Thursday, April 22, 2021

*तळणी प्रा आरोग्य केंद्रात स्वतंत्र रुग्णवाहिका ऊपलब्ध करून द्यावी:-तुषार देशमुख*

*तळणी प्रा आरोग्य केंद्रात स्वतंत्र रुग्णवाहिका ऊपलब्ध करून द्यावी:-तुषार देशमुख*
नांदेड(प्रतिनिधी):-दिवसेंदिवस चिंताजनक कोरोना विषाणुजन्य परिस्थिती चितांजनक होतीय या अनुषंगाने तळणी ता हदगाव जि नांदेड येथे प्रार्थमिक आरोग्य केंद्र असून तळणी हे गाव* *प्रामुख्याने जि प गटातील महत्त्वाचे/व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असुन मुख्यत या गावशी परिसरातील ईतर गावखेड्याची दळवळनाच्या निमीत्ताने नागरीकांची मोठ्या प्रमाणात आवक /जावक असते या अनुषंगाने तळणी येथे पुर्वीचे जवळपास १९९० च्या दशकापूर्वीपासुन प्रा आरोग्य केंद्र कार्यान्वित आहे ते काळानुसार मोठ्या क्षमतेचे व अधीकच्या सोयीसुवीधायुक्त नुसार बदलने अपेक्षित होते,विशेष बाब मुळात तळणी ह्या गावची* *लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२००० हजारांहून अधिक आहे तळणी हा पं स गण /जि प गट आहे परिणामी लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र क्षमता कमी आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते आहे कधीकधी अत्यावश्यकवेळी पुढील अतिदक्षता स्तरीय, आॅक्सीजनयुक्त ऊपचाराची सुवीधा असलेले कुठलेही ईस्पीतळ जवळपास ऊपलब्ध नाहीये अशातच अत्यावस्थ,रुग्न गर्भवती* *महिला,अपघातग्रस्त रुग्ण यांना उपचारासाठी रुग्णवाहीकेची सुध्दा कमतरता भासत आहेव आता संपुर्ण जगभरात मुत्युचे थैमान घालत असलेल्या कोरोनानेही दुसऱ्या लाटेच्या रुपात पुन्हा कहर केला,या सर्व बाबींचा ईतर मतदारसंघा प्रमाणे आमच्या भागाचा सहानुभूतीपुर्वक विचार कराल अशा मागणीचे निवेदन प्रत्यक्ष भेट घेऊन तुषार देशमुख यांनी हिंगोली लोकसभा क्षेत्राचे* *खासदार,हेमंत पाटील व राज्याचे आरोग्य मंत्री मा ना राजेशभैया टोपे   तसेच आरोग्य राज्यमंत्री ना राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कडे केली आहे शेवटी विनंती करताना सर्व बाबींचा गांभीर्यापुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्याल हाच आशावाद व्यक्त केलाय.

*विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्यच्या जिल्हाध्यक्ष पदी शंभू बापूराव सुर्यवंशी तर युवती जिल्हाध्यक्ष पदी पल्लवी हाके यांची सर्वानुमते निवड*

*विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्यच्या जिल्हाध्यक्ष पदी शंभू बापूराव सुर्यवंशी तर युवती जिल्हाध्यक्ष पदी पल्लवी हाके यांची सर्वानुमते निवड*
लातूर (जिल्हाप्रतिनिधी) :विद्यार्थी चळवळीतील सक्रिय विद्यार्थी प्रतिनिधी युवा व्याख्याते शंभू बापुराव सूर्यवंशी यांची विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या जिल्हाध्यक्ष पदी व महाराष्ट्रातील अनेक नामांकित वक्तृत्व वादविवाद स्पर्धेच्या विजेत्या, सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या युवा व्याख्यात्या कु.पल्लवी हाके यांची  समितीच्या लातूर जिल्हा युवती जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. विद्यार्थी चळवळीतील नेहमी त्यांचा सक्रिय सहभाग अणि फुले आंबेडकर यांच्या विचारधारेतुन प्रेरित असलेल्या विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यामातून महाराष्ट्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांचा न्याय व हक्कासाठी कार्य करावे अशी अपेक्षा विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष चेतन अरविंद पाटील यांनी व्यक्त केली.
समिती मजबूतीने उभी कराल व विद्यार्थी वर्गाला आपला अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडेल हीच अपेक्षा असे मत विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सचिव रामराजे तानाजीराव काळे यांनी व्यक्त केली.सदरील निवड ही आजपासून एका वर्षापर्यंत अधिकृत असणार आहे.
निवडीबद्दल सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Saturday, April 17, 2021

प्रा.बापूसाहेब घोटेकर यांचे दु:खद निधन..

प्रा.बापूसाहेब घोटेकर यांचे दु:खद निधन..
  उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी  महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. बापूसाहेब घोटेकर यांचे दिनांक 17 एप्रिल 2021रोजी पहाटे अल्पशा आजाराने नांदेड येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. प्रा. घोटेकर उदयगिरी परिवारातील एक मनमिळावू, सुस्वभावी व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाबद्दल  म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी  शोक व्यक्त केला आहे.

अ‍ॅड. रामचंद्र येरमे यांचे दु:खद निधन..

अ‍ॅड.रामचंद्र येरमे यांचे दु:खद निधन..
उदगीर : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव अ‍ॅड. रामचंद्र तुळशीराम येरमे यांनी औरंगाबाद येथे दिनांक 17 एप्रिल 2021रोजी शेवटचा श्वास घेतला. त्यांचे वयाच्या 88व्या वर्षी दु:खद निधन झाले . महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तथा कार्यकारणीतील सर्व संचालक व सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Thursday, April 15, 2021

*उदयगिरीतील प्राध्यापक डॉ.गंगाधर नामगवळी कालवश.*

उदयगिरीतील डॉ. गंगाधर नामगवळी कालवश.
 उदगीर : ( दिनांक 15 एप्रिल 2021 ) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. डॉ. गंगाधर नामगवळी यांचे अल्पशा आजाराने दिनांक 14 एप्रिल रोजी मनमाड, जिल्हा नाशिक येथे निधन झाले. मराठी साहित्यविश्वात त्यांनी अनमोल योगदान दिले होते याची दखल घेऊनच राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीवर त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी उदयगिरी महाविद्यालयात तब्बल 24 वर्षे सेवा दिली. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, प्रा. डॉ. बी. एम. संदीकर, प्रा. डॉ. हमीद अश्रफ, प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी, प्रा. ज्योतिबा कांदे यांनी शब्दसुमनांनी डॉ. नामगवळी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली.

Monday, April 12, 2021

प्रहार च्या शहर अध्यक्ष पदी रियाज शेख यांची निवड..

*प्रहार च्या शहर अध्यक्ष पदी रियाज शेख यांची निवड*
उदगीर:-वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख - मा.प्रमोदभाऊ कुदळे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष - बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष - राजाभाऊ चौगुले , जिल्हा उपाध्यक्ष - विनोद तेलंगे यांच्या आदेशानुसार, तालुकाध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर शहर अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते व गेली 2 वर्ष  प्रहारचे सक्रिय कार्यकर्ते रियाजोद्दीन मोईनोद्दीन शेख यांची निवड करण्यात आली
जिल्हा उपाध्यक्ष - विनोद तेलंगे ,उदगीर तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, तालुका उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे , जोहेब शेख यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..

Thursday, April 8, 2021

*आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राचे 'सेट' परीक्षेत घवघवीत यश..*

*आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राचे 'सेट' परीक्षेत घवघवीत यश..*
उदगीर : मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये 
उर्दू विषयाचे मोहम्मद अजमत उल हक,भूगोल विषयाचे श्रीकांत बेंबडे, इतिहास विषयाचे शिवसांब स्वामी,या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 
            आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राचे संचालक श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी उदगीर येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी लोकसहभागातून उभारलेल्या अभ्यासिकेचे विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यामुळे श्रीकांत जाधव कबनुरकर यांना आनंदाश्रू तरळले श्रीकांत जाधव यांनी पुढे बोलताना सांगितले की ही अभ्यासिका उभारण्यात ज्या दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले आहे त्या व्यक्तीमुळे गरीब घरातील तीन विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न साकार होत आहे भविष्यात देखील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात चमकतील असा विश्वास श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी व्यक्त केला.
         सेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी उदयगिरी महाविद्यालयाचे मुख्य ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार सर यांनी अथक परिश्रम घेतले त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या यशात डॉ. पेन्सलवार सर यांचा घारीचा वाटा आहे असे श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी सांगितले यापुढील काळात देखील डॉ.पेन्सलवार सर यांनी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रात येत राहीन अशी ग्वाही दिली..

Sunday, April 4, 2021

*प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी मध्ये महिलांचा प्रवेश.*

प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी मध्ये  महिलांचा प्रवेश..
उदगीर (प्रतिनिधी):-वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या कामाला प्रभावित होवुन निराधार महिला व वृद्ध अनाथ दिव्यांगा चे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक महिलांनी प्रहार महिला आघाडी मध्ये प्रवेश केला व लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले , जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या आदेशानुसार, तालुकाध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी तालुका संघटक पदी विजयमाला हारगे यांची निवड तर तालुका सरचिटणीस पदी उषा हारगे , तालुका चिटणीस पदी अरुणा फुलारी , विजयालक्ष्मी बिरादार यांची संघटक पदी तर शिलावती बिरादार यांची सह - संघटक पदी निवड करण्यात आले. तालुका अध्यक्षा - कांचन भोसगे , तालुका उपाध्यक्ष -विजमाला पवार, तालुका उपाध्यक्ष - सुजाता देवरे , तालुका संघटक - लता कोळी , तालुका सरचिटणीस कुमुदिनी पांचाळ ,
शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..

Friday, April 2, 2021

*शेती,माती आणि संस्कृतीशी नात असणारा आजेगाव सर्कल च उभरत नेतृत्व परमेश्वर इंगोले पाटील..*

*शेती,माती आणि संस्कृतीशी नात असणारा आजेगाव सर्कल च उभरत नेतृत्व परमेश्वर इंगोले पाटील..*

          हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव सर्कल तसे फार मोठे पण त्याचा पाहिजे तसा विकास आजपर्यंत झाला नाही पुढाऱ्यांच्या उदासीनतेमुळे येथील विकास फक्त कागदोपत्रीच पाहायला मिळाला शेती,शिक्षण, आरोग्य अश्या सर्वच क्षेत्रात जिल्ह्यात कायम पिछाडीवर असलेला आजेगाव सर्कल सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे चांगलेच चर्चेत आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपल्यामुळे आता परमेश्वर इंगोले पाटलांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत परमेश्वर इंगोले पाटील हा युवक जवळा बुद्रुक या गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील युवक आहे पण कॉलेजवयीन जीवनात डी.एड बी.एड च्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकभरतीच्या आग्रही मागणीमुळे अनेक मोठमोठ्या आंदोलनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची नजर या युवा कार्यकर्त्याकडे पडली व साहेबांनी यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून त्यांना युवक आघाडीचे प्रदेश सचिव केले एका सामान्य घरातील युवकाला त्याच्या नेतृत्वगुनामुळे चक्क प्रदेश पातळीवर नेतृत्व करण्याची संधी साहेबांनी दिल्यामुळे आजेगाव सर्कल मधील तरुण युवकांनी या युवकाला आता हिंगोली जिल्हा परिषदेत आमचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचा जणू काही निर्धारच केला आहे व त्यासाठी गेली एक ते दिड वर्षापासून परमेश्वर इंगोले पाटील व त्यांचा मित्रपरिवार नागरिकांच्या अडीअडचणीत मदत करत आहेत एवढंच नसून आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोणत्याही खर्चाविना युवकांना निवडून आणून एका महिलेच्या हातात गावचा कारभार सोपवून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे.
          आजेगाव सर्कल मधील देवकरवाडी चांगेफळ, आजेगाव, जवळा बु,धनगरवाडी, शिवणी बु,शिंदेफळ, वाघजाळी,देऊळगाव जहांगीर,शिवणी खु,बेलखेडा,पळशी येथील विविध विकासात्मक कामाच्या मागणिसंदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला आहे आणि ही सर्व विकासात्मक कामे मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात सत्ता असल्यामुळे परमेश्वर इंगोले पाटलांना सर्व विकासात्मक कामे करण्यासाठी शासन स्तरावर आज कोणतेही वैधानिक पद नसतेवेळी पक्षाने पाठिंबा दिला आहे जर येणाऱ्या काळात नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परमेश्वर इंगोले पाटील यांना जिल्हा परिषदेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले तर आजेगाव सर्कल चा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा सर्कल मधील अनेक गावांच्या सुशिक्षित नागरिकांच्या तोंडातून ऐकण्यास येत आहे.कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल परमेश्वर इंगोले पाटील यांनी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केल्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये देखील त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा ऐकण्यास मिळत आहे ज्या ठिकाणी पदावर असणाऱ्या पुढाऱ्यांनी सन्मान करायला पाहिजे पण त्यांनी तर साधी विचारपूस देखील केली नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्ग देखील असा लोकप्रतिनिधी सर्कल ला मिळाला तर सोबत काम करण्यास एकप्रकारे ऊर्जा मिळेल असे खाजगीत बोलताना पाहायला मिळत आहे.शेतकरी,युवक,महिला,अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या वाढत्या पाठिंब्यामुळे परमेश्वर इंगोले पाटील येणाऱ्या काळात हिंगोली जिल्हा परिषदेत आजेगाव सर्कल चे नेतृत्व करतील यात तिळमात्र शंका नाही..