*उदयगिरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.*
उदगीर(श्रीकांत जाधव):-उदगीर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारताचे 11 वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.मनोहरराव पटवारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर .आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, दिनविशेष समिती प्रमुख डॉ. दीपक चिद्दरवार, डॉ. मल्लेश झुंगास्वामी, डॉ. हमीद आश्रफ, ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार तसेच अनेक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment