******