*प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*
उदगीर(श्रीकांत जाधव):- उदगीर शहरातील व ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे रुग्णांची जास्ती प्रमाणात भर पडत आहे. कोविड सेंटर येथील रुग्णाच्या नातेवाईकात आणि सर्व सामान्य जनतेला असा प्रश्न पडला आहे की शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 सेंटर येथे रुग्णावर चांगल्या प्रकारे उपचार होत नाहीत. यातून रुग्णाचें नातेवाईक आणि जनतेच्या मनात डॉक्टरांबद्दल अविश्वास निर्माण होत आहे जे उपचार रुग्णांवर उपचार केले जातात ते सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्याचे थेट प्रक्षेपण बाहेर स्क्रीन वर करून डॉक्टर व रुग्ण च्या नातेवाईकांन मध्ये होणारे गैरसमज दुर व्हावे या साठी उपजिल्हाधिकारी साहेब यांना कोविड सेंटर येथील सी.सी.टी.व्ही.कँमरे बसवून थेट प्रक्षेपण बाहेर करावे असे निवेदन देण्यात आले .या वेळी प्रहार तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे , तालुका कार्याध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, तालुका उपाध्यक्ष-महादेव मोतीपवळे, ता. उपाध्यक्ष- संदीप पवार , ता. सहसचिव-महादेव आपटे, ता.सह-संपर्क प्रमुख सुनील केंद्रे, ता.सरचिटणीस-अविनाश शिंदे , ता.प्रसिद्धी प्रमुख -अभय कुलकर्णी.इत्यादी प्रहार सेवक उपस्थित होते...
No comments:
Post a Comment