अॅड.रामचंद्र येरमे यांचे दु:खद निधन..
उदगीर : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव अॅड. रामचंद्र तुळशीराम येरमे यांनी औरंगाबाद येथे दिनांक 17 एप्रिल 2021रोजी शेवटचा श्वास घेतला. त्यांचे वयाच्या 88व्या वर्षी दु:खद निधन झाले . महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तथा कार्यकारणीतील सर्व संचालक व सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment