उदयगिरीतील डॉ. गंगाधर नामगवळी कालवश.
उदगीर : ( दिनांक 15 एप्रिल 2021 ) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. डॉ. गंगाधर नामगवळी यांचे अल्पशा आजाराने दिनांक 14 एप्रिल रोजी मनमाड, जिल्हा नाशिक येथे निधन झाले. मराठी साहित्यविश्वात त्यांनी अनमोल योगदान दिले होते याची दखल घेऊनच राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीवर त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी उदयगिरी महाविद्यालयात तब्बल 24 वर्षे सेवा दिली. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, प्रा. डॉ. बी. एम. संदीकर, प्रा. डॉ. हमीद अश्रफ, प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी, प्रा. ज्योतिबा कांदे यांनी शब्दसुमनांनी डॉ. नामगवळी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली.
No comments:
Post a Comment