Saturday, October 31, 2020

उदयगिरीत 'रासेयो' च्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा..

उदयगिरीत 'रासेयो' च्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा.
उदगीर : (31 ऑक्टोंबर 2020 )  येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात रामायण रचेता वाल्मीक ऋषी, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन  करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.मनोहरराव पटवारी यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ उपस्थितांना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर .आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा. डॉ.मकबूल अहमद, प्रा. डॉ. ए. यू. नागरगोजे तसेच अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती.

Sunday, October 25, 2020

*राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांनी दिले आठ दिवसामध्ये दिव्यांगाचे प्रश्न विशेष बैठक घेवून निकाली काढण्याचे आदेश.*

*राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांनी दिले आठ दिवसामध्ये दिव्यांगाचे प्रश्न विशेष बैठक घेवून निकाली काढण्याचे आदेश.*
उदगीर(वार्ताहर):-प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे यांनी 1/09/20 रोजी  दिलेल्या निवेदानाची दखल घेवून दि.आज 25/10/20 रोजी मा.ना.संजय बनसोडे साहेब यांना दिव्यांगाची बैठक लावून  आठ दिवसांत दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लावण्यास संबंधित अधिकारी यांना निर्देश देवुन सर्व दिव्यांगाचे प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले आज शासकीय दौऱ्यावर आले असता बैठकीचे नियोजन केले असता आज दिव्यांग बांधवानची नवीन शासकीय विश्राम ग्रह उदगीर येथे प्रहार अध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगाची बैठक सम्पन्न झाली ...
         बैठकीतील मुद्दे ..
 1) उदगीर तालुक्यातील  दिव्यांगाना त्यांच्या हक्काचा योजनांचा लाभ मिळणे बाबत , आणि उदगीर तालुक्यातील ग्रामपंचायत मधील  5% निधी त्वरित वाटप करण्यात यावा. 
2) संजय गांधी निराधार योजना, उदगीर शहर नगर परिषदेतील दिव्यांगाचा 5 % निधी मिळणे बाबत.
3)दिव्यांगाना शासन निर्णय नुसार अत्योदय योजनेत समाविष्ट करणे. 
4) उदगीर तालुक्यातील शासकीय रुग्णालयातील दिव्यांग व्यक्तीचे ऑनलाइन मेडिकल प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात यावे.. 
5) दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या जागेत दुकान देण्यात यावे.. 
6) शासन निर्णय नुसार दिव्यांग बांधवांना विनाअट घरकुल देण्यात यावे ... 
दिव्यांगा चा हक्काचा निधी तात्काळ वाटप करा. असे दिव्यांगाच्या अनेक समस्या बद्दल बैठकीत मागणी करण्यात आली.येत्या
 आठ दिवसांमध्ये जर शासन निर्णय प्रमाणे उदगीर तालुक्यातील दिव्यांगाचे प्रश्न मार्गी न लागल्यास सर्व दिव्यांग बांधवा सहीत प्रहार च्या वतीने प्रशासनाच्या विरोधात आदोंलन उभा करून प्रहार च्या वतीने दिव्यांगाना न्याय मिळून देवू .
  यावेळी बैठकीत प्रमुख उपस्थितीत उदगीर ता.अध्यक्ष- विनोदभाऊ तेलंगे, तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे,तालुका उपाध्यक्ष- संदीप पवार ,, उपाध्यक्ष-  महादेव मोतीपवळे , ता. सचिव - महादेव आपटे ,ता. संघटक- सूर्यभान मामा चिखले ,विद्यार्थी आघाडी ता. उपाध्यक्ष अजय गंभिरे ता.चिटणीस - नीलकंठ ता.सरचिटणीस अविनाश शिंदे मुधोळकर , शहर सह- सचिव - बालाजी बिरादार, ता चिटणीस गिरीजप्पा नवरखेले,ता.सह- सचिव संगम वडले,शहर कार्यध्यक्ष-गणेश डावने, शहर संघटक- प्रदीप पत्की,  ,ता.चिटणीस- रवी आदेप्पा, शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे, दिव्यांग बांधव ,सचिन सोलापूरे , कावळे महादेव, कांबळे नरसिंग ,काकडे बालाजी प्रभात देशपांडे ,संदीप सुर्यवंशी गणेश कांबळे रामजी पिंपरे असंख्य दिव्यांग व प्रहार सेवक इत्यादी उपस्थित होते.

Thursday, October 22, 2020

*प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी..**राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी..*

*प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी..*
*राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी..*
वार्ताहर:-राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व पवार साहेबांनी मेहबूबभाई यांना विधान परिषदेत एक संधी द्यावी असा खंबीर खमक्या निर्भीड संघर्षशील नेता सदैव युवकांसाठी रस्त्यावर उतरणारा नेता,म्हणून मेहबूबभाई शेख यांच्याकडे पाहिलं जातं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतेवेळी पवार साहेबांनी एका सर्वसामान्य अल्पसंख्याक युवकाला युवक प्रदेश अध्यक्ष पदावर बसविले व मेहबूबभाई शेख यांनी युवकांची कामे मार्गी लावण्याचे काम आज पण करत आहेत सरकारविरोधात उच्च न्यायालयात जाऊन मेहबूबभाई यांनी चारा छावणीवर घातलेल्या जाचक अटी उठवल्या होत्या.राष्ट्रवादी युवक चे पद स्वीकारताच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्या समोर आंदोलन केले गाजर नको रोजगार हवा यासाठी प्रतिकात्मक गळफास आंदोलन, रस्ता रोको करून बेरोजगारांचा आवाज दिल्लीमध्ये पोहचविला, जनसामान्यांच्या आवाज थाळी नादाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहचविणारा, पुरग्रस्तांसोबत आपली दिवाळी साजरी करणारा,भाजप सरकार व मुख्यमंत्री यांच्यावर बेधडक टीका करणारा,प्रत्येक नेत्यांचा विश्वास जिंकून त्यांना आपलंसं करणारा,आपल्या माणसासोबत आपुलकीने संवाद साधणारा अश्या सर्वगुणसंपन्न कार्यकर्त्याला पवार साहेबांनी एक संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी केली आहे..

Tuesday, October 20, 2020

*शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या.* *प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी.*

*शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या.*
 *प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी.*
उदगीर(श्रीकांत जाधव):-अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे उदगीर तालुकासह आजुबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी मागच्या काही दिवसात सोयाबीनची काढणी केली होती आणि रास करणे शिल्लक होते.पंरतु गेल्या आठ दिवसात उदगीर परिसरात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे तसेच तुरी व अन्य पिकांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे तरी संबंधित शेतकऱ्यांना शासनांमार्फत सरसकट भरपाई देण्यात यावी  असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा.उपजिल्हाधिकारी साहेब उदगीर यांच्या मार्फत मा .मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रहार अध्यक्ष विनोद तेलंगे, कार्याध्यक्ष रवि बेलकुदे,उपाध्यक्ष महादेव मोती पवळे,संदीप पवार, संघटक सुर्यभान चिखले, सरचिटणीस अविनाश शिंदे चिटणीस निळंकठ मुदोळकर, शहर कार्याध्यक्ष गणेश दावणे चंद्रकांत येंजगे सर व इतर प्रहार सेवकांनी निवेदन दिले आहे..

Thursday, October 15, 2020

*मा.राजेश्वरजी निटुरे सावकार यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन बरे होण्या करिता आई जगदंबा येथे अभिषेक.* *राजेश्वर भाटे मित्र मंडळाचा पुढाकार.*

*मा.राजेश्वरजी निटुरे सावकार यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन बरे होण्या करिता  आई जगदंबा येथे अभिषेक.*

*राजेश्वर भाटे मित्र मंडळाचा पुढाकार.*

उदगीर(श्रीकांत जाधव):-उदगीर नगरीचे माजी नगराध्यक्ष मा.राजेश्वरजी निटुरे सावकार यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन बरे होण्या करिता  आई जगदंबा येथे अभिषेक  दि.१3/१०\२०रोजी वार मंगळवार  सकाळी 10 वाजता राजेश्वर भाटे मित्र मंडळा कडून सोमनाथपूर येथील जागृत आई जगदंबेच्या मंदिर येथे महाअभिषेक करण्यात आला त्याप्रसंगी राम पाटील सरपंच,राजेश्वर भाटे, अमित माडे, संजय राठोड, प्रमोद हुडगे.यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अभिषेक सोहळा पार पडला.. तरी त्या प्रसंगी सर्वांनी मनोभावी प्रार्थना केली मा. राजेश्वरजी निटुरे सावकार बरे होवे हीच आई जगदंबेला साकडे घालण्यात आले..

*कौडगाव ते ढोरसांगवी रस्ता होईल का ?* *युवा नेते विकासभाऊ ढाकणे यांचा प्रश्न..*

*कौडगाव ते ढोरसांगवी रस्ता होईल का ?*

*युवा नेते विकासभाऊ ढाकणे यांचा प्रश्न..*

अहमदपूर(श्रीकांत जाधव):-कौडगाव पो. कुमठा ( बु.) ता.अहमदपूर जि.लातूर येथील, कौडगाव ते ढोरसांगावी हा रस्ता स्वतोंत्रोतर काळापासून रखडला आहे गावातील सर्व दळणवळण याचं रस्त्यावर अवलंबून असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी याचं रस्त्या ने जावे लागते रस्ता मंजूर होण्यासाठी  विकास ढाकणे  सरपंच माणिकराव गंगाजी यांनी तत्कालीन मंत्री ना.पंकाजाताई मुंडे- पालवे ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अर्ज दिले व जिल्हा परिषद, माजी आमदार , चालू आमदार फक्त रोड विषयी आश्वासन देत आहेत म्हणून गावकरी मंडळी खुप संकटात आहेत ,,,,,!!

*उदयगिरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.*

*उदयगिरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.*

  उदगीर(श्रीकांत जाधव):-उदगीर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारताचे 11 वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.मनोहरराव पटवारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर .आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, दिनविशेष समिती प्रमुख डॉ. दीपक चिद्दरवार, डॉ. मल्लेश झुंगास्वामी, डॉ. हमीद आश्रफ, ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार तसेच अनेक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

*उदगीर कोविड-19 रुग्णालय येथील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्याचे थेट प्रक्षेपण बाहेर स्क्रीन वर करा.* *प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*

*उदगीर कोविड-19 रुग्णालय येथील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्याचे थेट प्रक्षेपण बाहेर स्क्रीन वर करा.*

*प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*

उदगीर(श्रीकांत जाधव):- उदगीर शहरातील व ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे रुग्णांची जास्ती प्रमाणात भर पडत आहे. कोविड सेंटर येथील  रुग्णाच्या नातेवाईकात आणि सर्व सामान्य जनतेला असा प्रश्न पडला आहे की शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 सेंटर येथे रुग्णावर चांगल्या प्रकारे उपचार होत नाहीत. यातून रुग्णाचें नातेवाईक आणि जनतेच्या मनात डॉक्टरांबद्दल अविश्वास निर्माण होत आहे जे उपचार रुग्णांवर उपचार केले जातात ते सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्याचे थेट प्रक्षेपण बाहेर स्क्रीन वर करून डॉक्टर व रुग्ण च्या नातेवाईकांन मध्ये होणारे गैरसमज दुर व्हावे या साठी उपजिल्हाधिकारी साहेब यांना कोविड सेंटर येथील सी.सी.टी.व्ही.कँमरे बसवून थेट प्रक्षेपण बाहेर करावे असे निवेदन देण्यात आले .या वेळी प्रहार तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे , तालुका कार्याध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, तालुका उपाध्यक्ष-महादेव मोतीपवळे, ता. उपाध्यक्ष- संदीप पवार , ता. सहसचिव-महादेव आपटे, ता.सह-संपर्क प्रमुख सुनील केंद्रे, ता.सरचिटणीस-अविनाश शिंदे , ता.प्रसिद्धी प्रमुख -अभय कुलकर्णी.इत्यादी प्रहार सेवक  उपस्थित होते...

