उदयगिरीत तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन..
उदगीर : ( दिनांक 8 ऑगस्ट 2021) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हीरक महोत्सवी वर्ष 2021 - 2022 निमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय व महाविद्यालय अशा दोन गटात घेतली जाणार असून दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक - 2501 रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक - 1501 रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक - 1001रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे दोन्ही गटासाठी दिली जाणार आहेत. शालेय स्तरासाठी 'वृक्ष संवर्धन काळाची गरज' तर महाविद्यालय स्तरासाठी 'वृक्ष आणि मानवी जीवन' या विषयावर मराठी भाषेत ( कमाल शब्दमर्यादा 1000 शब्द ) दिनांक 13 ऑगस्ट 2021 पर्यंत 9890422800 या व्हाट्सअप नंबर वर किंवा librarianmumu@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत. सदरील निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे व मराठी अभिनेते तथा सह्याद्री देवराई प्रकल्पाचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के( व. म. ), उपप्राचार्य आर. एन. जाधव ( क. म. ) यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment