*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्हा उपाध्यक्ष पदी संग्राम पवार यांची निवड.*
अहमदपूर:-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिलदादा गव्हाणे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष मा.आमदार बाबासाहेबजी पाटीलसाहेब यांच्या व मराठवाडा अध्यक्ष प्रंशातजी कदम यांच्या मान्यतेने लातूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये अहमदपूर तालुक्याचं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष म्हणून योग्य जबाबदारी सांभाळून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केलेले व देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम करून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवलेले विद्यार्थी नेते संग्राम पवार यांची पक्षाने दखल घेऊन जिल्हा कार्यकरिणीवर उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली या निवडीबद्दल संग्राम पवार यांचे विविध स्तरातून स्वागत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो अशी भावना लोकांची झाली आहे..
या निवडीसह जिल्ह्यातील तालुका व जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात येत आहे व या जि कार्यकारिणी शिवाय ईतर कोणताही पदाधिकारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर च्या कार्यकारिणीवर नाही व उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर चे जिल्हाध्यक्ष आशिष वाघमारे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment