प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची निवड.
सचिव पदी नसिर तगाले तर कार्याध्यक्ष पदी सय्यद नदीम यांची निवड.
किनवट : सध्या अख्या महाराष्ट्रात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेने पत्रकारांच्या हितासाठी तसेच गोरगरीब जनतेसाठी व ईतर सामाजिक उपक्रम राबवुन सर्व महाराष्ट्र जनतेचे लक्ष वेधले आहे. अशा या संघटनेच्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची आज निवड करण्यात आली आहे. तर सचिव पदी नसीर तगाले तर कार्याध्यक्ष पदी सय्यद नदीम यांची निवड करण्यात आली आहे.
आशिष शेळके हे दैनिक सकाळ चे किनवट शहर प्रतिनीधी आहेत. तसेच आशिष शेळके हे राजपथ अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्वराज कोचिंग क्लासेस, राजपथ अभ्यासिका व अनिमेष मायक्रो फायनान्स चे हे संचालक आहेत. अन्याय विरोधात प्रखर व सत्य लिखाण करने आणि आपल्या लेखनी व बातमी च्या माध्यमातून न्याय मिळवून देणे अशी यांची ओळख आहे. तसेच गोर गरीबांच्या व गरजुंच्या अडचणीत आशिष शेळके हमेशा धाऊन जातात तसेच अनेक सामाजिक उपक्रमात हे सतत अग्रेसर असतात. सामाजिक क्षेत्रातील यांचे कार्य व योगदान पाहून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगाव यांच्या नेतृत्वाखाली व नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आशिष शेळके यांची किनवट तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
निवड झाल्यानंतर आशिष शेळके म्हणाले की, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगाव सर, नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव सरांनी माझ्यावर विश्वास ठेऊन माझी या पदी निवड केल्याबद्दल मी मनापासुन यांचे आभार मानतो व नक्कीच यांच्या विश्वास सार्थक करुन या संघटने मार्फत पत्रकार बांधवांच्या व समाजाच्या हिताचे कार्य व उपक्रम राबवेल अशी ग्वाही देतो. यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून शब्दसुमनाने स्वागत होत आहे.
No comments:
Post a Comment