Saturday, August 21, 2021

शिरपूर येथे नाल्यात आढळून आला 18 वर्षीय युवकाचा मृतदेह.

शिरपूर येथे नाल्यात आढळून आला 18 वर्षीय युवकाचा मृतदेह.
मांडवी(सुनील श्रीमनवार)-अक्षय किसन प्रधान( वय१८) रा.कोठारी (सी)ता.किनवट हा तरुण पुरात वाहून गेला असून त्याचे प्रेत ता२०रोजी सकाळी शिरपूर नाल्यात आढळले आहे.मांडवी पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
    अक्षय हा काही दिवसांपासून त्याच्या आजोळी शिरपुर येथे राहत होता,ता१८रोज बुधवारी सायंकाळी शौचालयास नाल्यावर गेला होता.पाऊस जोरात सुरू असल्यामुळे नाल्याला मोठा पूर होता त्याला पाण्याचा अंदाज समजला नसल्याने त्याचा तोल गेला व तो पुरात वाहून गेला.अक्षय घरी न आल्यामुळे गावकऱ्यांनी त्याची शोधाशोध केली परन्तु तो मिळाला नाही.ता.२०रोज शुक्रवारी त्याचा मूर्त देह शेतकऱ्यांना दिसला.ग्रामीण रुग्णालय येथे डॉ.विक्रम राठोड यांनी त्याचे शवविच्छेदन केले.या बाबत मांडवी पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Wednesday, August 18, 2021

महावितरणचे कर्मचारी करताय जिवावर उदार होऊन काम.

महावितरणचे कर्मचारी करताय जिवावर उदार होऊन काम.
(राजेश पाटील किनवट शहर प्रतिनिधी ):सध्या सगळीकडे पाऊस, वारा, विजांचा कडकडाट चालु आहे पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत पण किनवट येथील महावितरणचे कर्मचारी या सर्व संकटांवर मात करुन काम करत आहे परंतु वरीष्ठ अधिकारी या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे किनवट- गोकुंदा रोडवर असलेली रोहित्र( डीपी) हि सतत पाण्याखाली असते या बद्दल वांरवार वरीष्ठांना कर्मचाऱ्यांनी तोंडी कळवले व विनंती केली पण वरीष्ठ अधिकारी या गंभीर परीस्थीतीकडे दुर्लक्ष करतात असे महावितरण मध्ये  गुडघाभर पाण्यात अवघड ,धोकादायक परीस्थीती मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे. 
काही तांत्रीक कारणांनी शॉट सर्कीट होऊन डिपीचा फेज जर गेला तर महावितरण कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

Tuesday, August 17, 2021

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची निवड.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची निवड.

सचिव पदी नसिर तगाले तर कार्याध्यक्ष पदी सय्यद नदीम यांची निवड.
किनवट :  सध्या अख्या महाराष्ट्रात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेने पत्रकारांच्या हितासाठी तसेच गोरगरीब जनतेसाठी व ईतर सामाजिक उपक्रम राबवुन सर्व महाराष्ट्र जनतेचे लक्ष वेधले आहे. अशा या संघटनेच्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची आज निवड करण्यात आली आहे. तर सचिव पदी नसीर तगाले तर कार्याध्यक्ष पदी सय्यद नदीम यांची निवड करण्यात आली आहे.
          आशिष शेळके हे दैनिक सकाळ चे किनवट शहर प्रतिनीधी आहेत. तसेच आशिष शेळके हे राजपथ अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्वराज कोचिंग क्लासेस, राजपथ अभ्यासिका व अनिमेष मायक्रो फायनान्स चे हे संचालक आहेत. अन्याय विरोधात प्रखर व सत्य लिखाण करने आणि आपल्या लेखनी व बातमी च्या माध्यमातून न्याय मिळवून देणे अशी यांची ओळख आहे. तसेच गोर गरीबांच्या व गरजुंच्या अडचणीत आशिष शेळके हमेशा धाऊन जातात तसेच अनेक सामाजिक उपक्रमात हे सतत अग्रेसर असतात. सामाजिक क्षेत्रातील यांचे कार्य व योगदान पाहून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगाव यांच्या नेतृत्वाखाली व नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आशिष शेळके यांची किनवट तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
          निवड झाल्यानंतर आशिष शेळके म्हणाले की, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगाव सर, नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव सरांनी माझ्यावर विश्वास ठेऊन माझी या पदी निवड केल्याबद्दल मी मनापासुन यांचे आभार मानतो व नक्कीच यांच्या विश्वास सार्थक करुन या संघटने मार्फत पत्रकार बांधवांच्या व समाजाच्या हिताचे कार्य व उपक्रम राबवेल अशी ग्वाही देतो. यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून शब्दसुमनाने स्वागत होत आहे.

किनवट शहरात वार्डा-वार्डात काँग्रेसची शाखा स्थापन करणार-शहराध्यक्ष वसंत राठोड.

किनवट शहरात वार्डा-वार्डात काँग्रेसची शाखा स्थापन करणार-शहराध्यक्ष वसंत राठोड.
वार्ताहर:-नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अमर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहरात वार्ड वार्ड काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करून काँग्रेसला बळकटी प्राप्त करण्यासाठी शाखा स्थापन करणार असल्याचा आत्मविश्वास येथील युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत राठोड सरदारनगरकर यांनी केला आहे.
                किनवट शहर हा पूर्वी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता पर्यंत मध्यंतरी चा कालावधी सोडला तर हा तालुका वाडी तांड्यात पाड्यात काँग्रेस पक्षाचा बोलबाला आहे. येणाऱ्या किनवट नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये युवकांना जास्त प्रमाणात संधी दिल्यास निश्चित चमत्कार घडेल असा आत्मविश्वास युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. राठोड पुढे म्हणाले की किनवट शहराच्या प्रभागा प्रभागांमध्ये काँग्रेसचे वातावरण अनुकूल असून खऱ्या अर्थाने नगरपरिषदेत युवकांना संधी दिल्यास निश्चित किनवट नगरपरिषदेत काँग्रेसचा झेंडा फडकवुन चमत्कार घडवू असे ते म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्त्यांना निश्चित संधी दिल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अमर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवा ईतिहास घडवणार असल्याचा आत्मविश्वास वसंत राठोड यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

*सेल्फ डिफेन्स शोटोकान कराटे डो असोसिएशन किनवटची बेल्ट एक्झाम संपन्न.*

*सेल्फ डिफेन्स शोटोकान कराटे डो असोसिएशन किनवटची बेल्ट एक्झाम संपन्न.*

(शहर प्रतिनिधी किनवट/ राजेश पाटील):-शोटोकान कराटे डो असोसिएशन तर्फे अनेक विद्यार्थी जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव लौकीक करत आहेत तसेच या कराटे स्पोर्ट माध्यमातुन अनेकांनी सैनिकी,पोलीस, फॉरेस्ट, BSF, दलात दाखल झाले व आपले जिवनातील स्वप्न पूर्ण केले .
शोटोकान कराटे असोसिएशन प्रशिक्षणा सोबतच शिस्त व आत्म संरक्षणाचे धडे देतो व विद्यार्थ्यामध्ये चिकाटी निर्माण करतो तसेच संयम बाळगायचे देखील शिकवतो .
नुकतेच  शोटोकान कराटे डो असोसिएशन प्रशिक्षण केंद्र तालुका क्रीडा संकुल किनवट व गोकुदा तर्फे  बेल्ट एक्झाम घेण्यात आली मुख्य प्रशिक्षक संदिप प्रल्हाद यशिमोड ब्लॅक बेल्ट 3 डॅन यांच्या मार्गदर्शनाखाली हि परीक्षा घेण्यात आली तर सह प्रशिक्षक सचिन राठोड,मारोती येशीमोड संकेत दरडे,रोहित भरणे,गोदावरी येशीमोड,रोमा गादेकर, आदींनी यांनी त्यांना सहकार्य केले व विविध प्रकारच्या बेल्ट साठी विद्याथ्यांची फिजीकल , सेल्फ डिफेन्स परीक्षा घेतली या मध्ये यल्लो बेल्ट, ऑरेन्ज बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्लु बेल्ट, ब्रॉऊन बेल्ट, आदिचा समावेश आहे.

यात प्रामुख्याने यल्लो बेल्ट साठी पात्र  उतीर्ण विद्यार्थी
आदर्श संतोष , बालाजी मदुरे ,
ओमकार दीपक पिल्लेवार ,
शिवेद्र प्रवीण पिल्लेवार ,शालेंद्र प्रवीण ईश्वरी जमदाडे सही भाट, अक्षरा शेखर पिल्लेवार,
अक्षरा शेखर चिंचोलकर,देवांश सिदेश्र्वर मेंडके ,सानवी सुदर्शन भट ,
 जयश्री गोवर्धन तक्कलवर(yello/orange)प्रनय बालाजी मडूरे,आदर्श संतोष बोईनवाड
ऑरेंज बेल्टसाठी पात्र विद्यार्थी
मोक्ष श्रीनिवास सट्टाजिवर
तुषार तुलसीदास जांबले
स्नेहा परमेश्वर मादसवार
 अक्षरा नामदेव अचकुलवर
अंश अभय महाजन.

ग्रिन बेल्ट साठी पात्र विद्यार्थी
नील अंबर ठमके,
राजनंदिनी अनिल शिर्भाते ,
,आर्यन नितीन मोहरे ,
रामानंद अनिल शिर्भाते,गुंजन ठाकूर
मोहम्मद अब्रार मोहम्मद अहमद,
शेख मोहम्मद फैसन
ब्लु बेल्टसाठी पात्र विद्यार्थी
निर्मिती प्रमोद भवरे खूशी लाखकर तनीका चिल्लावार ,शिवांश गजानन मेंडके.
ब्राऊन  3 बेल्टसाठी पात्र विद्यार्थी
आयुष यादव देवकाते,संचित लक्ष्मण वाडगुरे,सक्षम मिलिंद सोनकांबळे आदी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व विविध  कराटे प्रशिक्षण पात्र बेल्ट करीता परीक्षा घेण्यात आली.

Monday, August 16, 2021

*'ग्रामस्पर्श' लोकसहभागातून स्पर्धा परीक्षा केंद्राचे राज्यमंत्र्यांकडून कौतुक..!*

'ग्रामस्पर्श' लोकसहभागातून स्पर्धा परीक्षा केंद्राचे राज्यमंत्र्यांकडून कौतुक..!
वार्ताहर:- 'शिक्षणातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते' या उक्तीला अनुसरून सताळा बु. या गावातील युवकांच्या पुढाकाराने 'लोकसहभागातून' स्पर्धा परीक्षा केंद्राचे उदघाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकाला स्पर्धा परीक्षेचे योग्य ते मार्गदर्शन लाभावे व एकाच ठिकाणी सर्व पुस्तके उपलब्ध व्हावीत या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व व उद्देश्य कपिलेश जळकोटे यांनी प्रस्तावनेतून मांडले. यावेळी गावचे सरपंच मा. शिवलिंगआप्पा जळकोटे यांच्या हस्ते रिबीन कापून या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सेनानी पंढरीनाथ तिरुके, उपसरपंच अरुणाताई देशपांडे, ग्रामसेवक संतोष माचेवाड  व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.त्यानंतर राज्यमंत्री मा. नामदार संजयजी बनसोडे यांनी स्पर्धा परीक्षा केंद्राला सदिच्छा भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक करून मार्गदर्शन केले. यावेळी रामचंद्र तिरुके, बस्वराज पाटील नागराळकार , चंद्रकांत टेंगेटोल व पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी गजानन बालने, कपिलेश जळकोटे, व्यंकट तिरकोळे, अस्लम सय्यद ,गुंडेराव जळकोटे, स्वप्निल तिरुके, पंकज बनसोडे, श्याम जळकोटे  व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

*मा.ना.डॉ.भारतीताई पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पालघर येथुन आज सुरवात.*

*मा.ना.डॉ.भारतीताई पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पालघर येथुन आज सुरवात.*
वार्ताहर:-केन्द्रिय आरोग्य राज्यमंत्री ना.डॉ. भारतीताई पवार यांची जन-आशीर्वाद यात्रेची सुरवात आज सकाळी 9.00 पासुन पालघर येथुन सुरु झाली.हि यात्रा 5 दिवस 5 जिल्ह्यातुन जाणार आहे जनआशीर्वाद यात्रेला भारतरत्न, मा.प्रधानमंत्री आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतीमेला मालार्पण, विनम्र अभिवादन करुन सुरवात करण्यात आली. जन आशिर्वाद यात्रेत मा.ना.प्रविनजी दरेकर,विरोधिपक्ष नेते,विधानपरीषद महाराष्ट्र. मा.डॉ. अशोकजी उईके, यात्रा संयोजक तथा प्रदेश अध्यक्ष, भाजपा STM,महाराष्ट्र. आम.मनीषाताई चौधरी, मा.किशोरजी काळकर,प्रदेश संपर्क प्रमुख, भाजपाSTM,महाराष्ट्र. मा.नंदुजी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष, पालघर, प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM,महाराष्ट्र. मा.एन.डी.गावीत, प्रदेश सरचिटणीस,भाजपा STM,महाराष्ट्र.मा.संतोष जी जनाटे संघटनमहामंत्री, भाजपा पालघर.भाजपा,भाजपा आघाडी पदाधिकारी,लोकप्रतीनीधि,कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday, August 14, 2021

किनवट वनविभागाच्या पथकाने ऑटोरिक्षासह मोटरसायकल आणि अवैध सागवानी कटसाईज केले जप्त.

किनवट वनविभागाच्या पथकाने ऑटोरिक्षासह मोटरसायकल आणि अवैध सागवानी कटसाईज केले जप्त.

किनवट ( प्रतिनिधी ):-किनवट वन विभागाच्या पथकाने गुप्त माहिती मिळाल्या वरून  चिखली ते इंजेगाव दरम्यान गस्त करीत असताना एका संशयास्पद  ऑटो चा पाटलाग केला . ऑटो चालकांनी इंजेगाव नाका येथे ऑटो सोडून पळ काढला यावेळी घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने सागवान कट साईज सहीत पिवळा रंगाचा ॲपे ऑटो व  एक मोटर सायकल जप्त केला .
याबाबत सविस्तर वृत्त असे की किनवट  वन विभागाला सागवान तस्कर ऑटो तून सागवानाची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती दि .12 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मिळाली . यावरून वन विभागाच्या पथकाने चिखली ते इंजेगाव दरम्यान आपली गस्त सुरू केली . संशयास्पद ऑटो साठी गस्त चालू असतानाच वन विभागाला रस्त्यात एक मोटर सायकल वर अवैद्य सागवानाचे नग घेऊन येत असलेले दोन इसम दिसले . मोटरसायकल स्वारांना वनविभागाने थांबण्याचा इशारा करताच मोटरसायकल वरील अज्ञात इसमांनी जागेवरच मोटरसायकल आणि कट साईज  सागवान नग फेकून पळ काढला .सदरील मोटरसायकलवर सागवानाचे नग वनविभागाच्या पथकाने ताबडतोब जप्त करून अज्ञाताचा विरुद्ध गुन्हा नोंद केला .त्यानंतर वन विभागाच्या पथकाने आपली गस्त सुरू ठेवली तर त्यांना चिखली कडून एक  पिवळ्या रंगाचा ॲटो येताना दिसला .  चालकाने वनविभागाच्या  पथकाला बघून ऑटो पळविण्याचा प्रयत्न केला . वन कर्मचाऱ्यांनी त्या ऑटो चा पाटलाग सुरूच ठेवला . शेवटी वन विभागाचे पथक जवळ येथे असल्याचे बघून इंजेगाव  नाका येथे ऑटो चालकाने ऑटो सोडून पळ काढला यावेळेस वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळा वरून एक अपे ऑटो T S 17 - T 2125 या क्रमांकाचा जप्त केला . सागवानाचे कटसाईज नग 61 व घ.मी. 0.  1690 ज्याची किंमत10526  रुपये व ऑटो ची किंमत 75 हजार रुपये जप्त केला आहे व विना नंबर प्लेट ची  मोटरसायकलवर 28 नग 0.0982 घनमीटर ज्याची किंमत 6117 रुपये व मोटरसायकल चे अंदाजे किंमत सात हजार रुपये अशी दोन्ही घटनेतील 98 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे . दोन्ही घटनेतील आरोपी फरार आहेत . विभागाच्या या पथकात उपवनसंरक्षक सातेलिकर  , सहा . उपवनसंरक्षक एम आर  शेख यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटचे नवनियुक्त वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद राठोड ,  चिखलीचे वनपाल रवी दांडेगावकर , के .जी . गायकवाड , एस आर .सांगळे , माझलकर, यादव,  वनरक्षक फोले, झंपलवाड , चिबडे वाहन चालक आवळे इत्यादी वनकर्मचारी होते .

Friday, August 13, 2021

शेतकऱ्यांच्या पिककर्जाचा तात्काळ निपटारा न केल्यास आंदोलन .सोमवारी घेणार एसबीआईच्या महाव्यवस्थापाची भेट -प्रमिल नाईक.

शेतकऱ्यांच्या पिककर्जाचा तात्काळ निपटारा न केल्यास आंदोलन .
सोमवारी घेणार  एसबीआईच्या महाव्यवस्थापाची भेट -प्रमिल नाईक.
किनवट(सुनील श्रीमनवार):-किंनवट तालुक्यातील एसबीआई बैंकेच्या शाखेत शेतकऱ्यांची शेकड़ो पिककर्ज प्रकरण मंजूर झाली आहेत पण ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यन्त अजूनही शेतकऱ्यांना बैंकेचा उम्बरठा झिजवावा लागत आहे .,पावसाने दड़ी मारलयाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे .या बैंकेला कनेक्टिविटी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पिककर्जे अड़कुन पडली आहेत .वास्तविक पहाता पीककर्ज जून ,जुले पर्यन्त शेतकऱ्यांना मिळायला हवित परन्तु ऑगस्ट महिन्यात सुद्धा पिककर्ज मिळू शकत नाही हे मोठ दुर्भाग्यपूर्ण आहे .या बैंकेला bsnl या दूरसंचार कंपनिची इंटरनेट सुविधेची जोड़नी करण्यात आली आहे .bsnl ची सेवा या भागात निष्पळ ठरली असल्याने शेतकऱ्यांना बेंकेच्या दररोज चकरा मारत लागव्या कारणाने नाहक आर्थिक भुरदण्ड सहन करावा लागत आहे .,या बेंकेच्या इंटरनेटची जोड़नी एयरटेल किवा जिओ या खाजगी दूरसंचार कंपनिशी तात्काळ जोड़नी केल्यास शेतकऱ्यांची दुविधा दूर होऊ शकते .बैंकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी या संदर्भात   भेट घेण्यात येईल तरी समस्या न सूटल्यास बैंके विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी माहिती या भागातील कांग्रेस पक्ष्याचें युवा नेते युवक कांग्रेसचे माजी महासचिव प्रमिल नाईक जाधव यांनी दिली आहे .

मांडवी पोलिसांनी वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या.

मांडवी पोलिसांनी वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या.
किनवट ( प्रतिनिधी ):-नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात वाहन चोरून हैदोस घालणाऱ्या  सराईत मोटरसायकल चोरांना मांडवी पोलिसांनी अटक करून, 1 लाख 80 हजार ऐवजाच्या सहा मोटारसायकली जप्त केला आहे.
     कनकी येथील विलास विठ्ठल वाडगुरे यांची मोटारसायकल चोरी गेली होती. याची फिर्याद दि.8 ऑगस्ट रोजी  दिल्याने,सपोनि मल्हार शिवरकर यांनी तपासाचे चक्र गतीने फिरवून आरोपी संदीप पंडित जाधव रा.हिवळणी ता.माहुर आणि अक्षय रमेश पवार रा.उमारा ता. माहुर यांना अटक करून पोलीसांचा खाक्या दाखवताच दोन्ही आरोपी पोपटासारखे बोलुन विलास वाडगुरे यांची  मोटारसायकल व अन्य पाच मोटारसायकल चोरल्या ची कबुली दिली.
या सहा मोटारसायकली मांडवी पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि मल्हार शिवरकर हे करीत असुन त्यांना पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे, पोलिस उपनिरीक्षक पठाण, पोहेका जाबुवंत कदम, पोहेका भारत राठोड, पोका. श्याम चव्हाण, नितेश लेंडगुरे, नामदेव कदम हे सहकार्य करत आहे. 

