*राजीवभाऊ च्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली-श्रीकांत जाधव कबनुरकर*
वार्ताहर:-मराठवाड्याच्या या भूमीला नेतृत्वाची खान असच मनाव लागेल अगदी इतिहास काळापासून ते इंग्रजांशी आणि निजामांशी स्वतंत्र लढा असेल या भूमीने या देशाला अनमोल हिरे दिलेले आहेत. यात शिवाजीराव देशमुख (तत्कालीन पार्लमेंट सेक्रेटरी पंतप्रधान इंदिरा गांधी), शंकरराव चव्हाण (केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री, मुख्यमंत्री) विलासराव देशमुख (पुर्व मुख्यमंत्री) गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असे महान नेतृत्व लाभले आहे त्यांनी या राज्यासाठी, ज्यांनी या देशासाठी अगणित कामे करून ठेवली आहेत. याच नेतृत्वाचा वारसा मा.राजीवजी सातव याच्या रूपाने आपल्याला लाभल होता पंचायत समिती सदस्य, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, गुजरात काँग्रेसचे प्रभारी, आपल्या उल्लेखनीय कार्यातून सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळविणारे सुप्रिया सुळे नंतरचे दुसरे खासदार.आम्ही आपल्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची अनेक स्वप्ने पहिलीत भाऊ, आपल्याला या राज्याच नव्हे तर देशाच नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर करायच होत. पण आपण आज आम्हाला पोरकं केलेत महाराष्ट्र राज्याची पर्यायाने देशाची ही हानी कधीही भरून निघणार नाही आपल्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे असे मत विद्यार्थी नेते तथा "मास" विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी व्यक्त केले..
No comments:
Post a Comment