Monday, March 8, 2021

*पायाभूत विकासाबरोबर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विकास साधणारा अर्थसंकल्प* -राज्यमंत्री संजय बनसोडे *हा अर्थसंकल्प म्हणजे प्रादेशिक समतोल साधून विकासाला चालना देणारा आहे*

*पायाभूत विकासाबरोबर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विकास साधणारा अर्थसंकल्प* 
        -राज्यमंत्री संजय बनसोडे    

*हा अर्थसंकल्प म्हणजे प्रादेशिक समतोल साधून विकासाला चालना देणारा आहे*


मुंबई, दि.8:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासाठी भरीवआर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात दहा हजार किमी रस्त्याचे कामे आगामी काळात करण्यात येणार आहेत. तसेच या सोबत समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय व आदिवासी विभागातील  विविध योजनांसाठी   तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. 
     सन 2021 -22 चा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला या अर्थसंकल्पातुन शेतकरी, कष्टकरी सामान्य नागरिकांना यांना दिलासा मिळणार आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने  तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या सौर ऊर्जा जोडणी साठी पंधराशे कोटी महावितरण कंपनीला देण्यात ची तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प प्रादेशिक समतोल व  विकासाला चालना देणारा असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.
      मराठवाड्याच्या पायाभूत विकासासाठी या अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग आणि नासिक-मुबई मार्गावर मेगा इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधांसाठी सात हजार पाच कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  सामाजिक न्याय विभागा मार्फत  राबविण्यात येणाऱ्या विविध मंडळाना यात बार्टी, सारथी यांना 150 कोटीची तरतूद करण्यात आली. सामाजिक न्यायच्या भुमिकेतून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे संसदीय कार्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
              ******

No comments:

Post a Comment