Thursday, August 12, 2021

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी ज्योतिबा खराटे यांची नियुक्ती करा-माजी सभापती चिंतामण राठोड.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी ज्योतिबा खराटे यांची नियुक्ती करा-माजी सभापती चिंतामण राठोड.
किनवट (ता.प्र) गेल्या तीस वर्षापासून एक निष्ठेने शिवसेनेत काम करून गाव तिथे शिवसेना माणूस तिथे धनुष्यबाण व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य माणसात पोचविणारे ज्योतिबा खराटे यांची नांदेड जिल्हाप्रमुख पदी निवड करा अशी विनंती शिवसेनाप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे माजी सभापती चिंतामण राठोड यांनी केली आहे.
              किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची शाखा स्थापन करून जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद सेवा सहकारी सोसायटी ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवून पक्षाला नवी बळकटी देण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे शिवसैनिक ज्योतिबा दादा खराटे हे शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख व जिल्हा उपप्रमुख या पदापर्यंत गेले असून त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांची नांदेड जिल्हा प्रमुख पदी निवड करावी अशा आशयाची विनंती वजा निवेदन माहूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसैनिक चिंतामण राठोड यांनी शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
            गेल्या तीस वर्षापासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून वाडी तांड्यात शिवसेनेचे विचार पोचून किनवट माहूर मतदार संघात शिवसेना मय वातावरण करण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे लढवय्या शिवसेनिक म्हणून ज्योतिबा खराटे यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना जिल्हा प्रमुख पदी निवड करावी असे आशयाचे विनंती निवेदन माजी सभापती चिंतामण राठोड यांनी शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Wednesday, August 11, 2021

ते सोयाबीन बियाणे बोगसच, कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीचा निष्कर्ष !मदनापूर बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात कृषी साहित्य विक्रेत्याची बेईमानी उघड !

ते सोयाबीन बियाणे बोगसच, कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीचा निष्कर्ष !
मदनापूर बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात कृषी साहित्य विक्रेत्याची बेईमानी उघड ! 
माहूर (प्रा.प्रवीण बिरादार):- खरीप २०२१ साठी सारखणी ता. किनवट येथील निलेश कृषी सेवा केंद्रातून  मदनापूर ता. माहूर  येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण टनमने  यांनी खरेदी केलेले पाटीदार सीड्स चे  सोयाबीन बियाणे जेएस ९३०५ लॉट नं. ०६७९८ बियाणे ३० किलो प्रती पिशवी एकूण २६ पिशव्या  निकृष्ट व बनावट अढळल्याची घटना दि. २ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने फसवणूक ग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर नारायण टनमने यांनी अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांना लेखी निवेदन देऊन सदर शेतकरी फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित दुकानदार व बियाणे उत्पादक कंपनी विरुद्ध कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. सात दिवसात चौकशी न झाल्याने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी  नुकसान ग्रस्त शेतात किंवा माहूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिल्याने कृषी विभागाला खडबडून जाग आल्यानंतर. दि.१० रोजी किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम.तपासकर यांच्या नेतृत्वातील तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, प.स.चे कृषी अधिकारी अनिल जोंधळे,राम पाटील कृषी विशेषज्ञ बियाने संशोधन केंद्र नांदेड, मंडळ कृषी अधिकारी विनोद कदम, कृषी सहाय्यक योगिता दळवी   यांचा समावेश   तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने  मदनापूर येथील फसवणूकग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर टनमने यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष जायमोक्यावर पाहणी केली असता सदर बियाणेच जेएस ९३०५  नसल्याचे बियाणे संशोधन समितीला आढळून आल्याने शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.   
       त्यानंतर संशोधन समितीने शिवारातील इतर काही शेतात पाहणी केली असता याच लॉट नंबरचे इतर कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेले जेएस ९३०५ बियाणेही बोगस असल्याचे आढळून आले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर लॉट नंबरच्या एकूण ३०० बॅग  निलेश कृषी सेवा केंद्र सारखणी येथून काही कृषी सेवा केंद्र व शेतकऱ्यांना विक्री झाले असल्याची प्रथमदर्शनी माहिती असून या बियाण्यास प्रचंड मागणी असल्याने सदर बियाणे ऑनने विक्री झाल्याने ३०० बॅग मूळ बियाण्यासह बोगसबाजी करून सदर कृषी दुकानदाराने किती बॅग मध्ये काळाबाजार केला हे तपासण्याचे तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
         @@@@सदर प्रकरणी पारदर्शक पणे सखोल चौकशी केल्यास फार मोठे घबाड हाती लागून कृषी साहित्यात भेसळ करून विक्री करत आधीच विविध अस्मानी व सुलतानी संकटाना तोंड देत अजिंक्य योद्ध्यासारखे लढणाऱ्या बळीराजाचे पंख छाटण्याचे कारस्थान  काही माफियांनी या क्षेत्रात सुरु केले असल्याची चर्चा असून माहूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून तालुका कृषी अधिकारी प्रभारीच असल्याने केवळ दिन जाव आन तनखा आव हेच धोरण ठेऊन  माहूर तालुका कृषी विभागाचा कारभार पाहणारे अधिकारी असल्याने या माफियांचे चांगलेच फावले आहे. सदर प्रकरणात संबधित कृषी साहित्य विक्रेत्याचे सर्व लायसन त्वरित रद्द करून त्यांचे नाव काळ्या यादीत टाकून अशा प्रवृतींना आळा घालुन पुढील काळात शेतकऱ्याच्या संभाव्य फसवणूकिला लगाम घालावा अशी मागणी होत आहे.@@@@ 

प्रतिक्रिया:-
 @@@सदर बियाणे हे बिलाप्रमाणे जेएस ९३०५ चे नसल्याचे आढळून आल्याने याच लॉट नंबरचे इतरही काही शेतात आम्ही पाहणी केली असता सदर ठिकाणचेही पिक हे सदर व्हेरायटीचे नसल्याचे आढळून आले असून सदर कृषी सेवा केंद्रातून विक्री झालेल्या सर्व जेएस ९३०५ बियाणाची तपासणी करून बोगसबाजी करणाराविरुद्ध कारवाई करून फसवणूक ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊ  – डी.एम.तपासकर उपविभागीय कृषी अधिकारी@@@   

प्रतिक्रिया:-
       @@@  प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शेतात जायमोक्यावर बिलानुसार सोयाबीनची पाहणी केली असता सदर उगवण झालेली सोयाबीनची झाडे ही जेएस ९३०५ शी कसलेही साम्य दिसून येत नाही. –   राम पाटील, कृषी विशेषज्ञ बियाने संशोधन केंद्र नांदेड

Sunday, August 8, 2021

उदयगिरीत तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन..

उदयगिरीत तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन..
 उदगीर : ( दिनांक 8 ऑगस्ट 2021) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हीरक महोत्सवी वर्ष 2021 - 2022 निमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय व महाविद्यालय अशा दोन गटात घेतली जाणार असून दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक - 2501 रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक - 1501 रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक - 1001रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे दोन्ही गटासाठी दिली जाणार आहेत. शालेय स्तरासाठी 'वृक्ष संवर्धन काळाची गरज' तर महाविद्यालय स्तरासाठी 'वृक्ष आणि मानवी जीवन' या विषयावर मराठी भाषेत ( कमाल शब्दमर्यादा 1000 शब्द ) दिनांक 13 ऑगस्ट 2021 पर्यंत 9890422800 या व्हाट्सअप नंबर वर किंवा librarianmumu@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत. सदरील निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे व मराठी अभिनेते तथा सह्याद्री देवराई प्रकल्पाचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के( व. म. ), उपप्राचार्य आर. एन.  जाधव ( क. म. ) यांनी केले आहे.