ते सोयाबीन बियाणे बोगसच, कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीचा निष्कर्ष !
मदनापूर बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात कृषी साहित्य विक्रेत्याची बेईमानी उघड !
माहूर (प्रा.प्रवीण बिरादार):- खरीप २०२१ साठी सारखणी ता. किनवट येथील निलेश कृषी सेवा केंद्रातून मदनापूर ता. माहूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण टनमने यांनी खरेदी केलेले पाटीदार सीड्स चे सोयाबीन बियाणे जेएस ९३०५ लॉट नं. ०६७९८ बियाणे ३० किलो प्रती पिशवी एकूण २६ पिशव्या निकृष्ट व बनावट अढळल्याची घटना दि. २ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने फसवणूक ग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर नारायण टनमने यांनी अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांना लेखी निवेदन देऊन सदर शेतकरी फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित दुकानदार व बियाणे उत्पादक कंपनी विरुद्ध कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. सात दिवसात चौकशी न झाल्याने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी नुकसान ग्रस्त शेतात किंवा माहूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिल्याने कृषी विभागाला खडबडून जाग आल्यानंतर. दि.१० रोजी किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम.तपासकर यांच्या नेतृत्वातील तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, प.स.चे कृषी अधिकारी अनिल जोंधळे,राम पाटील कृषी विशेषज्ञ बियाने संशोधन केंद्र नांदेड, मंडळ कृषी अधिकारी विनोद कदम, कृषी सहाय्यक योगिता दळवी यांचा समावेश तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने मदनापूर येथील फसवणूकग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर टनमने यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष जायमोक्यावर पाहणी केली असता सदर बियाणेच जेएस ९३०५ नसल्याचे बियाणे संशोधन समितीला आढळून आल्याने शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यानंतर संशोधन समितीने शिवारातील इतर काही शेतात पाहणी केली असता याच लॉट नंबरचे इतर कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेले जेएस ९३०५ बियाणेही बोगस असल्याचे आढळून आले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर लॉट नंबरच्या एकूण ३०० बॅग निलेश कृषी सेवा केंद्र सारखणी येथून काही कृषी सेवा केंद्र व शेतकऱ्यांना विक्री झाले असल्याची प्रथमदर्शनी माहिती असून या बियाण्यास प्रचंड मागणी असल्याने सदर बियाणे ऑनने विक्री झाल्याने ३०० बॅग मूळ बियाण्यासह बोगसबाजी करून सदर कृषी दुकानदाराने किती बॅग मध्ये काळाबाजार केला हे तपासण्याचे तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
@@@@सदर प्रकरणी पारदर्शक पणे सखोल चौकशी केल्यास फार मोठे घबाड हाती लागून कृषी साहित्यात भेसळ करून विक्री करत आधीच विविध अस्मानी व सुलतानी संकटाना तोंड देत अजिंक्य योद्ध्यासारखे लढणाऱ्या बळीराजाचे पंख छाटण्याचे कारस्थान काही माफियांनी या क्षेत्रात सुरु केले असल्याची चर्चा असून माहूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून तालुका कृषी अधिकारी प्रभारीच असल्याने केवळ दिन जाव आन तनखा आव हेच धोरण ठेऊन माहूर तालुका कृषी विभागाचा कारभार पाहणारे अधिकारी असल्याने या माफियांचे चांगलेच फावले आहे. सदर प्रकरणात संबधित कृषी साहित्य विक्रेत्याचे सर्व लायसन त्वरित रद्द करून त्यांचे नाव काळ्या यादीत टाकून अशा प्रवृतींना आळा घालुन पुढील काळात शेतकऱ्याच्या संभाव्य फसवणूकिला लगाम घालावा अशी मागणी होत आहे.@@@@
प्रतिक्रिया:-
@@@सदर बियाणे हे बिलाप्रमाणे जेएस ९३०५ चे नसल्याचे आढळून आल्याने याच लॉट नंबरचे इतरही काही शेतात आम्ही पाहणी केली असता सदर ठिकाणचेही पिक हे सदर व्हेरायटीचे नसल्याचे आढळून आले असून सदर कृषी सेवा केंद्रातून विक्री झालेल्या सर्व जेएस ९३०५ बियाणाची तपासणी करून बोगसबाजी करणाराविरुद्ध कारवाई करून फसवणूक ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊ – डी.एम.तपासकर उपविभागीय कृषी अधिकारी@@@
प्रतिक्रिया:-
@@@ प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शेतात जायमोक्यावर बिलानुसार सोयाबीनची पाहणी केली असता सदर उगवण झालेली सोयाबीनची झाडे ही जेएस ९३०५ शी कसलेही साम्य दिसून येत नाही. – राम पाटील, कृषी विशेषज्ञ बियाने संशोधन केंद्र नांदेड
No comments:
Post a Comment