Wednesday, December 30, 2020

उदगीर नगरपालिकेच्या हद्द वाढीला शासनानाची मान्यता. शासनाचा एतिहासिक निर्णय उदगीर शहराचा भुगोल बदलला.. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नास यश.

*उदगीर नगरपालिकेच्या हद्द वाढीला शासनानाची मान्यता.*

  *शासनाचा एतिहासिक निर्णय उदगीर शहराचा भुगोल बदलला..*

*राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नास यश.*

मुंबई :उदगीर नगरपालिकातील सर्वे नंबर .3,155 ते 338.
यांना शासनाने उदगीर नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे .अनेक दिवसांपासून येथील नागरिकाची हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी होती शासनाने  या मागणीला मान्यता दिली आहे अशा माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे  आमदार संजय बनसोडे  यांनी दिली आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की उदगीर शहराचा विकास झपाट्याने होत आहे  शहरात विविध विकास कामे सुरू आहेत  शहराचा विस्तार  होत आहे सर्वे नंबर 3,155,ते 338  येथील नागरिकाची अनेक दिवसांपासून  नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी होती हे सर्वे नंबर लगतच्या   ग्रामपंचायत मघ्ये समाविष्ट नव्हते त्यामुळे येथील नागरिकांना खरेदी खत बनविणे,अशा अनेक महसूली समस्या निर्माण होत होत्या याबाबत राज्य शासनाकडे हद्द वाढीचा प्रस्ताव सादर केला होता. याला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये मलकापूर, सोमनाथ पुर ,निडेबन,पिंपरी मादलापुर येथील काही सर्वे नंबर नगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात येणार आहेत यात उदगीरच्या  
*उत्तरेस* सर्वे नं 97 च्या उत्तर पश्चिम कोपरा ते सर्वे नं 193 च्या उत्तर पुर्व कोपरा पर्यंत 
*पूर्व दिशेला* 
सर्वे नंबर 193 च्या उत्तर पुर्व कोपरा पासून सर्वे नंबर 254च्या दक्षिण पुर्व कोपरा 
*दक्षिण दिशेला*
 सर्वे नंबर 254 दक्षिण पुर्व कोपरा ते सर्वे नंबर 332 च्या पश्चिम दक्षिण कोपऱ्या पर्यंत 
*पश्चिम दिशेला* 
सर्वे नंबर 333 च्या दक्षिण पश्चिम कोपरा ते सर्वे नंबर 97 उत्तर पश्चिम पर्यंत हद्द वाढीस शासनाने मान्यता दिली आहे. नगरपालिकेच्या हद्दी मुळे  या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे नागरिकांच्या महसूली अडचणी दुर होणार आहेत  अनेक वर्षी पासून  शासन स्तरावर प्रलंबित असलेली हद्द वाढीची मागणी सहा माहिण्यात पाठपुराव्याने मार्गि लागली आहे लातूर जिल्हा परिषद, औरंगाबाद विभागीय आयुक्त, व मंत्रालयातील नगरविकास विभागात या संदर्भात सतत पाठपुरावा केला गेला होता आज शासनाने या हद्द वाढीस मान्यता दिली आहे अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

उदगीर तालुक्यातील आधार कार्डचे नवीन नोंदणी व नुतनीकरण केंद्र वाढवा. प्रहार जनशक्ती पक्षाकडून मा.उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन.

उदगीर तालुक्यातील आधार कार्डचे नवीन नोंदणी व नुतनीकरण केंद्र वाढवा.
 प्रहार जनशक्ती पक्षाकडून मा.उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन.

उदगीर:-दि.29/12/20 रोजी उदगीर येथे आधार कार्डची नवीन नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी BRC कार्यालयात नागरिकांची फार हाल होत आहेत. 
यात मोठ्याप्रमाणात EBC विद्यार्थी , जेष्ठ नागरिक, तरुण,दिव्यांग आणि महिलांना त्रास होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाकडून मा.उपजिल्हाधिकारी साहेबांना
आधार कार्डची नवीन नोंदणी आणि नुतनीकरण करण्यासाठी तालुक्यात केंद्र वाढविण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे,उपाध्यक्ष महादेव मोतीपवळ,संदीप पवार,
शहर कार्याध्यक्ष गणेश दावणे आणि प्रहार सेवक उपस्थित होते.

Monday, December 28, 2020

प्रहार जनशक्ती पक्षाची उदगीर महिला कार्यकारिणी जाहीर..

प्रहार जनशक्ती पक्षाची उदगीर महिला कार्यकारिणी जाहीर..
उदगीर:-प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी कांचन भोसगे तर तालुका उपाध्यक्ष पदी विजयमाला पवार, तालुका उपाध्यक्ष पदी सुजाता देवरे, तर तालुका कार्याध्यक्ष पदी शकुंतला रोडेवाड , तालुका संघटक पदी लता कोळी 
यांची निवड करण्यात आली.वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी कांचन भोसगे तर तालुका उपाध्यक्ष पदी विजयमाला पवार, तालुका उपाध्यक्ष पदी सुजाता देवरे, तर तालुका कार्याध्यक्ष पदी शकुंतला रोडेवाड , तालुका संघटक पदी लता कोळी 
  यांची निवड करण्यात आले.
उदगीर ता.अध्यक्ष- विनोदभाऊ तेलंगे, तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे,ता. ता. उपाध्यक्ष-  महादेव मोतीपवळे,तालुका कोषध्यक्ष अंगद मुळे ,
शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे ,शहर सह- सचिव - बालाजी बिरादार, प्रसिद्धी प्रमुख- अभय कुलकर्णी, अनेक प्रहार सेवक इत्यादी उपस्थित होते. यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन प्रहार सेवकांच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..

Monday, December 21, 2020

रेशन दुकानाच्या संदर्भात माहिती

*रेशनिंगचे नियम –* 

● रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.

● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.

● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.

● रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

● एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.

● ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील. तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.

● रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.

● रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.

● रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भाव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते. त्या सोबतच गाव व तालुका स्तरावरील रेशन दक्षता समिती मधील पदाधिकारी चे नाव व संपर्क क्रमांक असलेले फलक दर्शनी भागात लावणे अनिवार्य असते.

● बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

● वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

● दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन
महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.

https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp

रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे

https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp

रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.

http://mahafood.gov.in/pggrams/

वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.....

*महत्वपुर्ण_माहिती*
*🍀स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*🌴
*गहू - २ रू. किलो*
*तांदूळ- ३ रू. किलो* 
*साखर - २० रू . किलो*
*चनादाळ- ४५ रू. किलो*
*तुरदाळ- ५५ रू. किलो*
*उडीद दाळ - ४४ रू किलो*
*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*
(टिप :- संबंधी आपल्य‍ा क्षेत्रातील जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांचा कडून वरील दर / किंमत खात्री करुन घ्यावी. )
            जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर घेत असेल व तुम्हाला माल (रेशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!
*चोरांना खुलेआम आपली लूट करण्याची संधी देवू नका...!*
सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..! 
          जागा ग्राहक जागा ! आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्रार करा.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आपला,
*रविकांत सुर्यकांतजी गाडरे*

 > _*राज्य सरचिटणीस*_ 
 *माहिती अधिकार कार्यकर्ता समिती, महाराष्ट्र राज्य.* 
> _*राज्य दैनिक बाळकडू*_ 
 *पूर्व विदर्भ विभाग प्रतिनिधी* 
( नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली )

 *फक्त कॉल करा.* 

 *मो.नं. ९५८८६१७०३४ / ९७६४९१३५४५*

Saturday, December 19, 2020

त्यांचा साखरपुडा झाला, पण शीतल आमटे नव्हत्या... आठवणीने डोळ्यातून अश्रू वाहिले..

त्यांचा साखरपुडा झाला, पण शीतल आमटे नव्हत्या... आठवणीने डोळ्यातून अश्रू वाहिले..
श्रीकांत जाधव(बाऱ्हाळी):-'संदीप तू तिच्यासोबत बिनधास्त लग्न कर आणि माझ्याकडे ये. मी यथोचित स्वागत करून दोघांनाही जोड आहेर करते व तुला आयुष्यात कधीच मोठ्या बहिणीची कमी जाणवू देणार नाही', हे आपुलकीचे शब्द संदीप कांबळेंना साखरपुड्याच्या दिवशी सारखे आठवत होते. त्या आठवणींनी डोळ्यात अश्रू तरळत होते... आज शीतल आमटे हव्या होत्या, असं सतत संदीप कांबळेंना वाटत होते. मात्र वैवाहिक जीवनात प्रवेश करत असलेल्या संदीप कांबळे आणि रमाई कांबळे यांना मोठ्या बहिणीसारखं आपुलकीने जवळ घेणाऱ्या शीतल आमटे आता कधीच येणार नव्हत्या.
              त्यांचे कारणही तसेच आहे... युवापर्व ऑनलाईन शी बोलताना संदीप कांबळे यांनी मन मोकळे केले... कांबळे हे डीएड-बीएड विद्यार्थी संघटनेमध्ये कार्यरत आहेत. त्यांची डॉ. शीतल आमटेंशी काही वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर फोनवर बोलणं व्हायचं. समाजासाठी, विधवा, परितक्त्या महिलांसाठी काहीतरी चांगलं कार्य करण्याची इच्छा होती. याबाबत शीतल आमटेंशी कॉल आणि चॅटिंगवर नेहमी संवाद व्हायचा. शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल व्हायला हवे असं त्या सांगायच्या.
          घटस्फोटीत महिलेशी लग्न करायचे ठरले
नांदेड येथील मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात संदीप राहतात. रमाई आनंद कांबळे या तरुणीचा तीन वर्षापूर्वी घटस्फोट झालेला. अडचणी अनेक होत्या. या अडचणींबाबत शीतल आमटेंशी बोलणं व्हायचं. 'संदीप तू तिच्यासोबत बिनधास्त होऊन लग्न कर आणि माझ्याकडे ये. मी यथोचित स्वागत करून दोघांनाही जोड आहेर करते व तुला आयुष्यात कधीच मोठ्या बहिणीची कमी जाणवू देणार नाही" असा शब्द शीतल आमटे यांनी दिलेला.
           संदीप कांबळे सांगतात, साखरपुड्याच्या दिवशी ताईचे हे शब्द कानात गुंजत होते. तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार त्यांनी शीतल आमटेंना बोलून दाखवला होता. त्यांनी या लग्नाला प्रेरणा देऊन संपूर्ण पाठिंबा दिला. ७ फेब्रुवारी रोजी हे जोडपं लग्न करणार आहे. तीन वर्षापूर्वी घटस्फोट झालेला. धुळ्याची मुलगी. दिलेल्या घरी जादूटोण करतात असं सांगत होते. शीतल आमटेंच्या संपर्कात आलोय. स्त्रीयांसाठी काम करू असं सांगत होते. नियोजन झालं होतं. महिलांना एकत्र घेऊन काम करू. समाजामध्ये कृतिशील काम करायचे आहे. घटस्फोट, वारांगणा, विधवांंसाठी काम करणार होतो. होकार ही दिला होता. स्वत:पासून काम करत होतो. त्यांच्याशी लग्न कर म्हणून सांगायच्या त्या मला.

संदीप कांबळे म्हणतात खूप रडलो.
संदीप कांबळे म्हणाले, 'ते सगळं वेदनादायक होतं. मी खूप रडलो. ट्विट केलेलं होते. त्याच मुलीशी आता माझा साखरपुडा झाला आहे. आम्ही तिच्याशी चर्चा करून लग्नाची तारीख काढणार होतो. काल ताई असायला हव्या होत्या. आम्ही ७ फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहोत. त्याच दिवशी लग्न करेन. त्यांच्या साक्षीने आमचं झालं असतं असतं तर फार बरं वाटलं असतं. मोठ्या बहिणीसारखी उभी राहीन, हे त्यांचे शब्द सतत आठवत आहेत. लग्नाला उपस्थित राहीन म्हणाल्या होत्या. छोट्या भावासारखी वागणूक देत होत्या.'

Monday, December 14, 2020

उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थी -शिक्षक व पालक संवाद बैठक संपन्न...

उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थी -शिक्षक व पालक संवाद बैठक संपन्न...

 उदगीर : (दिनांक 13 डिसेंबर 2020 ) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षक संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. मनोहरराव पटवारी होते. यावेळी मंचावर विशेष उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सदस्य ॲड. एस. टी. पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव, सीईटी सेल प्रमुख प्रा. बी. एन. गायकवाड, पालक प्रतिनिधी प्रभाकर सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. यावेळी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी रिया कोटलवार, ऐश्वर्या स्वामी, शेख फैजान जमीर, स्नेहल पांडे ,सुशील बेळकूने, आदित्य गुजराती, लीना खत्री, वैभवी बिरादार, संतोषी बिरादार, नलिनी गुंजरगे, सुखराज कांबळे यांना रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी समृद्धी काकनाळे व ऐश्वर्या स्वामी यांनी विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाने राबवलेल्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करून आपल्या यशामध्ये महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगून शिक्षक व महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रा. पटवारी म्हणाले, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्थेने सर्व सुविधांची उपलब्धता केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पालकांच्या वतीने सुहास जगताप, शिवाजी बीबीनवरे, प्रभाकर सूर्यवंशी यांनी विधायक सूचना केल्या. दहावीत सर्वाधिक गुण घेऊन अकरावी प्रवेश घेतलेल्या शेख सानिया, कोमल मलगे, श्रुती जाधव, यश माने, वाणी घनपाठी, आयुषी येरोळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पालकांना दोन वर्षाच्या टारगेट बॅच विषयी लिखित नियोजन पत्रक देण्यात आले. यावेळी नागराळकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जे यश मिळवले त्यात विद्यार्थी व पालक आणि शिक्षकांचा वाटा आहे. विद्यार्थी जीवनामध्ये कितीही मोठा झाला तरी चांगला माणूस बनला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. पी. वाय. जालनापूरकर यांनी केले. आभार प्रा. नागनाथ खांडेकर यांनी मानले.

Wednesday, December 2, 2020

*शेतकरी नेते कैलासदादा येसगे यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान..* *मातोश्री शारदाबाई पवार संस्थेने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दिला पुरस्कार.*

*शेतकरी नेते कैलासदादा येसगे यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान..*

*मातोश्री शारदाबाई पवार संस्थेने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दिला पुरस्कार.*


देगलूर:-मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शेतकरी चळवळीत शेतकऱ्यांसाठी जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये देखील अहोरात्र काम करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे देगलूर तालुका अध्यक्ष तथा विश्व परिवाराचे संस्थापक अध्यक्ष कैलासदादा येसगे यांचा देगलूर-बिलोली विधानसभा क्षेत्राचे आमदार रावसाहेब अंतापुरकर साहेब व संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांच्या हस्ते देगलूर येथे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी प्रा.शिवकुमार जाधव,माधव पाटील लिंगणकेरूरकर,तुकाराम पाटील,राजू कांबळे, बालाजी पाटील,सुरेश पाटील,धनराज माने,मेघराज माने आदी उपस्थित होते..

Tuesday, November 24, 2020

*महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असतेवेळी उदगीर येथे शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश ताटपल्ले यांनी रक्तदानाची लोकचळवळ सुरुवात केली..*

*महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असतेवेळी उदगीर येथे शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश ताटपल्ले यांनी रक्तदानाची लोकचळवळ सुरुवात केली..*
उदगीर:-उदगीर येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अंकुश ताटपल्ले यांनी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असतेवेळीच एक सामाजिक बांधिलकी जपत स्वइच्छेने आपल्या मित्रमंडळाच्या माध्यमातून ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करण्याची लोकचळवळ सुरुवात केली आहे यांच्या या कार्याचा समाजातून कौतुक होत आहे यांच्या या संकल्पनेच्या माध्यमातून रक्ताची गरज असणाऱ्या अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे त्यामुळे या रुग्णांना अंकुश ताटपल्ले देवदूत वाटत आहेत राजकीय पदावर असून देखील कुठलाच गर्व न करता सदैव लोकांसाठी काम करत असल्यामुळे लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. त्यांनी एवढ्यावरच न थांबता त्याच्या येणाऱ्या 5 डिसेंबर निमित्त येणाऱ्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर ठेऊन रक्तपेढीत रक्त साठवून गरजू रुग्णांना ते मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करू इच्छिणाऱ्या युवकांनी 7507640399 व 8975704163 या नंबर वर संपर्क करावा..

*स्वा.रा.ती.म विद्यापीठाच्या वेळकाढू व गैरव्यहाराच्या विरोधात राजभवणावर धरणे.**सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व विद्यार्थी नेते श्रीकांत जाधव यांचा ईशारा.*

*स्वा.रा.ती.म विद्यापीठाच्या वेळकाढू व गैरव्यहाराच्या विरोधात राजभवणावर धरणे.*

*सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व विद्यार्थी नेते श्रीकांत जाधव यांचा ईशारा.*
उदगीर:-नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये अनेक गंभीर व दखलपात्र गोष्टी बेकायदेशीरपणे चालू असून सदर प्रकरणात विद्यापीठाचे कुलपती या नात्याने महामहिम राज्यपाल महोदयांनी सदर बाबीची दखल घेऊन दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून माननीय राज्यपाल कार्यालय राजभवन मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व मास विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी राज्यपालांना पाठवलेल्या ई-मेल मध्ये अधोरेखित केले आहे व आमच्या जीवितास जे काही बरे वाईट होईल त्यास आपण जबाबदार असाल असे देखील नमूद करण्यात आले आहे.
           महामहिम राज्यपाल महोदय यांना पाठवलेल्या निवेदनात पुढील मागण्या मांडण्यात आल्या.1)कोव्हिडं 2019 च्या लॅब उभारणीत प्रचंड आर्थिक अफरातफर करण्यात आलेली आहे आणि मर्जीतील लोकांना या खरेदी मध्ये सदस्य करून आर्थिक गैरकारभार करण्यात आलेला आहे. 2)कोव्हिडं 2019 च्या लॅब उभारणीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. 3)ऑनलाईन परीक्षेत एवढा गोंधळ झाला पण कोणावर कार्यवाही नाही व परीक्षेचे टेंडर घेणाऱ्या कंपनीला देखील काळ्या यादीत न टाकता पाठीशी घालणे यात पण आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. 4)एकाच व्यक्तीवर अनेक जबाबदारी देऊन विद्यार्थ्यांच्या पैश्यांची लूट करण्यात येत आहे. 5)सिनेट सदस्य नात्याने मागवलेली माहिती वेळेत न देणे. 6)बंधारा बांधणी मध्ये तांत्रिक मान्यता न घेता ई-टेंडर न करता कामे करण्यात आली. 7)राज्यपाल कार्यालयाला पाठवायचे म्हणून निकाल लवकर लावला म्हणायचं आणि ऑफिस व्हेरिफिकेशन च्या नावाखाली मार्कमेमो राखून ठेवायचे आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिले जाते हे त्रास देणे बंद होऊन विद्यार्थ्यांना वेळेत मार्कमेमो दिले पाहिजे. 8) बी.ए पॉलिटिकल सायन्स चे पेपर तपासताना चुकीची उत्तर संच वापरून अनेक विद्यार्थी नापास झाले यात पण कुणावर कार्यवाही करण्यात आली नाही असे अनेक विषय असून महामहिम राज्यपाल महोदयांनी सर्वांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावं अन्यथा हे विद्यापीठ विद्यार्थ्यांचे न राहता भ्रष्ट,मुजोर,हफ्तेखोर लोकांचे अधिकृत कार्यालय होईल कृपा करून आपण वरील सर्व मुद्द्यांवर लक्ष द्यावे अशी विनंती सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व मास विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी केले आहे.

Wednesday, November 11, 2020

*मातोश्री शारदाबाई पवार सेवाभावी संस्थेच्या वतीने कबनुर येथे कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम संपन्न..*

*मातोश्री शारदाबाई पवार सेवाभावी संस्थेच्या वतीने कबनुर येथे कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम संपन्न..*
कबनुर:-मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत जाधव कबनुरकर यांच्या संकल्पनेतून कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये ज्यांनी आपल्या जिवांची व परिवारांची काळजी न करता आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध मान्यवरांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला..
           याप्रसंगी गृह विभागाचे मुक्रामाबाद पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.कमलाकर गड्डीमे साहेब यांचा सन्मान संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बालाजी पाटील सुगावे व कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत जाधव कबनुरकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला,सामाजिक क्षेत्रात काम करणारे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मा. शिवशंकर पाटील कलंबरकर व पत्रकार नंदकुमार खंकरे व महावितरण विभागाचे मा.जगन्नाथ वडजे व सौ.अनुसया देशमुख यांचा सन्मान मा. कमलाकर गड्डीमे साहेब व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
               याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव बालाजी पाटील सुगावे तर प्रमुख पाहुणे म्हणून कबनुर गावातील ज्येष्ठ नागरिक आत्माराम देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष देशमुख,मुख्याध्यापक बालाजी वडजे,आदर्श शिक्षक रामराव बोळेगावे सर उपस्थित होते.
              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णा जाधव,नरसिंग पवार,संदीप कांबळे,माऊली व्हॅनडेकर पाटील,सतीश पाटील घोणशे यांनी विशेष प्रयत्न केले.
              यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक उत्तम देशमुख,विश्वांभर पाटील,गोविंद पाटील,विलास देशमुख, गुलाब देशमुख, बालाजी देशमुख, शिवाजी देशमुख, शामराव देशमुख, अरविंद देशमुख सह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते..
                 यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे व सत्कारमूर्तींचे आभार मानले...

Thursday, November 5, 2020

*"मास" विद्यार्थी संघटनेच्या जळकोट तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल बारसुळे तर तालुका कार्याध्यक्ष पदी बालाजी कापसे यांची निवड.*

*"मास" विद्यार्थी संघटनेच्या जळकोट तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल  बारसुळे तर तालुका कार्याध्यक्ष पदी बालाजी कापसे यांची निवड.*

उदगीर:-मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंट(मास) या विद्यार्थी संघटनेच्या जळकोट तालुकाअध्यक्ष पदी विठ्ठल बारसुळे यांची तर तालुका कार्याध्यक्ष पदी बालाजी कापसे यांची निवड संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर व उदगीर तालुकाध्यक्ष नवनाथ कोकणे यांच्या हस्ते उदगीर येथे करण्यात आली.
                शिक्षण क्षेत्रासंदर्भात मराठवाड्यातील अनुशेष भरून काढण्याबाबत किंवा केजी टू पीजी यामधील गुणात्मक कौशल्यावर आधारित
 शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडन्ट ही संघटना काम करत असून या संघटनेविषयी कुठेतरी तरुणांच्या  मनामध्ये आत्मीयता आहे,
 किंवा त्यांना विश्वास आहे.म्हणून अनेक तरुण हे पुढे येत असून कुठेतरी युवकांच्या मनात अजून
 व्यक्तीच्या जीवनातील शिक्षणाचे महत्त्व आणि त्याची जाणीवही मृत झालेली दिसत नाही असे श्रीकांत जाधव यांनी उपस्थित विद्यार्थी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले.
                खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा तसा उशिराने स्वातंत्र्य झाला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सुविधा, तंत्रज्ञान ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे तेवढे सहज शक्य झालं
 नाही आणि  मराठवाड्यामध्ये इतर विभागांपेक्षा जास्त मागासलेपण येणार हे साहजिक होतं आणि ते आले. आणि हेच
 मागासलेपण दूर करण्यासाठी "मास" सोबत मोठ्या प्रमाणावर तरुण काम करण्यासाठी
 उत्साही आहेत.

विरेश रमाकांत बारोळे यांनी वाढदिवसानिमित्त केले शहरातील गरजूंना वस्त्रवाटप..

विरेश रमाकांत बारोळे यांनी वाढदिवसानिमित्त केले शहरातील गरजूंना वस्त्रवाटप..
उदगीर-मा.विरेश रमाकांतजी बारोळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शहरातील गरजू लोकांना वस्त्रावाटप केले.कोरोना च्या परिस्थिती मद्दे असंख्य लोकांच्या हाताचे काम गेले,येणाऱ्या दिवाळीमध्ये नवीन कपडे घेण्यासाठी सक्षम नसलेल्या ह्या गरजूंना त्यांनी कपड्याचे वाटप केले.आपल्या वाढदिवसानिमित्त इतरत्र कुठलाही खर्च न करता त्यांनी हा उपक्रम केला.अश्या ह्या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.ह्या उपक्रमाचे आयोजित केल्या मुळे शहरातील गराजवंतान्ना चांगली मदत झाली आहे.अश्याच प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन विरेश बारोळे नेहमी करत असतात.ह्या उपक्रमात अक्षय बिरादार,श्रीकांतजी जाधव,औदुंभर कोरे,विठ्ठल लिंगोजी,नितीन कांबळे आदी मित्रपरिवार उपस्थित होता.

Monday, November 2, 2020

राष्ट्रवादी युवक काँग्रेस हिंगोली जिल्हा आढावा बैठक संपन्न..

राष्ट्रवादी युवक काँग्रेस हिंगोली जिल्हा आढावा बैठक संपन्न..         
                                               
 हिंगोली(प्रतिनिधी):- राष्ट्रवादी भवन हिंगोली  येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची आढावा बैठक कार्याध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी युवकांचे हात बळकट करावे  व आगामी काळात जिल्हास्तरीय  समिती मध्ये काही जागा या युवक आघाडी साठी राखीव असाव्यात  अशी विनंती केली तसेच आगामी निवडणूकी मध्ये स्थानिक स्वराज संस्था मध्ये सरपंच पंचायत समिती सदस्य , zp सदस्य यात जास्तीत जास्त युवकांना संधी द्यावी अशी मागणी केली तसेच आगामी औरंगाबाद पदवीधर मतदान संघ निवडणूकी मध्ये मतदार नोंदणी चा तालुक्यावार आढावा घेतला , व पक्षा चा उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडणू येण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रयत्नशील राहील असा विश्वास  श्री सुरज दादांना  दिला बैठकी साठी  हिंगोली जिल्ह्यचा आढावा घेऊन पदवीधर मतदानासाठी माहिती व सूचना केल्या. या वेळी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, जिल्हा सरचिटणीस बी डी बांगर, कळमनुरी विधानसभा अध्यक्ष वसंतराव पतंगे, जिल्हाउपाध्यक्ष बाबुराव वानखेडे, संतोष मामा गुटठे,नवनाथ देवकते,प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले, प्रदेश सचिव जावेद राज , प्रदेश सचिव नाझीम रझवी,  रमेश अडकीने,ईश्वर उरेवार, कमलेश यादव ,सुजय देशमुख ,सूरज वडकूते , केदार डांगे ,गोपाल मगर, पैठणे, भोयर सर, मिटकर सर, इरफान पठाण,इरफान पठाण, रशीद तांबोळी, अशोक पाटील, भाऊराव ठाकरे,स्वप्नील देशमुख  ,संतोष दोडके ,वैजनाथ वामन ,गजानन शिंदे ,राजू इंगोले ,धोंडू इंगोले ,संतोष इंगोले ,शुभम काळे , आतिक पुसेगावकर ,व सर्व पदाधिकारी उपस्थित होते
या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश, व नवीन नियुक्त्या करण्यात आल्या..

Sunday, November 1, 2020

प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या शहर सचिव पदी चरणसिंह चौहाण तर तालुका चिटणीस पदी,बालाजी श्रीमंगले यांची निवड.

*प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या शहर सचिव पदी चरणसिंह चौहाण तर तालुका चिटणीस पदी,बालाजी श्रीमंगले यांची निवड.*
उदगीर(वार्ताहर):-वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या, उदगीर शहर सचिव पदी चरणसिंह चौहाण तर तालुका चिटणीस पदी बालाजी श्रीमंगले  यांची निवड करण्यात आले.
उदगीर ता.अध्यक्ष- विनोदभाऊ तेलंगे, तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे,ता. सह- संपर्क प्रमुख - सुनील केंद्रे, ता. उपाध्यक्ष-  महादेव मोतीपवळे, 
शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे ,शहर सह- सचिव - बालाजी बिरादार,शहर संघटक प्रदीप पत्की, प्रसिद्धी प्रमुख- अभय कुलकर्णी, अनेक प्रहार सेवक इत्यादी उपस्थित होते. यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन प्रहार सेवकांच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..

Saturday, October 31, 2020

उदयगिरीत 'रासेयो' च्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा..

उदयगिरीत 'रासेयो' च्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा.
उदगीर : (31 ऑक्टोंबर 2020 )  येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात रामायण रचेता वाल्मीक ऋषी, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन  करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.मनोहरराव पटवारी यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ उपस्थितांना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर .आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा. डॉ.मकबूल अहमद, प्रा. डॉ. ए. यू. नागरगोजे तसेच अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती.

Sunday, October 25, 2020

*राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांनी दिले आठ दिवसामध्ये दिव्यांगाचे प्रश्न विशेष बैठक घेवून निकाली काढण्याचे आदेश.*

*राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांनी दिले आठ दिवसामध्ये दिव्यांगाचे प्रश्न विशेष बैठक घेवून निकाली काढण्याचे आदेश.*
उदगीर(वार्ताहर):-प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे यांनी 1/09/20 रोजी  दिलेल्या निवेदानाची दखल घेवून दि.आज 25/10/20 रोजी मा.ना.संजय बनसोडे साहेब यांना दिव्यांगाची बैठक लावून  आठ दिवसांत दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लावण्यास संबंधित अधिकारी यांना निर्देश देवुन सर्व दिव्यांगाचे प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले आज शासकीय दौऱ्यावर आले असता बैठकीचे नियोजन केले असता आज दिव्यांग बांधवानची नवीन शासकीय विश्राम ग्रह उदगीर येथे प्रहार अध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगाची बैठक सम्पन्न झाली ...
         बैठकीतील मुद्दे ..
 1) उदगीर तालुक्यातील  दिव्यांगाना त्यांच्या हक्काचा योजनांचा लाभ मिळणे बाबत , आणि उदगीर तालुक्यातील ग्रामपंचायत मधील  5% निधी त्वरित वाटप करण्यात यावा. 
2) संजय गांधी निराधार योजना, उदगीर शहर नगर परिषदेतील दिव्यांगाचा 5 % निधी मिळणे बाबत.
3)दिव्यांगाना शासन निर्णय नुसार अत्योदय योजनेत समाविष्ट करणे. 
4) उदगीर तालुक्यातील शासकीय रुग्णालयातील दिव्यांग व्यक्तीचे ऑनलाइन मेडिकल प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात यावे.. 
5) दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या जागेत दुकान देण्यात यावे.. 
6) शासन निर्णय नुसार दिव्यांग बांधवांना विनाअट घरकुल देण्यात यावे ... 
दिव्यांगा चा हक्काचा निधी तात्काळ वाटप करा. असे दिव्यांगाच्या अनेक समस्या बद्दल बैठकीत मागणी करण्यात आली.येत्या
 आठ दिवसांमध्ये जर शासन निर्णय प्रमाणे उदगीर तालुक्यातील दिव्यांगाचे प्रश्न मार्गी न लागल्यास सर्व दिव्यांग बांधवा सहीत प्रहार च्या वतीने प्रशासनाच्या विरोधात आदोंलन उभा करून प्रहार च्या वतीने दिव्यांगाना न्याय मिळून देवू .
  यावेळी बैठकीत प्रमुख उपस्थितीत उदगीर ता.अध्यक्ष- विनोदभाऊ तेलंगे, तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे,तालुका उपाध्यक्ष- संदीप पवार ,, उपाध्यक्ष-  महादेव मोतीपवळे , ता. सचिव - महादेव आपटे ,ता. संघटक- सूर्यभान मामा चिखले ,विद्यार्थी आघाडी ता. उपाध्यक्ष अजय गंभिरे ता.चिटणीस - नीलकंठ ता.सरचिटणीस अविनाश शिंदे मुधोळकर , शहर सह- सचिव - बालाजी बिरादार, ता चिटणीस गिरीजप्पा नवरखेले,ता.सह- सचिव संगम वडले,शहर कार्यध्यक्ष-गणेश डावने, शहर संघटक- प्रदीप पत्की,  ,ता.चिटणीस- रवी आदेप्पा, शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे, दिव्यांग बांधव ,सचिन सोलापूरे , कावळे महादेव, कांबळे नरसिंग ,काकडे बालाजी प्रभात देशपांडे ,संदीप सुर्यवंशी गणेश कांबळे रामजी पिंपरे असंख्य दिव्यांग व प्रहार सेवक इत्यादी उपस्थित होते.

Thursday, October 22, 2020

*प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी..**राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी..*

*प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी..*
*राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी..*
वार्ताहर:-राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व पवार साहेबांनी मेहबूबभाई यांना विधान परिषदेत एक संधी द्यावी असा खंबीर खमक्या निर्भीड संघर्षशील नेता सदैव युवकांसाठी रस्त्यावर उतरणारा नेता,म्हणून मेहबूबभाई शेख यांच्याकडे पाहिलं जातं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतेवेळी पवार साहेबांनी एका सर्वसामान्य अल्पसंख्याक युवकाला युवक प्रदेश अध्यक्ष पदावर बसविले व मेहबूबभाई शेख यांनी युवकांची कामे मार्गी लावण्याचे काम आज पण करत आहेत सरकारविरोधात उच्च न्यायालयात जाऊन मेहबूबभाई यांनी चारा छावणीवर घातलेल्या जाचक अटी उठवल्या होत्या.राष्ट्रवादी युवक चे पद स्वीकारताच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्या समोर आंदोलन केले गाजर नको रोजगार हवा यासाठी प्रतिकात्मक गळफास आंदोलन, रस्ता रोको करून बेरोजगारांचा आवाज दिल्लीमध्ये पोहचविला, जनसामान्यांच्या आवाज थाळी नादाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहचविणारा, पुरग्रस्तांसोबत आपली दिवाळी साजरी करणारा,भाजप सरकार व मुख्यमंत्री यांच्यावर बेधडक टीका करणारा,प्रत्येक नेत्यांचा विश्वास जिंकून त्यांना आपलंसं करणारा,आपल्या माणसासोबत आपुलकीने संवाद साधणारा अश्या सर्वगुणसंपन्न कार्यकर्त्याला पवार साहेबांनी एक संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी केली आहे..

Tuesday, October 20, 2020

*शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या.* *प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी.*

*शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या.*
 *प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी.*
उदगीर(श्रीकांत जाधव):-अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे उदगीर तालुकासह आजुबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी मागच्या काही दिवसात सोयाबीनची काढणी केली होती आणि रास करणे शिल्लक होते.पंरतु गेल्या आठ दिवसात उदगीर परिसरात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे तसेच तुरी व अन्य पिकांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे तरी संबंधित शेतकऱ्यांना शासनांमार्फत सरसकट भरपाई देण्यात यावी  असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा.उपजिल्हाधिकारी साहेब उदगीर यांच्या मार्फत मा .मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रहार अध्यक्ष विनोद तेलंगे, कार्याध्यक्ष रवि बेलकुदे,उपाध्यक्ष महादेव मोती पवळे,संदीप पवार, संघटक सुर्यभान चिखले, सरचिटणीस अविनाश शिंदे चिटणीस निळंकठ मुदोळकर, शहर कार्याध्यक्ष गणेश दावणे चंद्रकांत येंजगे सर व इतर प्रहार सेवकांनी निवेदन दिले आहे..

Thursday, October 15, 2020

*मा.राजेश्वरजी निटुरे सावकार यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन बरे होण्या करिता आई जगदंबा येथे अभिषेक.* *राजेश्वर भाटे मित्र मंडळाचा पुढाकार.*

*मा.राजेश्वरजी निटुरे सावकार यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन बरे होण्या करिता  आई जगदंबा येथे अभिषेक.*

*राजेश्वर भाटे मित्र मंडळाचा पुढाकार.*

उदगीर(श्रीकांत जाधव):-उदगीर नगरीचे माजी नगराध्यक्ष मा.राजेश्वरजी निटुरे सावकार यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन बरे होण्या करिता  आई जगदंबा येथे अभिषेक  दि.१3/१०\२०रोजी वार मंगळवार  सकाळी 10 वाजता राजेश्वर भाटे मित्र मंडळा कडून सोमनाथपूर येथील जागृत आई जगदंबेच्या मंदिर येथे महाअभिषेक करण्यात आला त्याप्रसंगी राम पाटील सरपंच,राजेश्वर भाटे, अमित माडे, संजय राठोड, प्रमोद हुडगे.यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अभिषेक सोहळा पार पडला.. तरी त्या प्रसंगी सर्वांनी मनोभावी प्रार्थना केली मा. राजेश्वरजी निटुरे सावकार बरे होवे हीच आई जगदंबेला साकडे घालण्यात आले..

*कौडगाव ते ढोरसांगवी रस्ता होईल का ?* *युवा नेते विकासभाऊ ढाकणे यांचा प्रश्न..*

*कौडगाव ते ढोरसांगवी रस्ता होईल का ?*

*युवा नेते विकासभाऊ ढाकणे यांचा प्रश्न..*

अहमदपूर(श्रीकांत जाधव):-कौडगाव पो. कुमठा ( बु.) ता.अहमदपूर जि.लातूर येथील, कौडगाव ते ढोरसांगावी हा रस्ता स्वतोंत्रोतर काळापासून रखडला आहे गावातील सर्व दळणवळण याचं रस्त्यावर अवलंबून असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी याचं रस्त्या ने जावे लागते रस्ता मंजूर होण्यासाठी  विकास ढाकणे  सरपंच माणिकराव गंगाजी यांनी तत्कालीन मंत्री ना.पंकाजाताई मुंडे- पालवे ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अर्ज दिले व जिल्हा परिषद, माजी आमदार , चालू आमदार फक्त रोड विषयी आश्वासन देत आहेत म्हणून गावकरी मंडळी खुप संकटात आहेत ,,,,,!!

*उदयगिरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.*

*उदयगिरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.*

  उदगीर(श्रीकांत जाधव):-उदगीर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारताचे 11 वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.मनोहरराव पटवारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर .आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, दिनविशेष समिती प्रमुख डॉ. दीपक चिद्दरवार, डॉ. मल्लेश झुंगास्वामी, डॉ. हमीद आश्रफ, ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार तसेच अनेक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

*उदगीर कोविड-19 रुग्णालय येथील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्याचे थेट प्रक्षेपण बाहेर स्क्रीन वर करा.* *प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*

*उदगीर कोविड-19 रुग्णालय येथील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्याचे थेट प्रक्षेपण बाहेर स्क्रीन वर करा.*

*प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*

उदगीर(श्रीकांत जाधव):- उदगीर शहरातील व ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे रुग्णांची जास्ती प्रमाणात भर पडत आहे. कोविड सेंटर येथील  रुग्णाच्या नातेवाईकात आणि सर्व सामान्य जनतेला असा प्रश्न पडला आहे की शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 सेंटर येथे रुग्णावर चांगल्या प्रकारे उपचार होत नाहीत. यातून रुग्णाचें नातेवाईक आणि जनतेच्या मनात डॉक्टरांबद्दल अविश्वास निर्माण होत आहे जे उपचार रुग्णांवर उपचार केले जातात ते सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्याचे थेट प्रक्षेपण बाहेर स्क्रीन वर करून डॉक्टर व रुग्ण च्या नातेवाईकांन मध्ये होणारे गैरसमज दुर व्हावे या साठी उपजिल्हाधिकारी साहेब यांना कोविड सेंटर येथील सी.सी.टी.व्ही.कँमरे बसवून थेट प्रक्षेपण बाहेर करावे असे निवेदन देण्यात आले .या वेळी प्रहार तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे , तालुका कार्याध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, तालुका उपाध्यक्ष-महादेव मोतीपवळे, ता. उपाध्यक्ष- संदीप पवार , ता. सहसचिव-महादेव आपटे, ता.सह-संपर्क प्रमुख सुनील केंद्रे, ता.सरचिटणीस-अविनाश शिंदे , ता.प्रसिद्धी प्रमुख -अभय कुलकर्णी.इत्यादी प्रहार सेवक  उपस्थित होते...

Tuesday, October 6, 2020

*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्हा उपाध्यक्ष पदी संग्राम पवार यांची निवड.*

*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्हा उपाध्यक्ष पदी संग्राम पवार यांची निवड.*
अहमदपूर:-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिलदादा गव्हाणे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष मा.आमदार बाबासाहेबजी पाटीलसाहेब यांच्या व मराठवाडा अध्यक्ष प्रंशातजी कदम यांच्या मान्यतेने लातूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये अहमदपूर तालुक्याचं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष म्हणून योग्य जबाबदारी सांभाळून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केलेले व देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम करून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवलेले विद्यार्थी नेते संग्राम पवार यांची पक्षाने दखल घेऊन जिल्हा कार्यकरिणीवर उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली या निवडीबद्दल संग्राम पवार यांचे विविध स्तरातून स्वागत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो अशी भावना लोकांची झाली आहे..    
               या निवडीसह जिल्ह्यातील  तालुका व जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात येत आहे व या जि कार्यकारिणी शिवाय ईतर कोणताही पदाधिकारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर च्या  कार्यकारिणीवर नाही व उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर चे जिल्हाध्यक्ष आशिष वाघमारे यांनी दिली आहे.

Thursday, October 1, 2020

*उदगीरच्या अर्धवट ट्रामा केअरच्या बांधकामासाठी २.७६ कोटीच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता* - संजय बनसोडे

*उदगीरच्या अर्धवट ट्रामा केअरच्या बांधकामासाठी २.७६ कोटीच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता*

  - संजय बनसोडे

 मुंबई /उदगीर दि. १/ १० /२०२०
उदगीर येथील ट्रामा केअर सेंटर च्या दुसर्‍या टप्प्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने 2.76.60 लक्ष निधी साठीची प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर ट्रामा केअर सेंटर चे बांधकाम सन २०१३ मध्ये सुरू करण्यात आले होते. 

परंतु सदर ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम निधीअभावी अर्धवट स्थितीमध्ये होते त्यामुळे ट्रामा केअर सेंटरची इमारत वापरात नव्हती. अनेक वर्षे धुळखात पडलेल्या ट्रामा केअर सेंटर चालु करण्याबाबत व निधीसाठी ना. संजय बनसोडे यांनी विशेष लक्ष घातले होते व त्यासाठी पालकमंत्री मा. ना. श्री. अमित देशमुख साहेब यांच्या मान्यतेने आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांनी २७६.६० लक्ष इतक्या रकमेचा बांधकामाचा प्रस्ताव  शासनास सादर केला होता. 

सध्या स्थितीत लातूर जिल्ह्यामध्ये covid-19 रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे त्यासाठी अपूर्ण असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्ण होणे अत्यंत आवश्यक होते जेणेकरून या इमारतीमध्ये DEDICATED COVID HOSPITAL ( DCH )  सुरू करून रुग्ण सेवा देणे गरजेचे होते. वाढती रुग्ण संख्या पाहता हे काम तात्काळ होणे गरजेचे होते. यासाठी राज्य शासनाने ट्रामा केअर सेंटर च्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामांसाठी २.७६ लाख रू. निधीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

यासाठी मागील ५ महिन्यापासून मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब,वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. अमित विलासराव देशमुख साहेब, मा. ना. श्री. राजेश टोपे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सदरील निधी मंजूर करून घेतला आहे,त्यामुळे अनेक वर्षे धूळ खात पडलेला ट्रामा केअर सेंटर चा प्रश्न  लवकरच मार्गी  लागणार आहे ,त्यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ट्रामा केअर सेंटर प्रकल्प पूर्णत्वाला जाऊन सर्व सामान्य नागरिकाच्या आरोग्य सेवेसाठी तयार होणार आहे.

Wednesday, September 30, 2020

*पाणीपुरवठा योजनांचा सुधारीत प्रस्ताव 15 दिवसात विभागाला सादर करावा* *- राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश*

*पाणीपुरवठा योजनांचा सुधारीत प्रस्ताव 15 दिवसात विभागाला सादर करावा*

*- राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश*

मुंबई दि. 30 :लातूर जिल्हयातील 27 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा सुधारीत प्रस्ताव येत्या 15 दिवसात विभागाला सादर करण्याबरोबरच, नगरपरिषदांच्या पाणी पुरवठा योजना 31 मार्च 2021 पूर्वी पूर्ण कराव्यात असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले.

लातूर जिल्हयातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा आज मंत्रालयात आढावा घेण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त उदय टेकाळे ,पाणी पुरवठा विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री.गजभिये, औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री. लोलापोड यांच्यासह संबंधित अधिकारी आणि जिल्हयातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन अभियानाची अंमलबजावणी कालबध्द पध्दतीने होणे आवश्यक आहे. लातूर जिल्हयात सध्या चालू असलेल्या योजनांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

यावेळी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी जलजीवन अभियान मधील नियोजन, योजनांची सद्यस्थिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाऱ्या नागरी पाणी पुरवठा व भूयारी गटार योजनांच्या कामांचा आढावाही यावेळी घेतला.

Sunday, September 27, 2020

*मुखेड तालुक्यातील कबनुर गावचा समावेश जलजीवन मिशन योजनेत करावा.* *श्रीकांत जाधव यांचे पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना साकडे.*

*मुखेड तालुक्यातील कबनुर गावचा समावेश जलजीवन मिशन योजनेत करावा.*

*श्रीकांत जाधव यांचे पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना साकडे.*

बाराहाली:-मुखेड तालुका हा डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो तालुक्यात वाड्या वस्त्या जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सतत तालुक्यातील लोकांना वणवण करावी लागते त्यामुळेच तालुक्यातील बाऱ्हाळी सर्कल मधील कबनुर या गावात देखील पिण्याच्या पाण्यासाठी बारा महिने माय माऊलींना तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागते उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्याबरोबरच सांडपाण्याच्या पाण्यासाठी देखील खूप वाईट परिस्थिती निर्माण होते टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा लागतो काही वेळेस ते पण मिळत नाही मागील उन्हाळ्यात श्रीकांत जाधव यांनी गावचे काही देणे लागतो या भावनेतून काही सामाजिक संस्थेकडून गावात पाणीपुरवठा सुरुवात केला होता पण हे प्रत्येक वर्षी करणं शक्य नाही त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन कबनुर गावचे भूमिपुत्र व सतत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणारे श्रीकांत जाधव यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना भेटून गावातील नागरिकांची होणाऱ्या गैरसोयीबद्दल माहिती देऊन जलजीवन मिशन योजनेत कबनुर गावचा समावेश करावा यासाठी साकडे घातले राज्यमंत्र्यांनी देखील श्रीकांत जाधव यांना आश्वस्त करून निवेदनाची प्रत संबंधित खात्याच्या स्वीय सहाय्यकाकडे दिले.
              या योजनेत कबनुर गावचा समावेश झाला तर प्रत्येक नागरिकांना घरपोच पाणी मिळेल त्यांची रोज होणारी पायपीट थांबेल व पाण्याचे देखील योग्य नियोजन होईल व गावात केंव्हाच पाणीटंचाईला सामोरे जावाव लागणार नाही असे श्रीकांत जाधव यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रवीण पटवारी उपस्थित होते.

*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* *उदगीर शहरातील विकास कामासाठी 3 कोटी 4 लाखाची तरतूद*

*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 

* उदगीर शहरातील विकास कामासाठी 3 कोटी 4 लाखाची तरतूद*

  लातूर/ उदगीर, दि. 27(जिमाका): उदगीर नगर परिषद अंतर्गत उदगीर शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन संसदीय कार्य, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
     ही सर्व कामे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दलित वस्ती सुधार योजना, नागरी दलितेत्तर योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान (जिल्हास्तर) व स्वच्छ महाराष्ट्र प्रोत्साहन निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहेत.
     उदगीर शहरामधील संमिश्र सोसायटी येथे पेव्हिंग  ब्लॉक व नालीचे कामे करणे, येरमे नगर येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता व अशोक नगर येथे स्मशानभूमी विकसित करणे, शिवशक्ती नगर येथे रस्ता मजबुतीकरण व सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली करणे, खडकाळी गल्ली येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे, तळवेस गल्ली व गांधी नगर येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता, रस्ता दुभाजक व नाली बांधकाम करणे, नालंदा नगर व बनशेळकी रोड येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे व येनकी मानकी रोड येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम करणे या सर्व कामांचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेल्या शहरी बेघर निवारा येथे भेट देऊन तेथील बेघर बांधवांसोबत चर्चा करून निवाऱ्याचे कौतुक ही त्यांनी केले. 
      उपरोक्त नमूद कामासाठी एकूण तीन कोटी चार लाख रुपये इतकी अंदाजपत्रकीय  तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. 
             या भूमिपूजन समारंभासाठी उदगीर नगर परिषदेचे अध्यक्ष बसवराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगर परिषद मुख्याधिकारी भारत राठोड, बांधकाम सभापती मंजूरखां पठाण, बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य कल्याण पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
               *********

Saturday, September 26, 2020

*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत...राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून सुमठाणा येथे नागरिकांची आरोग्य तपासणी*

*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत...
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून सुमठाणा येथे नागरिकांची आरोग्य तपासणी*


उदगीर(श्रीकांत जाधव),दि.26:- महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात दिनांक 15 सप्टेंबर 2020 पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी आरोग्य पथकाकडून केली जात आहे. 
     उदगीर तालुक्यातील सुमठाणा येथे पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांकडून "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत कशा पद्धतीने गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करून त्याच्या नोंदी कशा ठेवल्या जात आहेत याची माहिती जाणून घेतली व या वेळी श्री बनसोडे यांच्या हस्ते सुमठाणा ग्रामस्थांची प्रातिनिधिक स्वरूपात स्वतः आरोग्य तपासणी करण्यात आली.
     यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी या मोहिमेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आरोग्य तपासणी करावी. शहरी व ग्रामीण भागातील एक ही नागरिक आरोग्य तपासणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी व लातूर जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी शासन व प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. 
      लातूर जिल्ह्यात 1हजार 535 आरोग्य पथकांची स्थापना प्रशासनाने केली असून या पथकामध्ये 199 पथके शहरी भागासाठी असून 1336 पथकामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील जवळपास 4 लाख 29 हजार कुटुंबाची आरोग्य तपासणी या मोहिमेअंतर्गत आरोग्य पथकाकडून दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2020 व दिनांक 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 या दोन टप्प्यात केली जाणार आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते अहमदपूर येथून दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आलेला आहे.

*अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पहाणी*

*अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पहाणी* 

*अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विहिरी, नदी काठावरील बंधाऱ्याचे पंचनामे करण्याचे निर्देश*

    उदगीर(श्रीकांत जाधव),दि.26 : उदगीर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसाने मुग , तुर सोयाबीन पीकाचे मोठे  नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यावरण, संसदीय कार्य पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.
    उदगीर तालुक्यातील नागलगाव, सुमठाणा , कासराळ ,वाघदरी, टाकळी, धडकनाळ, बोरगाव,बनशेळकी, येणकी, तोगरी, मोघा येथील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची व बनशेळकी येथील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहाणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली. यावेळी श्री. बसवराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती श्री. शिवाजी मुळे, जि. प. सदस्य श्री. कल्याण पाटील, जि. प. सदस्य श्री. ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जि. अध्यक्ष श्री. चंदन पाटील नागराळकर, उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी सुळे, उपविभागीय कृषी अधिकारी तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी नाबदे, पोलीस निरीक्षक ग्रामीण वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवटे, यांच्या सह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. नुकसानग्रस्त एक ही शेतकरी पंचनामे पासून वंचित राहता कामा नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

   तसेच नुकसान झालेल्या पीकाचे विमा मिळण्यासाठीचे अर्ज शेतकऱ्यांनी तात्काळ भरावे यासाठी कृषी विभागाने आँनलाईन /आँफलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बनसोडे यांनी केले. तसेच भारतीय कृषी विमा कंपनीने या नुकसानीचे पंचनामे बाबत अत्यंत तातडीने कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.

    या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे , नदी काठावर शेतकऱ्यांचे बंधारे वाहून गेले आहेत तसेच बंधाऱ्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशाचे सुद्धा पंचनामे करण्यात यावेत. या शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागामार्फत मदत  करण्यात येईल, आश्वासन राज्यमंत्री  बनसोडे यांनी दिले.
    यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी उदगीर उपविभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती दिली. प्रशासनाकडून पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे ची कारवाई सुरू असून येथील एक ही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunday, September 20, 2020

लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे हाल..

आज माझ्या मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी सर्कल मध्ये काही कामानिमित्त काही गावात गेलो असता तेथील शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जाण्याचा योग आला अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांच्या हाताला आलेले मुगाचे पीक गेले आणि आता गेली पाच ते सहा दिवस झालेल्या अतिवृष्टी मुळे (ढगफुटी) सोयाबीन,उडीद,कापूस,तूर व अन्य तत्सम पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे सोयाबीन च्या शेंगांना तर अक्षरशः मोड फुटले आहे काही शेतांचे तर होत्याचे नव्हते झालेले आहे तरी देखील बाऱ्हाळी सर्कल च्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या व नांदेड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी अंबुलगेकर यांना आजपर्यंत तरी या शेतकऱ्यांची भेट घ्यावी त्यांना धीर द्यावा अस न करणं किती परोपकारी माणसं म्हणायची यांना ज्यांच्या मुळे आज महाराष्ट्रातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारी संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि त्याचा अध्यक्ष होण्याचं बहुमान बाऱ्हाळी सर्कल मधील नागरिकांमुळे मिळाला हे एवढ्या लवकर विसरून जावं हे ज्या नागरिकांनी सौ.अंबुलगेकर मॅडम जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केलेल्या व आपल्या सर्कल च्या सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे आपणच अध्यक्ष असा समज बाळगणाऱ्या नागरिकांच्या भावनांचा जणू अपमानच म्हणायचं याला पण याला सर्वस्वी सौ.अंबुलगेकर मॅडमच जबाबदार म्हणता येणार नाही याला नागरिक देखील तेवढेच जबाबदार आहेत आणि अशी परिस्थिती जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बाबतीतच नाही तर तालुक्याचे आमदार असो,प्रत्येक पंचायत समिती सदस्य असो किंवा सरपंच असो प्रत्येक पदावरील जबाबदार व्यक्ती शेतकऱ्यांच्या दुःखात शेतकऱ्यांना  भेटावं त्यांच्या शेताची पाहणी करावी व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान दाखवावे पण अस घडताना कुठेच दिसत नाही त्यामुळे संबंधित अधिकारी देखील पंचनामे देखील घरी बसूनच करतात आणि शेतकऱ्यांना भेटावा तितका मावेजा भेटत नाही काही शेतकरी पुत्रांनी यासंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना भेटून परिस्थती समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर अश्या शेतकरी पुत्रांना फक्त स्वतःच्या इगो साठी लोकप्रतिनिधी आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आणि हे असेच होत राहणार जोपर्यंत नागरिक धनशक्ती सोडून जनशक्ती चा स्वीकार करणार नाहीत..

-श्रीकांत जाधव
मो.न:-8975704163

Thursday, June 18, 2020

कविता

1)किसी को आसानी सें मत मिलना,
लोग बहोत सस्ता समझ लेते है!

2)ध्येयवेडी माणसं कुटुंबाच्या वाट्याला जास्त
येत नाहीत; ती समाजाच्या वाट्यालाच
जास्त येतात!!

#कटूसत्य

3)ये दुनिया है जनाब..
महफिल में बदनाम और
अकेले में सलाम करती है!

4)भावकीचे चार लोक एकाच दिशेने,एकाच विचाराने
तेव्हाच चालतात..जेव्हा पाचवा खांद्यावर असेल!!

#कटूसत्य
#भावकी_जिंदाबाद

5)लोक काय म्हणतील? याचा विचार नकोच नको..
लोक फक्त हसायला येतात;पोसायला नाही!!

#काय_म्हणता?

6)जगाच्या यात्रेत कर्तृत्वाचा बाजार मांडावाच लागतो;अस्तित्वाची किंमत तशी होतच नाही!!

7)आपल्या यशातले 'वाटेकरी'..अपयशावेळी किना-यावर थांबून 'सल्लागार' होत असतात! 😢

8)समुद्राला,वादळांना आव्हान देताना,
नावाड्यानेच मग घात केला खरा..

9)छातीची ढाल करून सांभाळले ज्यांना,
त्यांनीच खुपसला हा पाठीत आज सुरा!

10)त्यांनी त्यांचेच पाहिले,
आम्ही उगाच ओझे वाहिले! 🙏

11)एक फोटो तुझा ठेवलाय अलमारीत शाबूत,
तुझ्या सौंदर्याचे लागतील कधीतरी पुरावे!

12)कुणी काळजात निवा-याला, 
तर कुणी देव्हा-याला ठेवली..
आईच्या कुशीत असताना मी,
सुखे दारात पहा-याला ठेवली!

13)कुणाला सांगावे..कसे आयुष्य ढवळून गेले,
कवितेच्या नादात सारे गणगोत बदलून गेले!

घर एकत्र नांदताना लिहीले होते ज्या सुखांवर,
वाटणीवेळी त्यांना कुरवाळायचे विसरून गेले!

14)गांव सोडले पण 'गांवपण' बाकी आहे,
तिथे अजून माझे एक नांव पण बाकी आहे..

तिर्थयात्रेस आल्यावर कळले मला मग,
माय-बापातच खरे 'देवपण' बाकी आहे!



                                    

                                           

                                   

             

                    

                               

Monday, May 18, 2020

कोरोनाच्या काळातील संपर्क

*....सपंर्क....*   

    आज मी सकाळी कांही कामा निमीत्य घरातुन बँकत जान्यासाठी निघालो.पण मना भितिचे काहुर होते.कोन भेटेल भेटलेतर कोनी ओळखना गेलेतर बरे ओळखुन रामराम त्यांनी केलातर लांब उभे राहुन रामराम केल्या नंतर जवळ येउन बोलायला त्यांनी सुरुवात केली तर मी मागे सरकुन बोलावे म्हणले  तर  हे सगळ मनात घोळत होते.मनात येवढी भिती सर्व या कोरोना मुळे सर्वाना वाटत आसताना देखील काही महाभाग मुदाम जवळ येतील मी सुरक्षित तर घर सुरक्षित. घर सुरक्षित तर गली सुरक्षित.  गली सुरक्षित तर गाव सुरक्षित .गाव सुरक्षित तर तालुका,जिल्हा ,देश सुरक्षित .वाटत होते पण या विचारात बँके जवळ केंव्हा पोहचलो ते मला सुधा कळले नाही पाहातो तर बँकेच्या समोर लोकाचा गोध़ळ पांगविताना पोलीस केव्हा माझे जवळ पोहचला मला कळलेच नाही.ये मामा मी मानुस बोलतय पोलीस नाही मला पोलीस बनन्यास भाग पाडु नका नाहीतर मला दंडुका दाखवावा लागेल .हे सर्व बघुन बँकेतुन रुपय काढावे का काढना गेले तर घरी किराना साहीत्य कसे न्यावे घरचे लेकरे उपवासी राहातील.कोरोनामुळे भिती होतिच तरी ही आंतर ठेउन लाईनीत बँकेत पोहचलो कँशियर कडुन रुपय घेऊन कसा बसा बाहेर पडलो .रामराम साहेब तुमच्या मुळे मला माझे घर चालवण्या साठी मोदिजीनी शेतकऱ्यासाठी पाठवलेले दोन हाजार बँकेत उचलता आले.कसा बसा किराना बाजार घेऊन घरी आलो. आसेच काही दिवसा नतर आमच्या गावची बातमी दुरदर्शन वर आली की या गावचे पोलीस स्टेशन  मधे डिवटीवर आसलेले हे पोलीस याना कोरोनाची लागन झाली त्यांच्या सपंर्कात जेवढे लोक आले त्यांनी कोरोना चाचनी करुन घ्यावी मन सुन्न झाले.मी त्या दिवसी त्यांना बोललो आहे .घरी सागांवे कसे विचारानी गोधंळुन गेलो.तरी सकाळी उढल्या नतंर मन घट करुन सर्वाना या घटणेची माहीती दिली मंग सर्व जन आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी केली पण मन काही स्थिर राहीना सर्व बेचेन तिनदिवसानी रिपोट निघेटीव आला .आता घरच्या नि सागितले उपवासी राहाऊत पण गोधळात जायचे नाही पण त्या देश सेवा करणाऱ्या सेवक हा सुरक्षित रहावा म्हणुन एका तरी नागरीकाने विचार केलातर सर्व ठी होईल.मंग लागा तयारीला विनाकारन घरातुन बाहेर पढणार नाही .देश सेवा करनारे जवानना त्रास देनार नाही   त्यांना त्रास देशाला त्रास.

*लेखक*
-बालाजी हणमंतराव देशमुख
विमा सल्लागार
मो:-9764669763

Wednesday, May 6, 2020

यापुढील काळात नोकरभरती न करण्याचा निर्णय दुर्दैवी-श्रीकांत जाधव.

उदगीर:-आज देशात कोरोना या महामारीचे संकट येऊन कोसळले आहे यात सर्व घटकांचे कमीजास्त प्रमाणात नुकसान झाले आहे या सर्व घटकांनी या नुकसानाला आता मान्य करून आपली पुढील भूमिका बजावत आहेत पण आज अनेक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांच देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दिवसेंदिवस त्यांचं वय वाढत चाललं आहे आणि यातच महाराष्ट्र शासनाने यापुढील काही वर्षे नोकरभरती न करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांसाठी जीवघेणा ठरेल का काय अस वाटत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक युवकांची नोकरीला लागण्याची वयोमर्यादा संपत आली आहे अश्या युवकांसाठी तर हा निर्णय खूपच दुर्दैवी आहे त्याला कारण ही तसेच आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात युवकांचे विवाह करतेवेळी मुलींच्या घरून सर्वात पहिले विचारला जाणार प्रश्न म्हणजे मुलगा कोणती नोकरी करतो आणि तो मुलगा देखील आजपर्यंत आपलं सर्व वय शिक्षणात घातल्यामुळे त्याला शेतातील देखील काम जमणार नाही आणि तो दुसरे काम करायला देखील जाणार नाही त्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण होईल त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा असे मत विद्यार्थी नेते तथा मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंट(मास) चे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी प्रसारमाध्यमांना बोलतेवेळी व्यक्त केले..

Saturday, April 11, 2020

ओम जाधव एक दिव्यशक्ती

SGGSIET Icon
दिव्यशक्ती असलेला: ओम जाधव
         --- डॉ रवींद्र जोशी

     'अरे बघं, तुझी बायको थकलेली दिसतेय! लवकर डोक्यावरचा चारा उतरवं. नऊ महिन्याच पोरगं पोटात असताना कशाला शेतात जावे म्हणते? म्हातारी ओरडली. लगेचच गंगाधरने भारा उतरवला. तशी कांताबाई गवताच्या भाऱ्यावर आडवी झाली. आजीच्या लगेच लक्षात आले आणि तिने शेजारीणला आवाज दिला, 'कुसमे कापड घेऊन ये. कांताच्या पोटात कळा सुरू झाल्यात.' सर्वांनी लुगडं आडवे धरले आणि त्याच गवताच्या पेडींवर अंगणात १९९१ साली ओम गंगाधर जाधवचा जन्म झाला. दहा महिन्यानंतर हे गोंडस बाळ भिंतीचा आधार घेऊन पाऊलं टाकत होतं. त्याच दरम्यान गावात तापीची साथ आली आणि तापीने ओमचे अंग फणफणायला लागले. गावात मेडिकलचा कॅम्प होता तेव्हा तापीत त्याला सिस्टरने इंजेक्शन दिले. पण हळूहळू काही दिवसानंतर त्याचे पावले टाकणे कमी झाले. उठून उभे राहणे बंद झाले, दोन वर्षानंतर तो हाताने सरपटायला लागला. तेव्हा आईवडिलांच्या लक्षात आले की ओम दोन्ही पायांनी अपंग झालायं. रोजंदारीवर पोट भरणाऱ्या शेतमजुराला जेवढं शक्य आहे, तेवढे त्यांनी उपचार केले. शेवटी दारिद्र्या पुढे हात टेकले आणि ओम दोन्ही पायाने कायमचा अपंग झाला.
      गोदावरी नदीच्या काठावर वसलेले पिंपळगाव हे नांदेड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. गंगाधरला दोन एकर शेती आणि मजुरी यावर आठ जणांचा परिवाराचा गाडा चालायचा. ओमला गावातील शाळेत घातले. बालवाडी ते दुसरीपर्यंत कसेतरी दिवस लोटले. दररोज शाळेत घेऊन जाणे-आणणे हे मजूर कुटुंबाला झेपणारे नव्हते. तेव्हा वडिलांना कुठून तरी माहिती मिळाली की विमानतळाजवळ अपंग विद्यालय आहे. तिथे ओमचे दोन वर्ष शिक्षण झाले आणि ती शाळा बंद पडली. परत दोन वर्षे घरी बसला. गावातले काही लोकं गंगाधरला म्हणायचे, 'पोराचं मागच्या जन्माच काहीतरी पाप असेल, तेव्हा खूळं झालंय. घरात खायला अन्न नाही, कशाला शिकवायची धडपड करतो. राहुदे घराच्या कोपऱ्यात पडून, जगेल कसेतरी.' गंगाधरला माहित होते की मी दहावीच्या पुढे परिस्थितीमुळे शिकलो नाही. मोठा मुलगा, दोन मुली दहावीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. हा शिकला पाहिजे. तेव्हा या शाळेत, त्या शाळेत रोज नेण-आणणं, अशी त्याची धडपड असायची. ओमचे पाय म्हणजे त्याचे वडील होते. परत दोन वर्ष घरी बसला. खबर लागली की सिडकोजवळ नवीन शाळा उघडली आणि तिथे पुढचे शिक्षण सुरू झाले. काही वेळेस दुर्दैव पाठ सोडत नाही. आठवीत असताना संस्थाचालकांचा अपघात झाला आणि ते कोमात गेले, शाळा बंद पडली. तेव्हा लहान दिव्यांग मुलांनी चार महीने गावाकडून धान्य आणून स्वतः स्वयंपाक करून आठवीचे शिक्षण पूर्ण केले.
      शेवटी ओमला गावाजवळील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल वाघीत प्रवेश मिळाला. समाज कल्याणकडून हाताने चालणारी तीन चाकी सायकल ओमला भेटली. तो शरीराने तंदुरुस्त असणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत शिकायला लागला. रोज चार किलोमीटर हाताने सायकल चालवीत मित्रांच्या मदतीने शाळा व्यवस्थित चालू होती. शिक्षकांची मदत व मार्गदर्शन भेटायला लागले. तशी त्याला अभ्यासात गोडी निर्माण झाली. विज्ञानच्या विलास जोशी सरांचा तो खास विद्यार्थी आणि त्याच्यासाठी संगणक व प्रयोग शाळा नेहमीच उघडी होती. अशाप्रकारे दहावीत ९३%  गुण घेऊन ओम केंद्रात पहिला आला. तोच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता.
      पुढे काय शिकावे? कसे शिकावे? कुठे राहावे? असे अनेक प्रश्‍न ओमला पडायचे. तो विचार करायचा, 'इच्छा तिथे मार्ग, देव तारी त्याला कोण मारी.' शाळेतील सरांचे मार्गदर्शन घेऊन यशवंत महाविद्यालय नांदेड येथे अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. त्याच वर्षी कॉलेजमध्ये ५० जणांची जिनिस बॅच सुरू झाली आणि त्या प्रवेश परीक्षेत टॉप १५ मध्ये ओम आला. नांदेडमध्ये राहण्याचा मोठा प्रश्न होता. तेव्हा पिंपळगाव येथील दूधवाले शंकर मामासोबत काही दिवस येजा केले. त्यानंतर मोंढ्यातील मराठा सेवा केंद्र हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला. दरमहा रु. ३००/- मध्ये राहण्याची व खाण्याची सोय झाली. तो हुशार असल्यामुळे मित्रांची ओळख झाली आणि त्यांनी कॉलेजजवळ रूम केली. तेव्हा घरून धान्य आणून हाताने स्वयंपाक, कॉलेजला तीन चाकीने प्रवास अशी ओमची अग्निपरीक्षा चालू होती. बारावीचा निकाल लागला आणि दिव्यांग वर्गातून ९० टक्के गुण घेऊन तो राज्यात पहिला आला. वर्तमानपत्रात, स्टार माझावर ओम जाधव झळकला. 'अपंगत्व, दारिद्र्य, ग्रामीण भाग यशात अडसर नसतात. आपणचं आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो.' असे ओमने मुलाखतीत सांगितले.
       बारावीत पहिला क्रमांक आला, वाहवा झाली, पण पुढे काय? दारिद्र्याचा भस्मासूर आ करून उभा होता. इंजीनियरिंग, रु. ३७०००/- फीस, खर्च कोण करणार? पण ओमच्या दांडग्या इच्छाशक्ती पुढे गरिबीने गुडघे टेकले. सीओईपी पुणे येथे प्रवेश मिळाला असता, पण अनेक प्रश्न होते. तेव्हा गावाजवळील एसजीजीएस इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड येथे इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला. ३७०००/- रुपये फी होती. तेव्हा माजी मंत्री श्री डी. पी. सावंत यांनी आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले. अभियांत्रिकीत शिकत असताना मित्र, प्राध्यापक यांची मदत आणि मार्गदर्शन लाभले.
      ओम नेहमी पाहायचा, शरीराने धडधाकट असणारी मुलंमुली तक्रार करायचे. ७०-८०% धडधाकट मानसिकरीत्या कमजोर होती. आई-वडिलांनी हे दिले नाही, ते दिले नाही, त्यामुळे मला मार्क्स कमी पडले. आपल्या अपयशाचे खापर मायबापाच्या नावाने फोडुन मोकळे व्हायचे. तो म्हणायचा, 'अरे भावांनो नुसता विचार करा, तुम्हाला जर एक डोळा, हात, पाय नसता तर काय झाले असते? देवाने तुमच्यावर सर्वस्व लुटलं आहे. शरीराने तंदुरुस्त आहात. आई-वडिलांनी या सुंदर जगात जन्म दिला, हेच आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. तेव्हा भावांनो बहिणींनो स्वतःला ओळखा, सकारात्मकतेने आयुष्याकडे पहा, झपाटून कार्य करा, यश नक्कीच तुमच्या पाठीशी उभे आहे.' या विचारांमुळे तो अनेक विद्यार्थ्यांचा आयकॉन होता. अनेक वेळेस कोणाची मदत न घेता तो तीन मजले हाताने फरपटत चढायचा. या बिल्डिंगकडून त्या बिल्डिंगमध्ये जायचा. आम्ही अनेक वेळेस त्याच्याकडे आश्चर्याने पाहायचो आणि कौतुकही करायचो. अशी दिव्यशक्ती असलेल्या ओमला गेट परीक्षेत उत्तम क्रमांक येऊन आयआयटी दिल्लीत इलेक्ट्रॉनिक्समध्ये एमटेकला प्रवेश मिळाला. या यशात शिवानंद पाटील हा दहावी ते आयआयटीपर्यंत प्रवासात मोठा वाटेकरी आहे. अनेक ठिकाणी तो त्याच्यासोबत जातो.
       आयआयटीला स्कॉलरशिप असल्यामुळे आर्थिक अडचण भासली नाही, तिथे ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक व्हील चेअर मिळाली आणि तो आता स्वावलंबी झाला होता. तिथे गेल्यामुळे त्याचा दृष्टिकोन प्रगल्भ झाला होता. उच्च शिखराकडे झेप घेण्याच्या तयारीला तो लागला. अभ्यासासोबत यूपीएससीची तयारी सुरू केली. आयआयटीतील डॉ. एस. डी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नेव्ही संबंधित एमटेकचा प्रोजेक्ट पूर्ण केला. सरांचा खूप आधार, मार्गदर्शन, प्रेरणा मिळाली. एमटेकच्या अंतिम सत्रात सीडॅकची लेखी व तोंडी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारत सरकारच्या 'मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' यामध्ये टेक्निकल ऑफिसर (ग्रेड A) म्हणून नियुक्ती झाली. हा विभाग संशोधन करणाऱ्या संस्थांना सुपर कम्प्युटरच्या संबंधित सोयी उपलब्ध करून देतो. ओम जाधव २०१७ पासून पुणे येथील हेडक्वार्टरमध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.
       एमटेक जेव्हा पूर्ण झाले होते तेव्हा त्याचे आई-वडील दिक्षांत समारंभासाठी विमानाने दिल्लीला आले. ओमचं स्वप्न होतं की आई-वडील राब राब राबले, काबाडकष्ट केले, गरीबीत जगले तेव्हा त्यांच्यासाठी एक सुंदर घर असावं आणि त्याने प्रथम स्वतःसाठी फ्लॅट न घेता पिंपळगाव येथे आईवडिलांसाठी सर्व सुखसोयी संपन्न अशे प्रशस्त घर बांधून दिले. ओमला वयाच्या दुसऱ्या वर्षी अपंगत्वाचा आशीर्वाद मिळाला. पण अपंगत्व त्याच्या यशात कधीही अडथळा बनले नाही. दांडग्या इच्छाशक्तीमुळे अपंगत्वावर मात करून त्याने यशोशिखर गाठले. आयुष्य खरोखरच सुंदर आहे, ओम सारखी सुपरपावर प्रत्येकामध्ये असते. फक्त आव्हान स्वीकारून त्यास सामोरे जायला हवे, तेव्हाच आपण माईलस्टोन गाठू शकतो.