Tuesday, October 6, 2020

*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्हा उपाध्यक्ष पदी संग्राम पवार यांची निवड.*

*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्हा उपाध्यक्ष पदी संग्राम पवार यांची निवड.*
अहमदपूर:-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिलदादा गव्हाणे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष मा.आमदार बाबासाहेबजी पाटीलसाहेब यांच्या व मराठवाडा अध्यक्ष प्रंशातजी कदम यांच्या मान्यतेने लातूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये अहमदपूर तालुक्याचं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष म्हणून योग्य जबाबदारी सांभाळून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केलेले व देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम करून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवलेले विद्यार्थी नेते संग्राम पवार यांची पक्षाने दखल घेऊन जिल्हा कार्यकरिणीवर उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली या निवडीबद्दल संग्राम पवार यांचे विविध स्तरातून स्वागत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो अशी भावना लोकांची झाली आहे..    
               या निवडीसह जिल्ह्यातील  तालुका व जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात येत आहे व या जि कार्यकारिणी शिवाय ईतर कोणताही पदाधिकारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर च्या  कार्यकारिणीवर नाही व उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर चे जिल्हाध्यक्ष आशिष वाघमारे यांनी दिली आहे.

Thursday, October 1, 2020

*उदगीरच्या अर्धवट ट्रामा केअरच्या बांधकामासाठी २.७६ कोटीच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता* - संजय बनसोडे

*उदगीरच्या अर्धवट ट्रामा केअरच्या बांधकामासाठी २.७६ कोटीच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता*

  - संजय बनसोडे

 मुंबई /उदगीर दि. १/ १० /२०२०
उदगीर येथील ट्रामा केअर सेंटर च्या दुसर्‍या टप्प्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने 2.76.60 लक्ष निधी साठीची प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर ट्रामा केअर सेंटर चे बांधकाम सन २०१३ मध्ये सुरू करण्यात आले होते. 

परंतु सदर ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम निधीअभावी अर्धवट स्थितीमध्ये होते त्यामुळे ट्रामा केअर सेंटरची इमारत वापरात नव्हती. अनेक वर्षे धुळखात पडलेल्या ट्रामा केअर सेंटर चालु करण्याबाबत व निधीसाठी ना. संजय बनसोडे यांनी विशेष लक्ष घातले होते व त्यासाठी पालकमंत्री मा. ना. श्री. अमित देशमुख साहेब यांच्या मान्यतेने आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांनी २७६.६० लक्ष इतक्या रकमेचा बांधकामाचा प्रस्ताव  शासनास सादर केला होता. 

सध्या स्थितीत लातूर जिल्ह्यामध्ये covid-19 रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे त्यासाठी अपूर्ण असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्ण होणे अत्यंत आवश्यक होते जेणेकरून या इमारतीमध्ये DEDICATED COVID HOSPITAL ( DCH )  सुरू करून रुग्ण सेवा देणे गरजेचे होते. वाढती रुग्ण संख्या पाहता हे काम तात्काळ होणे गरजेचे होते. यासाठी राज्य शासनाने ट्रामा केअर सेंटर च्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामांसाठी २.७६ लाख रू. निधीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

यासाठी मागील ५ महिन्यापासून मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब,वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. अमित विलासराव देशमुख साहेब, मा. ना. श्री. राजेश टोपे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सदरील निधी मंजूर करून घेतला आहे,त्यामुळे अनेक वर्षे धूळ खात पडलेला ट्रामा केअर सेंटर चा प्रश्न  लवकरच मार्गी  लागणार आहे ,त्यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ट्रामा केअर सेंटर प्रकल्प पूर्णत्वाला जाऊन सर्व सामान्य नागरिकाच्या आरोग्य सेवेसाठी तयार होणार आहे.