मांडवी पोलिसांनी वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या.
किनवट ( प्रतिनिधी ):-नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात वाहन चोरून हैदोस घालणाऱ्या सराईत मोटरसायकल चोरांना मांडवी पोलिसांनी अटक करून, 1 लाख 80 हजार ऐवजाच्या सहा मोटारसायकली जप्त केला आहे.
कनकी येथील विलास विठ्ठल वाडगुरे यांची मोटारसायकल चोरी गेली होती. याची फिर्याद दि.8 ऑगस्ट रोजी दिल्याने,सपोनि मल्हार शिवरकर यांनी तपासाचे चक्र गतीने फिरवून आरोपी संदीप पंडित जाधव रा.हिवळणी ता.माहुर आणि अक्षय रमेश पवार रा.उमारा ता. माहुर यांना अटक करून पोलीसांचा खाक्या दाखवताच दोन्ही आरोपी पोपटासारखे बोलुन विलास वाडगुरे यांची मोटारसायकल व अन्य पाच मोटारसायकल चोरल्या ची कबुली दिली.
या सहा मोटारसायकली मांडवी पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि मल्हार शिवरकर हे करीत असुन त्यांना पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे, पोलिस उपनिरीक्षक पठाण, पोहेका जाबुवंत कदम, पोहेका भारत राठोड, पोका. श्याम चव्हाण, नितेश लेंडगुरे, नामदेव कदम हे सहकार्य करत आहे.
No comments:
Post a Comment