Friday, February 19, 2021

*उदगीर शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी* *सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करू या!* *-राज्यमंत्री संजय बनसोडे*

*उदगीर शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी*  
*सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करू या!*
                   *-राज्यमंत्री संजय बनसोडे*


*उदगीरमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूच्या प्रदर्शनाचे राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 

*उदगीर शहराचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नगर परिषेदेकडून राज्यमंत्री बनसोडे यांचा सत्कार*


लातूर/उदगीर, दि.(जिमाका):- उदगीर शहर व तालुक्यात सर्व आवश्यक पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे व तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू या, असे आवाहन संसदीय कार्य, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
      दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या माध्यमातून सुरु असलेल्या शहरी बेघर निवारा बांधव व आधार बहुविकलांग बांधव यांच्या माध्यमातून सलात अल्पसंख्यांक बहुद्देशीय सेवाभावी संस्था रोटी कपडा बँकेने टाकावू वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्यांचे भव्य प्रदर्शन नगर परिषेदेच्या प्रांगणामध्ये आयोजित केले असून त्याचे उदघाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. 
     यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेटी, तहसिलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी भारत राठोड, उपमुख्याधिकारी असिफखान गोलंदाज, शहर अभियंता सल्लाओद्दिन काझी, नागनाथ निडवदे,चंदन पाटील नागराळकर,
सभापती मनोज पुदाले, सावन पस्तापुरे, न.प.सदस्य दत्ता पाटील व बचत गटाच्या महिला व नागरिक  उपस्थित होते.
    राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, उदगीर शहराचा पर्यायाने तालुक्याचा विकास हा सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. उदगीर शहरामधील नाट्यगृह, शादीखाना, अभ्यासिका व लिंगायत भवन चा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. तर दलित वस्ती साठी अपेक्षित निधी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) वसाहत, शहरातून जाणारा  द्रुतगती मार्गाचा, बस स्थानकाचा, हत्तीबेटचा विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
     महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी अभियान म्हणून सुरु करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी नगर परिषदेत गतीने सुरू असून त्यातून पर्यावरण रक्षण व संवर्धन करणे, शहर प्रदूषण मुक्त करणे त्यासाठी सायकल रॅली, कार्यालयांमध्ये एक दिवस पेट्रोल-डिझेलचे वाहने न आणने, एक दिवस सायकलने प्रवास करणे आदी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असून यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.
   माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून आयोजित केलेल्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूच्या प्रदर्शन व विक्रीचा नगर परिषदेने घेतलेला हा उपक्रम अत्यंत चांगला असून या उपक्रमासाठी शासनाकडून जे सहकार्य आवश्यक असेल ते सर्व सहकार्य करण्यात येईल. हा उपक्रम सर्वांसाठी आदर्शवत उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले.
     जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे यांनी उदगीरच्या विकासाकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगून यापूर्वी शहराच्या हद्दवाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये जिल्हा परिषदेचा महत्वाचा सहभाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
     यावेळी उदगीर नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे  यांचा नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व उपाध्यक्ष सुधीर भोसले यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. 
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी करून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले तर आभार गौस शेख यांनी मानले.
         **********

No comments:

Post a Comment