महावितरणचे कर्मचारी करताय जिवावर उदार होऊन काम.
(राजेश पाटील किनवट शहर प्रतिनिधी ):सध्या सगळीकडे पाऊस, वारा, विजांचा कडकडाट चालु आहे पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत पण किनवट येथील महावितरणचे कर्मचारी या सर्व संकटांवर मात करुन काम करत आहे परंतु वरीष्ठ अधिकारी या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे किनवट- गोकुंदा रोडवर असलेली रोहित्र( डीपी) हि सतत पाण्याखाली असते या बद्दल वांरवार वरीष्ठांना कर्मचाऱ्यांनी तोंडी कळवले व विनंती केली पण वरीष्ठ अधिकारी या गंभीर परीस्थीतीकडे दुर्लक्ष करतात असे महावितरण मध्ये गुडघाभर पाण्यात अवघड ,धोकादायक परीस्थीती मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.
काही तांत्रीक कारणांनी शॉट सर्कीट होऊन डिपीचा फेज जर गेला तर महावितरण कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
No comments:
Post a Comment