Sunday, March 28, 2021

सिरशी येथे मासिक पाळी विषयी कार्यक्रम संपन्न.

सिरशी येथे मासिक पाळी विषयी कार्यक्रम संपन्न.
वार्ताहर:-लातुर तालुक्यातील सिरशी गावात मासिक पाळी विषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.सुषमा कोकाटे यांनी उपस्थित महिला व मुलींना मासिक पाळी बद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन करून मासिक पाळीचे चक्र, सकस आहार, पाळीत वापरावयाचे शोषक साहित्य, सॅनिटरी पॅड वापरण्याची पद्धत, पॅडची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल सखोल माहिती दिली. त्यानंतर आश्विन कंजे यांनी ज्या मासिक पाळीमुळे आपल्या सर्वांचा जन्म होतो ती पाळी अपवित्र असु शकत  नाही व मासिक पाळी ही नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे त्याचा देवाशी,धर्माशी,पवित्रतेशी कसलाही संबंध नाही हे सांगून वयात येताना होणारे भावनिक बदल,निर्माण होणारी शारिरीक आव्हाने, पाळीच्या त्रासावर उपाय, पाळीत घ्यावयाचा आहार याविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास सरपंच कौशल्या कांबळे, आशा स्वयंसेविका सुमन जाधव, सिआरपी अभिषक्ता कदम, सुमित्रा डोरले, गीता जाधव, सुमन शेळके,प्रिया शिंदे,शुभांगी जाधव, प्रिती शिंदे आदी उपस्थित होत्या.या कार्यक्रमानंतर मासिक पाळी बद्दल शास्त्रशुद्ध माहिती व पाळी बद्दल शास्त्रीय दृष्टीकोन तयार करण्यासाठी पुरक अशा शर्वरी-सचिन लिखित "प-पाळीचा"या किशोरी आरोग्य पुस्तिकेचे सर्व महिला व मुलींना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी कांबळे केले तर आभार पवन कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वा.रा.ती.म.विद्यापीठ उपकेंद्र लातुर चे विद्यार्थी आश्विन कंजे, संभाजी कांबळे, सुषमा कोकाटे व पवन कांबळे यांनी प्रयत्न केले.

2 comments:

  1. खुप खुप धन्यवाद सर.

    ReplyDelete
  2. ही बातमी प्रसिद्ध करून केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर...🙏

    ReplyDelete