किनवट ( प्रतिनिधी ):-किनवट वन विभागाच्या पथकाने गुप्त माहिती मिळाल्या वरून चिखली ते इंजेगाव दरम्यान गस्त करीत असताना एका संशयास्पद ऑटो चा पाटलाग केला . ऑटो चालकांनी इंजेगाव नाका येथे ऑटो सोडून पळ काढला यावेळी घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने सागवान कट साईज सहीत पिवळा रंगाचा ॲपे ऑटो व एक मोटर सायकल जप्त केला .
याबाबत सविस्तर वृत्त असे की किनवट वन विभागाला सागवान तस्कर ऑटो तून सागवानाची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती दि .12 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मिळाली . यावरून वन विभागाच्या पथकाने चिखली ते इंजेगाव दरम्यान आपली गस्त सुरू केली . संशयास्पद ऑटो साठी गस्त चालू असतानाच वन विभागाला रस्त्यात एक मोटर सायकल वर अवैद्य सागवानाचे नग घेऊन येत असलेले दोन इसम दिसले . मोटरसायकल स्वारांना वनविभागाने थांबण्याचा इशारा करताच मोटरसायकल वरील अज्ञात इसमांनी जागेवरच मोटरसायकल आणि कट साईज सागवान नग फेकून पळ काढला .सदरील मोटरसायकलवर सागवानाचे नग वनविभागाच्या पथकाने ताबडतोब जप्त करून अज्ञाताचा विरुद्ध गुन्हा नोंद केला .त्यानंतर वन विभागाच्या पथकाने आपली गस्त सुरू ठेवली तर त्यांना चिखली कडून एक पिवळ्या रंगाचा ॲटो येताना दिसला . चालकाने वनविभागाच्या पथकाला बघून ऑटो पळविण्याचा प्रयत्न केला . वन कर्मचाऱ्यांनी त्या ऑटो चा पाटलाग सुरूच ठेवला . शेवटी वन विभागाचे पथक जवळ येथे असल्याचे बघून इंजेगाव नाका येथे ऑटो चालकाने ऑटो सोडून पळ काढला यावेळेस वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळा वरून एक अपे ऑटो T S 17 - T 2125 या क्रमांकाचा जप्त केला . सागवानाचे कटसाईज नग 61 व घ.मी. 0. 1690 ज्याची किंमत10526 रुपये व ऑटो ची किंमत 75 हजार रुपये जप्त केला आहे व विना नंबर प्लेट ची मोटरसायकलवर 28 नग 0.0982 घनमीटर ज्याची किंमत 6117 रुपये व मोटरसायकल चे अंदाजे किंमत सात हजार रुपये अशी दोन्ही घटनेतील 98 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे . दोन्ही घटनेतील आरोपी फरार आहेत . विभागाच्या या पथकात उपवनसंरक्षक सातेलिकर , सहा . उपवनसंरक्षक एम आर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटचे नवनियुक्त वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद राठोड , चिखलीचे वनपाल रवी दांडेगावकर , के .जी . गायकवाड , एस आर .सांगळे , माझलकर, यादव, वनरक्षक फोले, झंपलवाड , चिबडे वाहन चालक आवळे इत्यादी वनकर्मचारी होते .
No comments:
Post a Comment