प्रा.बापूसाहेब घोटेकर यांचे दु:खद निधन..
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. बापूसाहेब घोटेकर यांचे दिनांक 17 एप्रिल 2021रोजी पहाटे अल्पशा आजाराने नांदेड येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. प्रा. घोटेकर उदयगिरी परिवारातील एक मनमिळावू, सुस्वभावी व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाबद्दल म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment