Friday, December 3, 2021

#खुदरंग डायरी....

किस किस से पूछियेगा मेहफिल,मुकाम,रास्ते और गम उदास है..
खुद्द मे जप्त है वो सभी मौसम उदास है..
किस किस से पूछियेगा ये बेहल सवाल.. 
अब सभी उदास है या फकत हम उदास है..
               -कुमार विश्वास..

Sunday, September 19, 2021

आंबूलगा ते माकणी फाटा रस्त्या संदर्भात श्रीकांत जाधव कबनुरकर यांचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांना साकडे.

आंबूलगा ते माकणी फाटा रस्त्या संदर्भात श्रीकांत जाधव कबनुरकर यांचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांना साकडे.
वार्ताहर:-मुखेड तालुक्यातील देगलूर ला जोडणारा आंबूलगा ते माकणी फाटा रस्त्याची वर्क ऑर्डर निघून अनेक महिने झालेले असून देखील संबंधित गुत्तेदार श्री.सगर यांनी काम अद्याप सुरुवात देखील केली नाही रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले आहे एवढंच नसून देगलूर-बाऱ्हाळी ही अनेक वर्षांपासून चालू असलेली एस.टी महामंडळ ची बस देखील रस्त्याची व रस्त्यावरील पुलांची दयनीय अवस्था झाल्यामुळे बंद करण्यात आली आहे त्यामुळे या भागातील प्रवाशांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत या भागातील लोकांचे देगलूर हे उपविभागाचे व बाजारपेठेचे ठिकाण असल्यामुळे त्यांना ये-जा करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे त्यामुळे ना.संजय बनसोडे साहेबांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना रस्त्याचे काम चालू करून पूर्ण करण्याच्या सूचना द्यावे जेणेकरून येथील नागरिकांना हालअपेष्टा कमी होतील व दळवळणाची व्यवस्था पूर्ववत होईल असे निवेदन देऊन श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी चर्चा केली यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.संजयभाऊ बनसोडे साहेबांनी देखील तात्काळ संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना देण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या स्वीय सहाय्यकास आदेश दिले..
               यावेळी प्रवीण पाटील वाकडे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday, August 21, 2021

शिरपूर येथे नाल्यात आढळून आला 18 वर्षीय युवकाचा मृतदेह.

शिरपूर येथे नाल्यात आढळून आला 18 वर्षीय युवकाचा मृतदेह.
मांडवी(सुनील श्रीमनवार)-अक्षय किसन प्रधान( वय१८) रा.कोठारी (सी)ता.किनवट हा तरुण पुरात वाहून गेला असून त्याचे प्रेत ता२०रोजी सकाळी शिरपूर नाल्यात आढळले आहे.मांडवी पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
    अक्षय हा काही दिवसांपासून त्याच्या आजोळी शिरपुर येथे राहत होता,ता१८रोज बुधवारी सायंकाळी शौचालयास नाल्यावर गेला होता.पाऊस जोरात सुरू असल्यामुळे नाल्याला मोठा पूर होता त्याला पाण्याचा अंदाज समजला नसल्याने त्याचा तोल गेला व तो पुरात वाहून गेला.अक्षय घरी न आल्यामुळे गावकऱ्यांनी त्याची शोधाशोध केली परन्तु तो मिळाला नाही.ता.२०रोज शुक्रवारी त्याचा मूर्त देह शेतकऱ्यांना दिसला.ग्रामीण रुग्णालय येथे डॉ.विक्रम राठोड यांनी त्याचे शवविच्छेदन केले.या बाबत मांडवी पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Wednesday, August 18, 2021

महावितरणचे कर्मचारी करताय जिवावर उदार होऊन काम.

महावितरणचे कर्मचारी करताय जिवावर उदार होऊन काम.
(राजेश पाटील किनवट शहर प्रतिनिधी ):सध्या सगळीकडे पाऊस, वारा, विजांचा कडकडाट चालु आहे पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत पण किनवट येथील महावितरणचे कर्मचारी या सर्व संकटांवर मात करुन काम करत आहे परंतु वरीष्ठ अधिकारी या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे किनवट- गोकुंदा रोडवर असलेली रोहित्र( डीपी) हि सतत पाण्याखाली असते या बद्दल वांरवार वरीष्ठांना कर्मचाऱ्यांनी तोंडी कळवले व विनंती केली पण वरीष्ठ अधिकारी या गंभीर परीस्थीतीकडे दुर्लक्ष करतात असे महावितरण मध्ये  गुडघाभर पाण्यात अवघड ,धोकादायक परीस्थीती मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे. 
काही तांत्रीक कारणांनी शॉट सर्कीट होऊन डिपीचा फेज जर गेला तर महावितरण कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

Tuesday, August 17, 2021

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची निवड.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची निवड.

सचिव पदी नसिर तगाले तर कार्याध्यक्ष पदी सय्यद नदीम यांची निवड.
किनवट :  सध्या अख्या महाराष्ट्रात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेने पत्रकारांच्या हितासाठी तसेच गोरगरीब जनतेसाठी व ईतर सामाजिक उपक्रम राबवुन सर्व महाराष्ट्र जनतेचे लक्ष वेधले आहे. अशा या संघटनेच्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची आज निवड करण्यात आली आहे. तर सचिव पदी नसीर तगाले तर कार्याध्यक्ष पदी सय्यद नदीम यांची निवड करण्यात आली आहे.
          आशिष शेळके हे दैनिक सकाळ चे किनवट शहर प्रतिनीधी आहेत. तसेच आशिष शेळके हे राजपथ अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्वराज कोचिंग क्लासेस, राजपथ अभ्यासिका व अनिमेष मायक्रो फायनान्स चे हे संचालक आहेत. अन्याय विरोधात प्रखर व सत्य लिखाण करने आणि आपल्या लेखनी व बातमी च्या माध्यमातून न्याय मिळवून देणे अशी यांची ओळख आहे. तसेच गोर गरीबांच्या व गरजुंच्या अडचणीत आशिष शेळके हमेशा धाऊन जातात तसेच अनेक सामाजिक उपक्रमात हे सतत अग्रेसर असतात. सामाजिक क्षेत्रातील यांचे कार्य व योगदान पाहून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगाव यांच्या नेतृत्वाखाली व नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आशिष शेळके यांची किनवट तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
          निवड झाल्यानंतर आशिष शेळके म्हणाले की, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगाव सर, नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव सरांनी माझ्यावर विश्वास ठेऊन माझी या पदी निवड केल्याबद्दल मी मनापासुन यांचे आभार मानतो व नक्कीच यांच्या विश्वास सार्थक करुन या संघटने मार्फत पत्रकार बांधवांच्या व समाजाच्या हिताचे कार्य व उपक्रम राबवेल अशी ग्वाही देतो. यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून शब्दसुमनाने स्वागत होत आहे.

किनवट शहरात वार्डा-वार्डात काँग्रेसची शाखा स्थापन करणार-शहराध्यक्ष वसंत राठोड.

किनवट शहरात वार्डा-वार्डात काँग्रेसची शाखा स्थापन करणार-शहराध्यक्ष वसंत राठोड.
वार्ताहर:-नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अमर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहरात वार्ड वार्ड काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करून काँग्रेसला बळकटी प्राप्त करण्यासाठी शाखा स्थापन करणार असल्याचा आत्मविश्वास येथील युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत राठोड सरदारनगरकर यांनी केला आहे.
                किनवट शहर हा पूर्वी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता पर्यंत मध्यंतरी चा कालावधी सोडला तर हा तालुका वाडी तांड्यात पाड्यात काँग्रेस पक्षाचा बोलबाला आहे. येणाऱ्या किनवट नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये युवकांना जास्त प्रमाणात संधी दिल्यास निश्चित चमत्कार घडेल असा आत्मविश्वास युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. राठोड पुढे म्हणाले की किनवट शहराच्या प्रभागा प्रभागांमध्ये काँग्रेसचे वातावरण अनुकूल असून खऱ्या अर्थाने नगरपरिषदेत युवकांना संधी दिल्यास निश्चित किनवट नगरपरिषदेत काँग्रेसचा झेंडा फडकवुन चमत्कार घडवू असे ते म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्त्यांना निश्चित संधी दिल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अमर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवा ईतिहास घडवणार असल्याचा आत्मविश्वास वसंत राठोड यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

*सेल्फ डिफेन्स शोटोकान कराटे डो असोसिएशन किनवटची बेल्ट एक्झाम संपन्न.*

*सेल्फ डिफेन्स शोटोकान कराटे डो असोसिएशन किनवटची बेल्ट एक्झाम संपन्न.*

(शहर प्रतिनिधी किनवट/ राजेश पाटील):-शोटोकान कराटे डो असोसिएशन तर्फे अनेक विद्यार्थी जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव लौकीक करत आहेत तसेच या कराटे स्पोर्ट माध्यमातुन अनेकांनी सैनिकी,पोलीस, फॉरेस्ट, BSF, दलात दाखल झाले व आपले जिवनातील स्वप्न पूर्ण केले .
शोटोकान कराटे असोसिएशन प्रशिक्षणा सोबतच शिस्त व आत्म संरक्षणाचे धडे देतो व विद्यार्थ्यामध्ये चिकाटी निर्माण करतो तसेच संयम बाळगायचे देखील शिकवतो .
नुकतेच  शोटोकान कराटे डो असोसिएशन प्रशिक्षण केंद्र तालुका क्रीडा संकुल किनवट व गोकुदा तर्फे  बेल्ट एक्झाम घेण्यात आली मुख्य प्रशिक्षक संदिप प्रल्हाद यशिमोड ब्लॅक बेल्ट 3 डॅन यांच्या मार्गदर्शनाखाली हि परीक्षा घेण्यात आली तर सह प्रशिक्षक सचिन राठोड,मारोती येशीमोड संकेत दरडे,रोहित भरणे,गोदावरी येशीमोड,रोमा गादेकर, आदींनी यांनी त्यांना सहकार्य केले व विविध प्रकारच्या बेल्ट साठी विद्याथ्यांची फिजीकल , सेल्फ डिफेन्स परीक्षा घेतली या मध्ये यल्लो बेल्ट, ऑरेन्ज बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्लु बेल्ट, ब्रॉऊन बेल्ट, आदिचा समावेश आहे.

यात प्रामुख्याने यल्लो बेल्ट साठी पात्र  उतीर्ण विद्यार्थी
आदर्श संतोष , बालाजी मदुरे ,
ओमकार दीपक पिल्लेवार ,
शिवेद्र प्रवीण पिल्लेवार ,शालेंद्र प्रवीण ईश्वरी जमदाडे सही भाट, अक्षरा शेखर पिल्लेवार,
अक्षरा शेखर चिंचोलकर,देवांश सिदेश्र्वर मेंडके ,सानवी सुदर्शन भट ,
 जयश्री गोवर्धन तक्कलवर(yello/orange)प्रनय बालाजी मडूरे,आदर्श संतोष बोईनवाड
ऑरेंज बेल्टसाठी पात्र विद्यार्थी
मोक्ष श्रीनिवास सट्टाजिवर
तुषार तुलसीदास जांबले
स्नेहा परमेश्वर मादसवार
 अक्षरा नामदेव अचकुलवर
अंश अभय महाजन.

ग्रिन बेल्ट साठी पात्र विद्यार्थी
नील अंबर ठमके,
राजनंदिनी अनिल शिर्भाते ,
,आर्यन नितीन मोहरे ,
रामानंद अनिल शिर्भाते,गुंजन ठाकूर
मोहम्मद अब्रार मोहम्मद अहमद,
शेख मोहम्मद फैसन
ब्लु बेल्टसाठी पात्र विद्यार्थी
निर्मिती प्रमोद भवरे खूशी लाखकर तनीका चिल्लावार ,शिवांश गजानन मेंडके.
ब्राऊन  3 बेल्टसाठी पात्र विद्यार्थी
आयुष यादव देवकाते,संचित लक्ष्मण वाडगुरे,सक्षम मिलिंद सोनकांबळे आदी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व विविध  कराटे प्रशिक्षण पात्र बेल्ट करीता परीक्षा घेण्यात आली.

Monday, August 16, 2021

*'ग्रामस्पर्श' लोकसहभागातून स्पर्धा परीक्षा केंद्राचे राज्यमंत्र्यांकडून कौतुक..!*

'ग्रामस्पर्श' लोकसहभागातून स्पर्धा परीक्षा केंद्राचे राज्यमंत्र्यांकडून कौतुक..!
वार्ताहर:- 'शिक्षणातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते' या उक्तीला अनुसरून सताळा बु. या गावातील युवकांच्या पुढाकाराने 'लोकसहभागातून' स्पर्धा परीक्षा केंद्राचे उदघाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकाला स्पर्धा परीक्षेचे योग्य ते मार्गदर्शन लाभावे व एकाच ठिकाणी सर्व पुस्तके उपलब्ध व्हावीत या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व व उद्देश्य कपिलेश जळकोटे यांनी प्रस्तावनेतून मांडले. यावेळी गावचे सरपंच मा. शिवलिंगआप्पा जळकोटे यांच्या हस्ते रिबीन कापून या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सेनानी पंढरीनाथ तिरुके, उपसरपंच अरुणाताई देशपांडे, ग्रामसेवक संतोष माचेवाड  व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.त्यानंतर राज्यमंत्री मा. नामदार संजयजी बनसोडे यांनी स्पर्धा परीक्षा केंद्राला सदिच्छा भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक करून मार्गदर्शन केले. यावेळी रामचंद्र तिरुके, बस्वराज पाटील नागराळकार , चंद्रकांत टेंगेटोल व पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी गजानन बालने, कपिलेश जळकोटे, व्यंकट तिरकोळे, अस्लम सय्यद ,गुंडेराव जळकोटे, स्वप्निल तिरुके, पंकज बनसोडे, श्याम जळकोटे  व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

*मा.ना.डॉ.भारतीताई पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पालघर येथुन आज सुरवात.*

*मा.ना.डॉ.भारतीताई पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पालघर येथुन आज सुरवात.*
वार्ताहर:-केन्द्रिय आरोग्य राज्यमंत्री ना.डॉ. भारतीताई पवार यांची जन-आशीर्वाद यात्रेची सुरवात आज सकाळी 9.00 पासुन पालघर येथुन सुरु झाली.हि यात्रा 5 दिवस 5 जिल्ह्यातुन जाणार आहे जनआशीर्वाद यात्रेला भारतरत्न, मा.प्रधानमंत्री आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतीमेला मालार्पण, विनम्र अभिवादन करुन सुरवात करण्यात आली. जन आशिर्वाद यात्रेत मा.ना.प्रविनजी दरेकर,विरोधिपक्ष नेते,विधानपरीषद महाराष्ट्र. मा.डॉ. अशोकजी उईके, यात्रा संयोजक तथा प्रदेश अध्यक्ष, भाजपा STM,महाराष्ट्र. आम.मनीषाताई चौधरी, मा.किशोरजी काळकर,प्रदेश संपर्क प्रमुख, भाजपाSTM,महाराष्ट्र. मा.नंदुजी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष, पालघर, प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM,महाराष्ट्र. मा.एन.डी.गावीत, प्रदेश सरचिटणीस,भाजपा STM,महाराष्ट्र.मा.संतोष जी जनाटे संघटनमहामंत्री, भाजपा पालघर.भाजपा,भाजपा आघाडी पदाधिकारी,लोकप्रतीनीधि,कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday, August 14, 2021

किनवट वनविभागाच्या पथकाने ऑटोरिक्षासह मोटरसायकल आणि अवैध सागवानी कटसाईज केले जप्त.

किनवट वनविभागाच्या पथकाने ऑटोरिक्षासह मोटरसायकल आणि अवैध सागवानी कटसाईज केले जप्त.

किनवट ( प्रतिनिधी ):-किनवट वन विभागाच्या पथकाने गुप्त माहिती मिळाल्या वरून  चिखली ते इंजेगाव दरम्यान गस्त करीत असताना एका संशयास्पद  ऑटो चा पाटलाग केला . ऑटो चालकांनी इंजेगाव नाका येथे ऑटो सोडून पळ काढला यावेळी घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने सागवान कट साईज सहीत पिवळा रंगाचा ॲपे ऑटो व  एक मोटर सायकल जप्त केला .
याबाबत सविस्तर वृत्त असे की किनवट  वन विभागाला सागवान तस्कर ऑटो तून सागवानाची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती दि .12 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मिळाली . यावरून वन विभागाच्या पथकाने चिखली ते इंजेगाव दरम्यान आपली गस्त सुरू केली . संशयास्पद ऑटो साठी गस्त चालू असतानाच वन विभागाला रस्त्यात एक मोटर सायकल वर अवैद्य सागवानाचे नग घेऊन येत असलेले दोन इसम दिसले . मोटरसायकल स्वारांना वनविभागाने थांबण्याचा इशारा करताच मोटरसायकल वरील अज्ञात इसमांनी जागेवरच मोटरसायकल आणि कट साईज  सागवान नग फेकून पळ काढला .सदरील मोटरसायकलवर सागवानाचे नग वनविभागाच्या पथकाने ताबडतोब जप्त करून अज्ञाताचा विरुद्ध गुन्हा नोंद केला .त्यानंतर वन विभागाच्या पथकाने आपली गस्त सुरू ठेवली तर त्यांना चिखली कडून एक  पिवळ्या रंगाचा ॲटो येताना दिसला .  चालकाने वनविभागाच्या  पथकाला बघून ऑटो पळविण्याचा प्रयत्न केला . वन कर्मचाऱ्यांनी त्या ऑटो चा पाटलाग सुरूच ठेवला . शेवटी वन विभागाचे पथक जवळ येथे असल्याचे बघून इंजेगाव  नाका येथे ऑटो चालकाने ऑटो सोडून पळ काढला यावेळेस वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळा वरून एक अपे ऑटो T S 17 - T 2125 या क्रमांकाचा जप्त केला . सागवानाचे कटसाईज नग 61 व घ.मी. 0.  1690 ज्याची किंमत10526  रुपये व ऑटो ची किंमत 75 हजार रुपये जप्त केला आहे व विना नंबर प्लेट ची  मोटरसायकलवर 28 नग 0.0982 घनमीटर ज्याची किंमत 6117 रुपये व मोटरसायकल चे अंदाजे किंमत सात हजार रुपये अशी दोन्ही घटनेतील 98 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे . दोन्ही घटनेतील आरोपी फरार आहेत . विभागाच्या या पथकात उपवनसंरक्षक सातेलिकर  , सहा . उपवनसंरक्षक एम आर  शेख यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटचे नवनियुक्त वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद राठोड ,  चिखलीचे वनपाल रवी दांडेगावकर , के .जी . गायकवाड , एस आर .सांगळे , माझलकर, यादव,  वनरक्षक फोले, झंपलवाड , चिबडे वाहन चालक आवळे इत्यादी वनकर्मचारी होते .

Friday, August 13, 2021

शेतकऱ्यांच्या पिककर्जाचा तात्काळ निपटारा न केल्यास आंदोलन .सोमवारी घेणार एसबीआईच्या महाव्यवस्थापाची भेट -प्रमिल नाईक.

शेतकऱ्यांच्या पिककर्जाचा तात्काळ निपटारा न केल्यास आंदोलन .
सोमवारी घेणार  एसबीआईच्या महाव्यवस्थापाची भेट -प्रमिल नाईक.
किनवट(सुनील श्रीमनवार):-किंनवट तालुक्यातील एसबीआई बैंकेच्या शाखेत शेतकऱ्यांची शेकड़ो पिककर्ज प्रकरण मंजूर झाली आहेत पण ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यन्त अजूनही शेतकऱ्यांना बैंकेचा उम्बरठा झिजवावा लागत आहे .,पावसाने दड़ी मारलयाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे .या बैंकेला कनेक्टिविटी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पिककर्जे अड़कुन पडली आहेत .वास्तविक पहाता पीककर्ज जून ,जुले पर्यन्त शेतकऱ्यांना मिळायला हवित परन्तु ऑगस्ट महिन्यात सुद्धा पिककर्ज मिळू शकत नाही हे मोठ दुर्भाग्यपूर्ण आहे .या बैंकेला bsnl या दूरसंचार कंपनिची इंटरनेट सुविधेची जोड़नी करण्यात आली आहे .bsnl ची सेवा या भागात निष्पळ ठरली असल्याने शेतकऱ्यांना बेंकेच्या दररोज चकरा मारत लागव्या कारणाने नाहक आर्थिक भुरदण्ड सहन करावा लागत आहे .,या बेंकेच्या इंटरनेटची जोड़नी एयरटेल किवा जिओ या खाजगी दूरसंचार कंपनिशी तात्काळ जोड़नी केल्यास शेतकऱ्यांची दुविधा दूर होऊ शकते .बैंकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी या संदर्भात   भेट घेण्यात येईल तरी समस्या न सूटल्यास बैंके विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी माहिती या भागातील कांग्रेस पक्ष्याचें युवा नेते युवक कांग्रेसचे माजी महासचिव प्रमिल नाईक जाधव यांनी दिली आहे .

मांडवी पोलिसांनी वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या.

मांडवी पोलिसांनी वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या.
किनवट ( प्रतिनिधी ):-नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात वाहन चोरून हैदोस घालणाऱ्या  सराईत मोटरसायकल चोरांना मांडवी पोलिसांनी अटक करून, 1 लाख 80 हजार ऐवजाच्या सहा मोटारसायकली जप्त केला आहे.
     कनकी येथील विलास विठ्ठल वाडगुरे यांची मोटारसायकल चोरी गेली होती. याची फिर्याद दि.8 ऑगस्ट रोजी  दिल्याने,सपोनि मल्हार शिवरकर यांनी तपासाचे चक्र गतीने फिरवून आरोपी संदीप पंडित जाधव रा.हिवळणी ता.माहुर आणि अक्षय रमेश पवार रा.उमारा ता. माहुर यांना अटक करून पोलीसांचा खाक्या दाखवताच दोन्ही आरोपी पोपटासारखे बोलुन विलास वाडगुरे यांची  मोटारसायकल व अन्य पाच मोटारसायकल चोरल्या ची कबुली दिली.
या सहा मोटारसायकली मांडवी पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि मल्हार शिवरकर हे करीत असुन त्यांना पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे, पोलिस उपनिरीक्षक पठाण, पोहेका जाबुवंत कदम, पोहेका भारत राठोड, पोका. श्याम चव्हाण, नितेश लेंडगुरे, नामदेव कदम हे सहकार्य करत आहे. 

Thursday, August 12, 2021

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी ज्योतिबा खराटे यांची नियुक्ती करा-माजी सभापती चिंतामण राठोड.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी ज्योतिबा खराटे यांची नियुक्ती करा-माजी सभापती चिंतामण राठोड.
किनवट (ता.प्र) गेल्या तीस वर्षापासून एक निष्ठेने शिवसेनेत काम करून गाव तिथे शिवसेना माणूस तिथे धनुष्यबाण व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य माणसात पोचविणारे ज्योतिबा खराटे यांची नांदेड जिल्हाप्रमुख पदी निवड करा अशी विनंती शिवसेनाप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे माजी सभापती चिंतामण राठोड यांनी केली आहे.
              किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची शाखा स्थापन करून जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद सेवा सहकारी सोसायटी ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवून पक्षाला नवी बळकटी देण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे शिवसैनिक ज्योतिबा दादा खराटे हे शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख व जिल्हा उपप्रमुख या पदापर्यंत गेले असून त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांची नांदेड जिल्हा प्रमुख पदी निवड करावी अशा आशयाची विनंती वजा निवेदन माहूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसैनिक चिंतामण राठोड यांनी शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
            गेल्या तीस वर्षापासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून वाडी तांड्यात शिवसेनेचे विचार पोचून किनवट माहूर मतदार संघात शिवसेना मय वातावरण करण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे लढवय्या शिवसेनिक म्हणून ज्योतिबा खराटे यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना जिल्हा प्रमुख पदी निवड करावी असे आशयाचे विनंती निवेदन माजी सभापती चिंतामण राठोड यांनी शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Wednesday, August 11, 2021

ते सोयाबीन बियाणे बोगसच, कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीचा निष्कर्ष !मदनापूर बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात कृषी साहित्य विक्रेत्याची बेईमानी उघड !

ते सोयाबीन बियाणे बोगसच, कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीचा निष्कर्ष !
मदनापूर बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात कृषी साहित्य विक्रेत्याची बेईमानी उघड ! 
माहूर (प्रा.प्रवीण बिरादार):- खरीप २०२१ साठी सारखणी ता. किनवट येथील निलेश कृषी सेवा केंद्रातून  मदनापूर ता. माहूर  येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण टनमने  यांनी खरेदी केलेले पाटीदार सीड्स चे  सोयाबीन बियाणे जेएस ९३०५ लॉट नं. ०६७९८ बियाणे ३० किलो प्रती पिशवी एकूण २६ पिशव्या  निकृष्ट व बनावट अढळल्याची घटना दि. २ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने फसवणूक ग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर नारायण टनमने यांनी अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांना लेखी निवेदन देऊन सदर शेतकरी फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित दुकानदार व बियाणे उत्पादक कंपनी विरुद्ध कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. सात दिवसात चौकशी न झाल्याने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी  नुकसान ग्रस्त शेतात किंवा माहूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिल्याने कृषी विभागाला खडबडून जाग आल्यानंतर. दि.१० रोजी किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम.तपासकर यांच्या नेतृत्वातील तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, प.स.चे कृषी अधिकारी अनिल जोंधळे,राम पाटील कृषी विशेषज्ञ बियाने संशोधन केंद्र नांदेड, मंडळ कृषी अधिकारी विनोद कदम, कृषी सहाय्यक योगिता दळवी   यांचा समावेश   तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने  मदनापूर येथील फसवणूकग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर टनमने यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष जायमोक्यावर पाहणी केली असता सदर बियाणेच जेएस ९३०५  नसल्याचे बियाणे संशोधन समितीला आढळून आल्याने शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.   
       त्यानंतर संशोधन समितीने शिवारातील इतर काही शेतात पाहणी केली असता याच लॉट नंबरचे इतर कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेले जेएस ९३०५ बियाणेही बोगस असल्याचे आढळून आले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर लॉट नंबरच्या एकूण ३०० बॅग  निलेश कृषी सेवा केंद्र सारखणी येथून काही कृषी सेवा केंद्र व शेतकऱ्यांना विक्री झाले असल्याची प्रथमदर्शनी माहिती असून या बियाण्यास प्रचंड मागणी असल्याने सदर बियाणे ऑनने विक्री झाल्याने ३०० बॅग मूळ बियाण्यासह बोगसबाजी करून सदर कृषी दुकानदाराने किती बॅग मध्ये काळाबाजार केला हे तपासण्याचे तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
         @@@@सदर प्रकरणी पारदर्शक पणे सखोल चौकशी केल्यास फार मोठे घबाड हाती लागून कृषी साहित्यात भेसळ करून विक्री करत आधीच विविध अस्मानी व सुलतानी संकटाना तोंड देत अजिंक्य योद्ध्यासारखे लढणाऱ्या बळीराजाचे पंख छाटण्याचे कारस्थान  काही माफियांनी या क्षेत्रात सुरु केले असल्याची चर्चा असून माहूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून तालुका कृषी अधिकारी प्रभारीच असल्याने केवळ दिन जाव आन तनखा आव हेच धोरण ठेऊन  माहूर तालुका कृषी विभागाचा कारभार पाहणारे अधिकारी असल्याने या माफियांचे चांगलेच फावले आहे. सदर प्रकरणात संबधित कृषी साहित्य विक्रेत्याचे सर्व लायसन त्वरित रद्द करून त्यांचे नाव काळ्या यादीत टाकून अशा प्रवृतींना आळा घालुन पुढील काळात शेतकऱ्याच्या संभाव्य फसवणूकिला लगाम घालावा अशी मागणी होत आहे.@@@@ 

प्रतिक्रिया:-
 @@@सदर बियाणे हे बिलाप्रमाणे जेएस ९३०५ चे नसल्याचे आढळून आल्याने याच लॉट नंबरचे इतरही काही शेतात आम्ही पाहणी केली असता सदर ठिकाणचेही पिक हे सदर व्हेरायटीचे नसल्याचे आढळून आले असून सदर कृषी सेवा केंद्रातून विक्री झालेल्या सर्व जेएस ९३०५ बियाणाची तपासणी करून बोगसबाजी करणाराविरुद्ध कारवाई करून फसवणूक ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊ  – डी.एम.तपासकर उपविभागीय कृषी अधिकारी@@@   

प्रतिक्रिया:-
       @@@  प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शेतात जायमोक्यावर बिलानुसार सोयाबीनची पाहणी केली असता सदर उगवण झालेली सोयाबीनची झाडे ही जेएस ९३०५ शी कसलेही साम्य दिसून येत नाही. –   राम पाटील, कृषी विशेषज्ञ बियाने संशोधन केंद्र नांदेड

Sunday, August 8, 2021

उदयगिरीत तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन..

उदयगिरीत तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन..
 उदगीर : ( दिनांक 8 ऑगस्ट 2021) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हीरक महोत्सवी वर्ष 2021 - 2022 निमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय व महाविद्यालय अशा दोन गटात घेतली जाणार असून दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक - 2501 रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक - 1501 रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक - 1001रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे दोन्ही गटासाठी दिली जाणार आहेत. शालेय स्तरासाठी 'वृक्ष संवर्धन काळाची गरज' तर महाविद्यालय स्तरासाठी 'वृक्ष आणि मानवी जीवन' या विषयावर मराठी भाषेत ( कमाल शब्दमर्यादा 1000 शब्द ) दिनांक 13 ऑगस्ट 2021 पर्यंत 9890422800 या व्हाट्सअप नंबर वर किंवा librarianmumu@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत. सदरील निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे व मराठी अभिनेते तथा सह्याद्री देवराई प्रकल्पाचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के( व. म. ), उपप्राचार्य आर. एन.  जाधव ( क. म. ) यांनी केले आहे.

Thursday, July 29, 2021

सुजाता देवरे यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित केले....

सुजाता देवरे यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित केले...
वार्ताहर:-राजमाता बहुउदेशीय सेवाभावी संस्था लातूर कडून दिला जाणारा राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार दिनांक 25जुलै 2021 रोजी आँनलाईन पध्दतीने सामाजिक कार्यकर्ता सुजाताताई देवरे यांना प्रधान करण्यात आला हा पुरस्कार सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, आणि वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांना दिला जातो उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ता सुजाता देवरे यांनी करोना काळातील गोरगरीब दिव्यांग,निराधार गंरजु लोकांना राशन कीट गंरजुना कपडे व सामाजिक कार्यात सतत आग्रेसर असतात समाज उपयोगी काम केल्याची दखल घेत राजमाता बहुउदेशीय सेवाभावी संस्था लातूर संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव यांनी हा पुरस्कार दिल्याचे म्हटले आहे महाराष्ट्रातील एकुण 36 महिलांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यशोचित गौरव आणि कौतुक यावेळी करण्यात आले सुजाता देवरे सह सर्व पुरस्कार प्राप्त महिलेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..

Monday, July 5, 2021

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा...

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा... 

वार्ताहर:-प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चभाऊ कडू यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त रोटी कपडा बँक  ( शहरी बेघर निवारा केंद्र उदगीर ) येथे निराधार महिलांना प्रहार महिला आघाडी च्या वतीने साडी चोळी व भोजन  वाटप करण्यात आले .प्रहार चे उपाध्यक्ष संदीप पवार यांच्या कै.विरभान  मामा प्राथमिक आश्रमशाळा मल्लापूर येथे 101वृक्ष रोपण लागवडी करून साजरा करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचारी मुख्याध्यापक शिवाजी राठोड , भीमा शंकर कनमुचके ,कल्याणी पाटील ,वसंत राठोड ,राजेंद्र राठोड ,भिमानंद सोनकांबळे, सेवक प्रकाश राठोड ,रोहन आडे. 
आणि वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश व पदाधिकाऱ्यांचे निवडी करण्यात आले. यावेळी उपस्थित सूर्यभान चिखले मामा यांची जळकोट- उदगीर विधानसभा उदगीर च्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड तर महादेव आपटे यांची उदगीर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड केले. तर अविनाश शिंदे यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आले . आणि प्रशांत आडे यांची शहर- चिटणीस पदी निवड झाली. सुनील कांबळे , हाश्मी सय्यद उमेर , शेख जुयेब अहमद , दुराणी नासेर खान , यांचा जाहीर पक्ष प्रवेश झाला. 
कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष - विनोदभाऊ तेलंगे , तालुकाध्यक्ष- रविकिरण बेळकुंदे , तालुका उपाध्यक्ष - संदीप पवार , तालुका उपाध्यक्ष - महादेव मोतीपवळे ,ता. सहसंपर्क प्रमुख - सुनील केंद्रे , शहर संपर्क प्रमुख - चंद्रकांत भोसगे , सह संपर्क प्रमुख -सुनील केंद्रे ,शहर सहसचिव -बालाजी बिरादार , ता. चिटणीस - गोपाळ नवरखेले, सह सचिव - संगम वडले , ता.चिटणीस- रवी आदेप्पा , ता.कोषाध्यक्ष -लखन कांबळे, ता.सरचिटणीस - सुदर्शन सूर्यवंशी ,प्रहार महिला आघाडी तालुका अध्यक्ष कांचन भोसगे , उपाध्यक्ष -विजयमाला पवार , उपाध्यक्ष - सुजाता दावरे, कार्याध्यक्ष - शकुंतला रोडेवाड ,लता कोळी ,जयश्री चव्हाण, शिलावती बिरादार, विजयालक्ष्मी बिरादार ,विजयमाला हारगे, उषा हारगे ,कुमोदींनी पांचाळ , रचना हल्लाळे, इत्यादी प्रहार पदाधिकारी उपस्थित होते ...

Friday, July 2, 2021

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर जि.उपाध्यक्ष व उदगीर जळकोट विधानसभा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मित्र परिवारच्या वतीने सत्कार.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर जि.उपाध्यक्ष व उदगीर जळकोट विधानसभा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मित्र परिवारच्या वतीने सत्कार.
वार्ताहर:-अहमदपूर तालुक्यातील युवा नेतृत्व संग्राम पवार यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्हा उपाध्यक्ष व उदगीर जळकोट विधानसभा निरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल (शिवसेना) ता.प्रमुख विलास पवार,(सरपंच)गोविद पवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बालाजी पवार,सुधाकर पवार, उत्तम पवार,शिवमूर्ती पवार,बाळासाहेब पवार,राम पवार, लखन पवार,संभाजी पवार, अमोल कांबळे,संभाजी कांबळ,सोमनाथ जोहारे, संदीप तेलंगे,रोहित पवार,अजय पवार,अक्षय पवार,सुरज पवार,ओमकार पवार, महेश पवार, शाम पवार,पवार,बबन पवार,सदानंद पवारआदी उपस्थित होते..

Tuesday, May 18, 2021

*निडेबन येथील कबीर नगर वार्ड-क्र 3 मधील नागरिकांची पाणी टंचाई दूर करण्यात यावे. प्रहार चे तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे यांची मागणी*

*निडेबन येथील कबीर नगर वार्ड-क्र 3 मधील  नागरिकांची पाणी टंचाई दूर करण्यात यावे. प्रहार चे तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे यांची मागणी*
वार्ताहर:-निडेबन येथील वार्ड क्र- 3 मधील कबीर नगर या गल्लीमध्ये एक ही बोर नसल्यामुळे पाण्याचा त्रास होत आहे. कोरोना मुळे राज्यात लोकडाऊन सुरू आहे.या परिस्थितीत आधीच हवालदिल झालेले गोरगरिबांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावात नियोजनाअभावी टंचाई निर्माण होणे हा दरवर्षीचाच नित्याचा विषय बनला आहे . मे महिन्यात उदभवणारी पाणी टंचाई ची समस्या ही विशेषतः महिलांकरिता अडचणींचा विषय आहे . अशा प्रसंगी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . सध्या तलावात मुबलक पाणीसाठा असूनही सोडले जात नाही अनेक वेळा ग्रामसेवक साहेब यांना सांगुन देखील सदर पाणी टंचाई दुर झालेली नाही. म्हणून आज   गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती उदगीर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष - विनोद तेलंगे , तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे , तालुका उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे , तालुका  कार्याध्यक्ष महादेव आपटे  निडेबन येथील रहिवाशी महिलांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले ..

Monday, May 17, 2021

कबनुर येथे विविध विकासकामांच्या नियोजनासाठी ग्रामसभा संपन्न.

कबनुर येथे विविध विकासकामांच्या नियोजनासाठी ग्रामसभा संपन्न.
वार्ताहर:-आज मुखेड तालुक्यातील कबनुर येथे विविध विकासकामांच्या नियोजनासाठी सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत कबनुर गावच्या प्रथम नागरिक सरपंच कमलाबाई वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत गावच्या सर्वांगीण विकासासाठी काय काय करता येईल यावर सर्व गावकऱ्यांच्या समक्ष चर्चा करण्यात आली यावेळी गावात पाण्यासाठी नागरिकांची हेळसांड होऊ नये या हेतूने तात्काळ पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक घरात नळजोडणी करण्याचा व गावात दुर्गंधी पसरू नये यासाठी नालेसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
                  याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी एस.डी.गवई,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष देशमुख,माजी मुख्याध्यापक बालाजी वडजे,उपसरपंच प्रतिनिधी माधव टेम्बुरने,रामदास वाघमारे,पंढरी कांबळे,बालाजी देशमुख, संजय देशमुख, प्रेमदास राठोड,प्रयागबाई देशमुख,काशीराम राठोड आदी उपस्थित होते.

Sunday, May 16, 2021

*राजीवभाऊ च्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली-श्रीकांत जाधव कबनुरकर*

*राजीवभाऊ च्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली-श्रीकांत जाधव कबनुरकर*
वार्ताहर:-मराठवाड्याच्या या भूमीला नेतृत्वाची खान असच मनाव लागेल अगदी इतिहास काळापासून ते इंग्रजांशी आणि निजामांशी स्वतंत्र लढा असेल या भूमीने या देशाला अनमोल हिरे दिलेले आहेत. यात  शिवाजीराव देशमुख (तत्कालीन पार्लमेंट सेक्रेटरी पंतप्रधान इंदिरा गांधी), शंकरराव चव्हाण (केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री, मुख्यमंत्री) विलासराव देशमुख (पुर्व मुख्यमंत्री) गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असे महान नेतृत्व लाभले आहे त्यांनी या राज्यासाठी, ज्यांनी या देशासाठी अगणित कामे करून ठेवली आहेत. याच नेतृत्वाचा वारसा मा.राजीवजी सातव याच्या रूपाने आपल्याला लाभल होता पंचायत समिती सदस्य, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, गुजरात काँग्रेसचे प्रभारी, आपल्या उल्लेखनीय कार्यातून सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळविणारे सुप्रिया सुळे नंतरचे दुसरे खासदार.आम्ही आपल्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची अनेक स्वप्ने पहिलीत भाऊ, आपल्याला या राज्याच नव्हे तर देशाच नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर करायच होत. पण आपण आज आम्हाला पोरकं केलेत महाराष्ट्र राज्याची पर्यायाने देशाची ही हानी कधीही भरून निघणार नाही आपल्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे असे मत विद्यार्थी नेते तथा "मास" विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी व्यक्त केले..

Tuesday, May 11, 2021

*लातूर जिल्ह्यातील गाव तेथे क्वारनटाईन सेंटर उभारणे व उदगीर उपजिल्हारूग्णालय येथील आँक्सीजन व्हेटीलेंटर बेड तात्काळ उपलब्ध करा**प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे यांची मागणी..*

*लातूर जिल्ह्यातील गाव तेथे क्वारनटाईन सेंटर उभारणे व उदगीर उपजिल्हारूग्णालय येथील  आँक्सीजन व्हेटीलेंटर बेड तात्काळ उपलब्ध करा*
*प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे यांची मागणी..*
वार्ताहर:-कोरोना हया महामारीने संपूर्ण देशात थैमान घातला आहे व रोज लातूर जिल्ह्यातील  कोरोना चे पेंशट वाढत आहे व पेंशट ला वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना जिव गमवावा लागत आहे तरी मेंहरबान साहेबांनी जिल्हा परिषद शाळेचा ऊपयोग क्वारंटाईन सेंटर म्हणून केल्यास रूग्ण संख्या कमी करता येऊ शकते व रूग्ण गावातच राहील्याने
    घरचा डबा .घरचीच  खाट असल्याने कमी खर्चात ज्यास्त पेशंट बरे होतील, अशी उपाय योजना करने काळाची गरज आहे .   
कोवीड पेशंटला  प्रथम अवस्थेत उपचार करणे  गरजेचे आहे . लक्षणॆ दिसताच चाचणी  करून औषध उपचार केल्यास  पेशंट प्रथम अवस्थेत लवकर बरा होवू शकतो .
हे आता सर्वानाच समजल आहे . गावतील प्रतिष्ठीत लोकानी ,संरपंच उपसंरपंच तरुणांनी मनावर घेतल्यास हे सहज शक्य आहे.
तर आणखीन पेशंटची देखभाल गावातील, अंगणवाडी सेविका* मदतनीस, आशा वर्क्स, नर्स(NM)  मलेरिया (MPW) ग्रामसेवक ,तलाटी,ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल, ह्याना शासकीय आदेश दिले तर काम फार सोपे होईल
असे केल्याने ग्रामीण भागातील परीस्थिती लवकर सुधारणा होऊ, शकते.व शहरी भागातील रूग्णालयातील आरोग्य यंत्रना कमी पडत आहे.उदगीर उपजिल्हारूग्णालय येथील 300 आँक्सीजन बेड व 100 व्हेटीलेंटर बेड तात्काळ उपलब्ध करून सामान्य रुग्णांना होणारा त्रास कमी होईल तर आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे.असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे ता.अध्यक्ष रविकिरण बेंलकुदे उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे तालुका सचिव महादेव आपटे यांच्या वतीने मा उपजिल्हाधिकारीसाहेब उदगीर यांच्या मार्फत मा जिल्हा अधिकारी साहेब लातूर यांनी त्वरित संबंधीताना निर्देश देवुन उपाय योजना करावी असे निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे..

Thursday, April 22, 2021

*तळणी प्रा आरोग्य केंद्रात स्वतंत्र रुग्णवाहिका ऊपलब्ध करून द्यावी:-तुषार देशमुख*

*तळणी प्रा आरोग्य केंद्रात स्वतंत्र रुग्णवाहिका ऊपलब्ध करून द्यावी:-तुषार देशमुख*
नांदेड(प्रतिनिधी):-दिवसेंदिवस चिंताजनक कोरोना विषाणुजन्य परिस्थिती चितांजनक होतीय या अनुषंगाने तळणी ता हदगाव जि नांदेड येथे प्रार्थमिक आरोग्य केंद्र असून तळणी हे गाव* *प्रामुख्याने जि प गटातील महत्त्वाचे/व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असुन मुख्यत या गावशी परिसरातील ईतर गावखेड्याची दळवळनाच्या निमीत्ताने नागरीकांची मोठ्या प्रमाणात आवक /जावक असते या अनुषंगाने तळणी येथे पुर्वीचे जवळपास १९९० च्या दशकापूर्वीपासुन प्रा आरोग्य केंद्र कार्यान्वित आहे ते काळानुसार मोठ्या क्षमतेचे व अधीकच्या सोयीसुवीधायुक्त नुसार बदलने अपेक्षित होते,विशेष बाब मुळात तळणी ह्या गावची* *लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२००० हजारांहून अधिक आहे तळणी हा पं स गण /जि प गट आहे परिणामी लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र क्षमता कमी आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते आहे कधीकधी अत्यावश्यकवेळी पुढील अतिदक्षता स्तरीय, आॅक्सीजनयुक्त ऊपचाराची सुवीधा असलेले कुठलेही ईस्पीतळ जवळपास ऊपलब्ध नाहीये अशातच अत्यावस्थ,रुग्न गर्भवती* *महिला,अपघातग्रस्त रुग्ण यांना उपचारासाठी रुग्णवाहीकेची सुध्दा कमतरता भासत आहेव आता संपुर्ण जगभरात मुत्युचे थैमान घालत असलेल्या कोरोनानेही दुसऱ्या लाटेच्या रुपात पुन्हा कहर केला,या सर्व बाबींचा ईतर मतदारसंघा प्रमाणे आमच्या भागाचा सहानुभूतीपुर्वक विचार कराल अशा मागणीचे निवेदन प्रत्यक्ष भेट घेऊन तुषार देशमुख यांनी हिंगोली लोकसभा क्षेत्राचे* *खासदार,हेमंत पाटील व राज्याचे आरोग्य मंत्री मा ना राजेशभैया टोपे   तसेच आरोग्य राज्यमंत्री ना राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कडे केली आहे शेवटी विनंती करताना सर्व बाबींचा गांभीर्यापुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्याल हाच आशावाद व्यक्त केलाय.

*विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्यच्या जिल्हाध्यक्ष पदी शंभू बापूराव सुर्यवंशी तर युवती जिल्हाध्यक्ष पदी पल्लवी हाके यांची सर्वानुमते निवड*

*विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्यच्या जिल्हाध्यक्ष पदी शंभू बापूराव सुर्यवंशी तर युवती जिल्हाध्यक्ष पदी पल्लवी हाके यांची सर्वानुमते निवड*
लातूर (जिल्हाप्रतिनिधी) :विद्यार्थी चळवळीतील सक्रिय विद्यार्थी प्रतिनिधी युवा व्याख्याते शंभू बापुराव सूर्यवंशी यांची विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या जिल्हाध्यक्ष पदी व महाराष्ट्रातील अनेक नामांकित वक्तृत्व वादविवाद स्पर्धेच्या विजेत्या, सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या युवा व्याख्यात्या कु.पल्लवी हाके यांची  समितीच्या लातूर जिल्हा युवती जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. विद्यार्थी चळवळीतील नेहमी त्यांचा सक्रिय सहभाग अणि फुले आंबेडकर यांच्या विचारधारेतुन प्रेरित असलेल्या विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यामातून महाराष्ट्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांचा न्याय व हक्कासाठी कार्य करावे अशी अपेक्षा विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष चेतन अरविंद पाटील यांनी व्यक्त केली.
समिती मजबूतीने उभी कराल व विद्यार्थी वर्गाला आपला अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडेल हीच अपेक्षा असे मत विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सचिव रामराजे तानाजीराव काळे यांनी व्यक्त केली.सदरील निवड ही आजपासून एका वर्षापर्यंत अधिकृत असणार आहे.
निवडीबद्दल सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Saturday, April 17, 2021

प्रा.बापूसाहेब घोटेकर यांचे दु:खद निधन..

प्रा.बापूसाहेब घोटेकर यांचे दु:खद निधन..
  उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी  महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. बापूसाहेब घोटेकर यांचे दिनांक 17 एप्रिल 2021रोजी पहाटे अल्पशा आजाराने नांदेड येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. प्रा. घोटेकर उदयगिरी परिवारातील एक मनमिळावू, सुस्वभावी व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाबद्दल  म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी  शोक व्यक्त केला आहे.

अ‍ॅड. रामचंद्र येरमे यांचे दु:खद निधन..

अ‍ॅड.रामचंद्र येरमे यांचे दु:खद निधन..
उदगीर : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव अ‍ॅड. रामचंद्र तुळशीराम येरमे यांनी औरंगाबाद येथे दिनांक 17 एप्रिल 2021रोजी शेवटचा श्वास घेतला. त्यांचे वयाच्या 88व्या वर्षी दु:खद निधन झाले . महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तथा कार्यकारणीतील सर्व संचालक व सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Thursday, April 15, 2021

*उदयगिरीतील प्राध्यापक डॉ.गंगाधर नामगवळी कालवश.*

उदयगिरीतील डॉ. गंगाधर नामगवळी कालवश.
 उदगीर : ( दिनांक 15 एप्रिल 2021 ) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. डॉ. गंगाधर नामगवळी यांचे अल्पशा आजाराने दिनांक 14 एप्रिल रोजी मनमाड, जिल्हा नाशिक येथे निधन झाले. मराठी साहित्यविश्वात त्यांनी अनमोल योगदान दिले होते याची दखल घेऊनच राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीवर त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी उदयगिरी महाविद्यालयात तब्बल 24 वर्षे सेवा दिली. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, प्रा. डॉ. बी. एम. संदीकर, प्रा. डॉ. हमीद अश्रफ, प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी, प्रा. ज्योतिबा कांदे यांनी शब्दसुमनांनी डॉ. नामगवळी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली.

Monday, April 12, 2021

प्रहार च्या शहर अध्यक्ष पदी रियाज शेख यांची निवड..

*प्रहार च्या शहर अध्यक्ष पदी रियाज शेख यांची निवड*
उदगीर:-वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख - मा.प्रमोदभाऊ कुदळे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष - बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष - राजाभाऊ चौगुले , जिल्हा उपाध्यक्ष - विनोद तेलंगे यांच्या आदेशानुसार, तालुकाध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर शहर अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते व गेली 2 वर्ष  प्रहारचे सक्रिय कार्यकर्ते रियाजोद्दीन मोईनोद्दीन शेख यांची निवड करण्यात आली
जिल्हा उपाध्यक्ष - विनोद तेलंगे ,उदगीर तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, तालुका उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे , जोहेब शेख यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..

Thursday, April 8, 2021

*आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राचे 'सेट' परीक्षेत घवघवीत यश..*

*आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राचे 'सेट' परीक्षेत घवघवीत यश..*
उदगीर : मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये 
उर्दू विषयाचे मोहम्मद अजमत उल हक,भूगोल विषयाचे श्रीकांत बेंबडे, इतिहास विषयाचे शिवसांब स्वामी,या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 
            आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राचे संचालक श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी उदगीर येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी लोकसहभागातून उभारलेल्या अभ्यासिकेचे विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यामुळे श्रीकांत जाधव कबनुरकर यांना आनंदाश्रू तरळले श्रीकांत जाधव यांनी पुढे बोलताना सांगितले की ही अभ्यासिका उभारण्यात ज्या दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले आहे त्या व्यक्तीमुळे गरीब घरातील तीन विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न साकार होत आहे भविष्यात देखील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात चमकतील असा विश्वास श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी व्यक्त केला.
         सेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी उदयगिरी महाविद्यालयाचे मुख्य ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार सर यांनी अथक परिश्रम घेतले त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या यशात डॉ. पेन्सलवार सर यांचा घारीचा वाटा आहे असे श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी सांगितले यापुढील काळात देखील डॉ.पेन्सलवार सर यांनी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रात येत राहीन अशी ग्वाही दिली..

Sunday, April 4, 2021

*प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी मध्ये महिलांचा प्रवेश.*

प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी मध्ये  महिलांचा प्रवेश..
उदगीर (प्रतिनिधी):-वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या कामाला प्रभावित होवुन निराधार महिला व वृद्ध अनाथ दिव्यांगा चे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक महिलांनी प्रहार महिला आघाडी मध्ये प्रवेश केला व लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले , जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या आदेशानुसार, तालुकाध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी तालुका संघटक पदी विजयमाला हारगे यांची निवड तर तालुका सरचिटणीस पदी उषा हारगे , तालुका चिटणीस पदी अरुणा फुलारी , विजयालक्ष्मी बिरादार यांची संघटक पदी तर शिलावती बिरादार यांची सह - संघटक पदी निवड करण्यात आले. तालुका अध्यक्षा - कांचन भोसगे , तालुका उपाध्यक्ष -विजमाला पवार, तालुका उपाध्यक्ष - सुजाता देवरे , तालुका संघटक - लता कोळी , तालुका सरचिटणीस कुमुदिनी पांचाळ ,
शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..

Friday, April 2, 2021

*शेती,माती आणि संस्कृतीशी नात असणारा आजेगाव सर्कल च उभरत नेतृत्व परमेश्वर इंगोले पाटील..*

*शेती,माती आणि संस्कृतीशी नात असणारा आजेगाव सर्कल च उभरत नेतृत्व परमेश्वर इंगोले पाटील..*

          हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव सर्कल तसे फार मोठे पण त्याचा पाहिजे तसा विकास आजपर्यंत झाला नाही पुढाऱ्यांच्या उदासीनतेमुळे येथील विकास फक्त कागदोपत्रीच पाहायला मिळाला शेती,शिक्षण, आरोग्य अश्या सर्वच क्षेत्रात जिल्ह्यात कायम पिछाडीवर असलेला आजेगाव सर्कल सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे चांगलेच चर्चेत आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपल्यामुळे आता परमेश्वर इंगोले पाटलांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत परमेश्वर इंगोले पाटील हा युवक जवळा बुद्रुक या गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील युवक आहे पण कॉलेजवयीन जीवनात डी.एड बी.एड च्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकभरतीच्या आग्रही मागणीमुळे अनेक मोठमोठ्या आंदोलनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची नजर या युवा कार्यकर्त्याकडे पडली व साहेबांनी यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून त्यांना युवक आघाडीचे प्रदेश सचिव केले एका सामान्य घरातील युवकाला त्याच्या नेतृत्वगुनामुळे चक्क प्रदेश पातळीवर नेतृत्व करण्याची संधी साहेबांनी दिल्यामुळे आजेगाव सर्कल मधील तरुण युवकांनी या युवकाला आता हिंगोली जिल्हा परिषदेत आमचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचा जणू काही निर्धारच केला आहे व त्यासाठी गेली एक ते दिड वर्षापासून परमेश्वर इंगोले पाटील व त्यांचा मित्रपरिवार नागरिकांच्या अडीअडचणीत मदत करत आहेत एवढंच नसून आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोणत्याही खर्चाविना युवकांना निवडून आणून एका महिलेच्या हातात गावचा कारभार सोपवून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे.
          आजेगाव सर्कल मधील देवकरवाडी चांगेफळ, आजेगाव, जवळा बु,धनगरवाडी, शिवणी बु,शिंदेफळ, वाघजाळी,देऊळगाव जहांगीर,शिवणी खु,बेलखेडा,पळशी येथील विविध विकासात्मक कामाच्या मागणिसंदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला आहे आणि ही सर्व विकासात्मक कामे मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात सत्ता असल्यामुळे परमेश्वर इंगोले पाटलांना सर्व विकासात्मक कामे करण्यासाठी शासन स्तरावर आज कोणतेही वैधानिक पद नसतेवेळी पक्षाने पाठिंबा दिला आहे जर येणाऱ्या काळात नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परमेश्वर इंगोले पाटील यांना जिल्हा परिषदेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले तर आजेगाव सर्कल चा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा सर्कल मधील अनेक गावांच्या सुशिक्षित नागरिकांच्या तोंडातून ऐकण्यास येत आहे.कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल परमेश्वर इंगोले पाटील यांनी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केल्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये देखील त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा ऐकण्यास मिळत आहे ज्या ठिकाणी पदावर असणाऱ्या पुढाऱ्यांनी सन्मान करायला पाहिजे पण त्यांनी तर साधी विचारपूस देखील केली नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्ग देखील असा लोकप्रतिनिधी सर्कल ला मिळाला तर सोबत काम करण्यास एकप्रकारे ऊर्जा मिळेल असे खाजगीत बोलताना पाहायला मिळत आहे.शेतकरी,युवक,महिला,अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या वाढत्या पाठिंब्यामुळे परमेश्वर इंगोले पाटील येणाऱ्या काळात हिंगोली जिल्हा परिषदेत आजेगाव सर्कल चे नेतृत्व करतील यात तिळमात्र शंका नाही..

Sunday, March 28, 2021

सिरशी येथे मासिक पाळी विषयी कार्यक्रम संपन्न.

सिरशी येथे मासिक पाळी विषयी कार्यक्रम संपन्न.
वार्ताहर:-लातुर तालुक्यातील सिरशी गावात मासिक पाळी विषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.सुषमा कोकाटे यांनी उपस्थित महिला व मुलींना मासिक पाळी बद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन करून मासिक पाळीचे चक्र, सकस आहार, पाळीत वापरावयाचे शोषक साहित्य, सॅनिटरी पॅड वापरण्याची पद्धत, पॅडची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल सखोल माहिती दिली. त्यानंतर आश्विन कंजे यांनी ज्या मासिक पाळीमुळे आपल्या सर्वांचा जन्म होतो ती पाळी अपवित्र असु शकत  नाही व मासिक पाळी ही नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे त्याचा देवाशी,धर्माशी,पवित्रतेशी कसलाही संबंध नाही हे सांगून वयात येताना होणारे भावनिक बदल,निर्माण होणारी शारिरीक आव्हाने, पाळीच्या त्रासावर उपाय, पाळीत घ्यावयाचा आहार याविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास सरपंच कौशल्या कांबळे, आशा स्वयंसेविका सुमन जाधव, सिआरपी अभिषक्ता कदम, सुमित्रा डोरले, गीता जाधव, सुमन शेळके,प्रिया शिंदे,शुभांगी जाधव, प्रिती शिंदे आदी उपस्थित होत्या.या कार्यक्रमानंतर मासिक पाळी बद्दल शास्त्रशुद्ध माहिती व पाळी बद्दल शास्त्रीय दृष्टीकोन तयार करण्यासाठी पुरक अशा शर्वरी-सचिन लिखित "प-पाळीचा"या किशोरी आरोग्य पुस्तिकेचे सर्व महिला व मुलींना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी कांबळे केले तर आभार पवन कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वा.रा.ती.म.विद्यापीठ उपकेंद्र लातुर चे विद्यार्थी आश्विन कंजे, संभाजी कांबळे, सुषमा कोकाटे व पवन कांबळे यांनी प्रयत्न केले.

Thursday, March 18, 2021

*प्रहार जनशक्ती पक्षाच्या लातूर जिल्हाउपाध्यक्षपदी विनोद तेलंगे..*

*प्रहार जनशक्ती पक्षाच्या लातूर जिल्हाउपाध्यक्षपदी विनोद तेलंगे..*
उदगिर (प्रतिनिधी):- उदगीर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे यांच्या कामाची दखल घेउन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, तथा राज्यमंञी बच्चुभाऊ कडु स यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोदभाऊ कुदळे , महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ यांच्या  मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या लातूर जिल्हाउपाध्यक्षपदी  निवड करणात आली आहे.
विनोद तेलंगे दोन वर्षोंपासुन प्रहार जनशक्ती पक्षाचे 
तालुका अध्यक्ष पदावर काम करत असताना उदगीर शहरात व तालुकायात प्रहार जनशक्ती पक्षाचे गाव तिथे शाखा ,शाखा तिथं कार्यकर्ते करत पक्षाची ताकद वाढविन्याचे  प्रयत्नं केले.त्याचबरोबर प्रहार च्या माध्यमातून सर्व सामन्याचे , शेतकरी, कष्टकरी,दिनदुबळ्याचे व अपंग बांधवांच्या समस्या साठी पुढाकार घेऊन न्याय देण्यासाठी प्रयन्त  करत असतात.
कमी काळत  प्रशासन वचक निर्माण केली आहे.या सर्व कामाची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष लातुर उपजिल्हाप्रमुख पदी यांची निवड लातुर जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले यांनी केली.वउदगीर ,जळकोट व देवणी या तीन तालुक्याची  जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.सदरील नियुक्तीपत्र लातूर येथील बैठीकीत देण्यात आले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय भोज, सातपुते मामा, बाळू आमले, मोसीन शेख संदीप पवार , महादेव आपटे, महादेव मोतीपवळे ,रविकिरण बेळकुंदे , व पदाधिकारी व प्रहारसेवक उपस्थित होते.निवडीबदल विनोद तेलंगे सर्वत्र्  अभिनंदन होत आहे.

*प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर तालुका अध्यक्ष पदी रविकिरण बेळकुंदे यांची निवड...*

*प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर तालुका अध्यक्ष पदी रविकिरण बेळकुंदे यांची निवड...*

उदगिर(प्रतिनिधी):-वंदनीय राज्यमंञी बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोदभाऊ कुदळे , महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ, लातूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या  मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाऊ तेलंगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 17/03/2021 रोजी प्रहार च्या माध्यमातून सर्व सामन्याचे , शेतकरी, कष्टकरी,दिनदुबळे, आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांनाची व अपंग बांधवांच्या समस्या साठी पुढाकार घेऊन न्याय देण्यासाठी प्रयन्त करणारे रविकिरण बेळकुंदे यांची प्रहार जनशक्ती पक्ष उदगीरच्या तालुकाध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली ...
यावेळी तालुका सह -संपर्क प्रमुख सुनील केंद्रे, तालुका सचिव - महादेव आपटे, तालुका उपाध्यक्ष-संदीप पवार , तालुका उपाध्यक्ष - महादेव मोतीपवळे, तालुका संघटक - सूर्यभान चिखले ,तालुका सरचिटणीस अविनाश शिंदे , तालुका सरचिटणीस सुदर्शन सूर्यवंशी , नळगीर सर्कल प्रमुख विलास भंडे, शहर संपर्क प्रमुख - चंद्रकांत भोसगे , शहर कार्याध्यक्ष - गणेश दावणे, शहर सह-सचिव बालाजी बिरादार ,शहर सचिव - चरणसिंह चौहान, तालुका चिटणीस - रवी आदेप्पा ,तालुका प्रसिद्धी प्रमुख अभय कुलकर्णी, महिला तालुका अध्यक्षा- कांचन भोसगे , तालुका कार्याध्यक्ष -शकुंतला रोडेवाड, तालुका सरचिटणीस -प्रेमलता भंडे,तालुका सरचिटणीस - जयश्री चव्हाण , तालुका संघटक- लता कोळी इतर पदाधिकारी व प्रहारसेवक उपस्थित राहुन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...

Tuesday, March 9, 2021

उदगीर मतदारसंघातील विकास कामासाठी अर्थसंकल्पात 74 कोटीची मंजूरी - राज्यमंत्री सजंय बनसोडे

उदगीर मतदारसंघातील विकास कामासाठी अर्थसंकल्पात  74 कोटीची मंजूरी
                       - राज्यमंत्री सजंय बनसोडे 
 लातूर दि.9(जिमाका):-जिलह्यातील उदगीर-जळकोट मतदारसंघातील विकास कामासाठी राज्य शासनाने सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात सुमारे 74 कोटीची अर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे.यामध्ये उदगीर बनशेळकी उड्डानपुल, शिरुर ताजबंद ते उदगीर रस्ता व अन्य कामाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
              सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील राज्याचा अर्थसंकल्प आज विधानभवनात सादर करण्यात आला.  या अर्थसंकल्पात उदगीर मतदार संघाच्या विकासाला शासनाने भरीव अशी अर्थिक तरतुद केली आहे.  उदगीर येथील बनशेळकी उड्डानपुलासाठी ३५ कोटी   उदगीर शिरुर ताजबंद रस्ता २२ कोटी  बांधकाम विभागाचे कार्यालय बांधकामास ६.७५ कोटी, वाढवणा गुडसुर अतनुर रस्ता ३. ०५ कोटी, कुमठा भाकसखेडा पोचमार्गासह पुलाचे बांधकाम या साठी सुमारे ९ .५० कोटीची तरतुद करण्यात आली आहे. 
मतदार संघातील विविध विकास कामासाठी 74 कोटीची तरतुदीस या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

*प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी च्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न..*

*प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी  च्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न..*
उदगीर प्रतिनिधी:- दिनांक 8/03/2021 रोजी जागतिक महिला दिनानिमित्य प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी उदगीर च्या वतीने , आदर्श महिला आणि कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून ड्युटी उत्कृष्टरित्या पार पाडलेले पोलीस , डॉक्टर , वकील, अंगणवाडी सेविका , यांचा आदर्श महिला आणि कोरोना योद्धा म्हणून प्रहार महिला आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला . 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रहार संहसंपर्क प्रमुख श्री .सुनील केंद्रे , प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुप्रिया जगताप मॅडम, सौ.संगीता बोडके,सो. हाके मॅडम ,अंगणवाडी सुपरवायझर - संगीता हुलसुरकर मॅडम , निडेबन अंगणवाडी सेविका - चंचला हुगे , सोमनापूर अंगणवाडी सेविका -  रंजना शिंदे,  संगीता तोंडारे , सुनीता राठोड ,आदर्श महिला म्हणून प्रेमलता भंडे , सारिका मोतीपवळे ,ज्योती दावणे ,अँडव्हेकेट वर्षा कांबळे मँडम . यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्र संचलन :  रोडेवाड शकुंतला प्रास्ताविक : विजयमाला पवार  आभार : शकुंतला रोडेवाड  संभाषण :  सुजाता देवरे ,लता कोळी यांनी केले ...
महिला अध्यक्ष - कांचन भोसगे तालुका उपाध्यक्ष - विजयमला पवार ता.उपाध्यक्ष - सुजाता देवरे , तालुका सचिव - रचना हल्लाळे, तालुका कार्याध्यक्ष - शकुंतला रोडेवाड, तालुका संघटक - लता कोळी , तालुका सरचिटणीस - प्रेमलता भंडे ,तालुका सरचिटणीस - जयश्री चव्हाण ,तालुका चिटणीस -  विजयमला मठपती , तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे , तालुका उपाध्यक्ष - संदीप पवार , शहर संपर्क प्रमुख - चंद्रकांत भोसगे , तालुका उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे , तालुका प्रसिद्धी प्रमुख - अभय कुलकर्णी , शहर सह - सचिव - बालाजी बिरादार , तालुका चिटणीस - रवी आदेप्पा .कार्यक्रमास अनेक महिला मंडळ उपस्थित होते ....

Monday, March 8, 2021

*पायाभूत विकासाबरोबर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विकास साधणारा अर्थसंकल्प* -राज्यमंत्री संजय बनसोडे *हा अर्थसंकल्प म्हणजे प्रादेशिक समतोल साधून विकासाला चालना देणारा आहे*

*पायाभूत विकासाबरोबर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विकास साधणारा अर्थसंकल्प* 
        -राज्यमंत्री संजय बनसोडे    

*हा अर्थसंकल्प म्हणजे प्रादेशिक समतोल साधून विकासाला चालना देणारा आहे*


मुंबई, दि.8:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासाठी भरीवआर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात दहा हजार किमी रस्त्याचे कामे आगामी काळात करण्यात येणार आहेत. तसेच या सोबत समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय व आदिवासी विभागातील  विविध योजनांसाठी   तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. 
     सन 2021 -22 चा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला या अर्थसंकल्पातुन शेतकरी, कष्टकरी सामान्य नागरिकांना यांना दिलासा मिळणार आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने  तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या सौर ऊर्जा जोडणी साठी पंधराशे कोटी महावितरण कंपनीला देण्यात ची तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प प्रादेशिक समतोल व  विकासाला चालना देणारा असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.
      मराठवाड्याच्या पायाभूत विकासासाठी या अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग आणि नासिक-मुबई मार्गावर मेगा इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधांसाठी सात हजार पाच कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  सामाजिक न्याय विभागा मार्फत  राबविण्यात येणाऱ्या विविध मंडळाना यात बार्टी, सारथी यांना 150 कोटीची तरतूद करण्यात आली. सामाजिक न्यायच्या भुमिकेतून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे संसदीय कार्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
              ******

Monday, February 22, 2021

*संतोष जाधव मित्रपरिवाराच्या वतीने शिवजयंती चे औचित्य साधून रुग्णांना फळवाटप..*

*संतोष जाधव मित्रपरिवाराच्या वतीने शिवजयंती चे औचित्य साधून रुग्णांना फळवाटप..*


उदगीर:-उदगीर येथील संतोष जाधव मित्रपरिवाराच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयात फळवाटप करण्यात आले याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.दत्तात्रय पवार,लायन्स नेत्र रुग्णालयाचे डॉ.पाटील,डॉ.जमादार यांच्या उपस्थितीत गोरगरीब रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
         यावेळी संतोष जाधव मित्रमंडळाचे योगेश जाधव,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव गणेश काकडे,इप्तेहार शेख,रवी भद्रे,परमेश्वर जाधव,तुकाराम सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Friday, February 19, 2021

*प्रशासन BVS फौंडेशन ची चूक लपवण्याचे प्रयत्न करतेय का?**विद्यार्थी प्रतिनिधी गुंडेराव जळकोटे यांचा प्रश्न...*

*प्रशासन BVS फौंडेशन ची चूक लपवण्याचे प्रयत्न करतेय का?*

*विद्यार्थी प्रतिनिधी गुंडेराव जळकोटे यांचा प्रश्न...*
नांदेड:-महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान द्वारे DDU-GKY अंतर्गत BVS फौंडेशन लातूर,परभणी,नांदेड युवक व युवतीना MLT मेडिकल लॅबोरेटी टेक्निशियन कोर्सच्या प्रशिक्षणासाठी नांदेड येथे आले होते परंतु corona महामारी मुळे हा कोर्सेस बंद पडला . अनेक जिल्हा मध्ये प्रशिक्षण केंद्र उघडे झाली आहेत मात्र नांदेड येथील प्रशिक्षण केंद्र अद्याप उघडे झाले नाही . अनेक युवाचे भविष्य टांगणीला लागले आहे .विद्यार्थी MSRLM Head ऑफिस मुंबई च्या फोन मार्फत पाठपुरावा केला मात्र त्याकडून विद्यार्थी न्याय मिळवून न देता BVS फौंडेशन ची चूक लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.अनेक विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी तीन जिल्ह्यातील 9 विविध तालुक्यात निवेदन देऊन कोठेच विद्यार्थ्यांना दिलासा मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरत आहे. प्रशासनाच्या अश्या वागण्यामुळे कुठेतरी BVS फौंडेशन व प्रशासनाची मिलीभगत आहे का काय असा प्रश्न विद्यार्थी प्रतिनिधी गुंडेराव जळकोटे व विद्यार्थ्यांना पडला आहे..

*उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून अभिवादन*

*उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून अभिवादन*


लातूर, दि.19(जिमाका):- उदगीर येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पर्यावरण, संसदीय कार्य, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार आपण करून अभिवादन केले.
     यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजन्मोत्सव उदगीरच्या वतीने तुळजापूर ते उदगीरचे स्वागत राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मशाल चे स्वागत करण्यात आले. तसेच बाळ शिवाजी  पाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, चंदन पाटील नागराळकर,
 कल्याण पाटील, , सिघ्देश्वर पाटील यांच्यासह  शिवभक्त उपस्थित होते.
                   *******

*उदगीर शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी* *सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करू या!* *-राज्यमंत्री संजय बनसोडे*

*उदगीर शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी*  
*सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करू या!*
                   *-राज्यमंत्री संजय बनसोडे*


*उदगीरमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूच्या प्रदर्शनाचे राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 

*उदगीर शहराचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नगर परिषेदेकडून राज्यमंत्री बनसोडे यांचा सत्कार*


लातूर/उदगीर, दि.(जिमाका):- उदगीर शहर व तालुक्यात सर्व आवश्यक पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे व तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू या, असे आवाहन संसदीय कार्य, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
      दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या माध्यमातून सुरु असलेल्या शहरी बेघर निवारा बांधव व आधार बहुविकलांग बांधव यांच्या माध्यमातून सलात अल्पसंख्यांक बहुद्देशीय सेवाभावी संस्था रोटी कपडा बँकेने टाकावू वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्यांचे भव्य प्रदर्शन नगर परिषेदेच्या प्रांगणामध्ये आयोजित केले असून त्याचे उदघाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. 
     यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेटी, तहसिलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी भारत राठोड, उपमुख्याधिकारी असिफखान गोलंदाज, शहर अभियंता सल्लाओद्दिन काझी, नागनाथ निडवदे,चंदन पाटील नागराळकर,
सभापती मनोज पुदाले, सावन पस्तापुरे, न.प.सदस्य दत्ता पाटील व बचत गटाच्या महिला व नागरिक  उपस्थित होते.
    राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, उदगीर शहराचा पर्यायाने तालुक्याचा विकास हा सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. उदगीर शहरामधील नाट्यगृह, शादीखाना, अभ्यासिका व लिंगायत भवन चा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. तर दलित वस्ती साठी अपेक्षित निधी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) वसाहत, शहरातून जाणारा  द्रुतगती मार्गाचा, बस स्थानकाचा, हत्तीबेटचा विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
     महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी अभियान म्हणून सुरु करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी नगर परिषदेत गतीने सुरू असून त्यातून पर्यावरण रक्षण व संवर्धन करणे, शहर प्रदूषण मुक्त करणे त्यासाठी सायकल रॅली, कार्यालयांमध्ये एक दिवस पेट्रोल-डिझेलचे वाहने न आणने, एक दिवस सायकलने प्रवास करणे आदी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असून यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.
   माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून आयोजित केलेल्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूच्या प्रदर्शन व विक्रीचा नगर परिषदेने घेतलेला हा उपक्रम अत्यंत चांगला असून या उपक्रमासाठी शासनाकडून जे सहकार्य आवश्यक असेल ते सर्व सहकार्य करण्यात येईल. हा उपक्रम सर्वांसाठी आदर्शवत उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले.
     जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे यांनी उदगीरच्या विकासाकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगून यापूर्वी शहराच्या हद्दवाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये जिल्हा परिषदेचा महत्वाचा सहभाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
     यावेळी उदगीर नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे  यांचा नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व उपाध्यक्ष सुधीर भोसले यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. 
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी करून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले तर आभार गौस शेख यांनी मानले.
         **********

Tuesday, February 16, 2021

*जवळा बुद्रुक ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ.शारदा इंगोले तर उपसरपंच पदी संजय हनवते यांची निवड..*

*जवळा बुद्रुक ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ.शारदा इंगोले तर उपसरपंच पदी संजय हनवते यांची निवड..*
वार्ताहर:-हिंगोली जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे जवळा बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच पदी सौ शारदा शिवाजी इंगोले व उपसरपंच पदी श्री संजय दत्ता हनवते  यांची निवड सर्व नवनियुक्त सदस्यांच्या पाठिंब्याने व गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.              जवळा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशिक्षित उमेदवार सौ शारदा शिवाजी इंगोले यांच्या निवडीने नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे जवळा बुद्रुक गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी,महिलांना सक्षम करण्यासाठी  कटिबद्ध असल्याची भूमिका नवनियुक्त सरपंच शारदा इंगोले यांनी व्यक्त केली आहे ....

Monday, February 15, 2021

*जवळा बुद्रुक ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ.शारदा इंगोले तर उपसरपंच पदी संजय हनवते यांची निवड..*

*जवळा बुद्रुक ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ.शारदा इंगोले तर उपसरपंच पदी संजय हनवते यांची निवड..*
हिंगोली:-हिंगोली जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे जवळा बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच पदी सौ शारदा शिवाजी इंगोले व उपसरपंच पदी श्री संजय दत्ता हनवते  यांची निवड सर्व नवनियुक्त सदस्यांच्या पाठिंब्याने व गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.                 जवळा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशिक्षित उमेदवार सौ शारदा शिवाजी इंगोले यांच्या निवडीने नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे जवळा बुद्रुक गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी,महिलांना सक्षम करण्यासाठी  कटिबद्ध असल्याची भूमिका नवनियुक्त सरपंच शारदा इंगोले यांनी व्यक्त केली आहे ....
           याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील सह गावातील अन्य नागरिक उपस्थित होते.

*हंडरगुळी येथे प्रहार जनशक्ती पक्ष शाखेचे उदघाटन*.

*हंडरगुळी येथे प्रहार जनशक्ती पक्ष शाखेचे उदघाटन*.
उदगीर:-वंदनीय ना राज्यमंत्री.बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बलूभाऊ जंवजाळ व लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली..
प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे शाखेचे उदघाटन तालुका संघटक सूर्यभान मामा चिखले  यांच्या हस्ते हंडगुळी शाखेचे उदघाटन करण्यात आले .शाखाध्यक्ष - मोहनराव माने, शाखा उपाध्यक्ष-बालाजी भोसले, सरचिटणीस- आनलदास,सचिव - उद्धव कांबळे, सह सचिव - आनंद भोईनवाड , चिटणीस - आलमोद्दीन शेख ,महिला शाखा अध्यक्ष - अनुसया सबनवाड , महिला शाखा उपाध्यक्ष - चंद्रकला पेंढारकर , महिला सरचिटणीस - सरस्वती पोपलाइत , या वेळी प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे  तालुका कार्याध्यक्ष  - रविकिरण बेळकुंदे ,ता. उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे,ता.उपाध्यक्ष संदीप पवार ,ता.सचिव - महादेव आपटे, ता.सहसंपर्क प्रमुख- सुनील केंद्रे,  ता.सरचिटणीस अविनाश शिंदे , ता.कोषध्यक्ष- अंगद मुळे , ता.सह सचिव - संगम वडले,ता.चिटणीस -गोपाळ नवरखेले ,ता. चिटणीस- रवी आदेप्पा ,ता.चिटणीस- नीलकंठ मुधोळकर , शहर संपर्क प्रमुख - चंद्रकांत भोसगे, शहर कार्याध्यक्ष - गणेश दावणे, शहर संघटक -प्रदीप पत्की , शहर सचिव -चोहान चरणसिंह शाखा सदस्य झोले निवृत्ती , गोविंद मोरतोळे , तुकाराम बनसोडे ,ताजुद्दीन शेख ,माधव चिघळे , हंडरगुळी येथील सर्व नागरिक व मान्यवर उपस्थित होते.....

Saturday, February 6, 2021

*पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबाद विभागाची आढावा बैठक*

*पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबाद विभागाची आढावा बैठक*
औरंगाबाद :-राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे  यांनी औरंगाबाद येथे प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबाद विभागाची आढावा बैठक घेतली  यावेळी यावेळी राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा  अभियानाची मराठवाड्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले 

या बैठकीस औरंगाबाद विभागाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉक्टर पी. एम. जोशी , उपप्रादेशिक अधिकारी  प्र. द .वानखेडे, क्षेत्र अधिकारी सीमा माडगूळकर, श्री हेमंत कुलकर्णी, इत्यादी उपस्थित होते

यावेळी राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते माझी वसुंधरा  अभियानांतर्गत औरंगाबाद महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले

Saturday, January 30, 2021

उदयगिरी महाविद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन..

उदयगिरी महाविद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन..
उदगीर : ( दिनांक 30 जानेवारी 2021) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून हुतात्मा दिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्या देशभक्तांना दोन मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के , डॉ. मल्लेश झुंगास्वामी, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. आर. पी. साबदे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. बी. एस. होकरणे, दिनविशेष समितीचे डॉ. गौरव जेवळीकर यांची उपस्थिती होती. महाविद्यालयातील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Tuesday, January 26, 2021

*उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*

*उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*

लातूर/उदगीर, दि.26(जिमाका):- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त उदगीर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
      यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण  मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे , उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भरत राठोड, पोलीस निरीक्षक नारायण उबाळे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार गोविंद केंद्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांना परेड संचलन करण्यास परवानगी दिली. उदगीर तालुक्यातील सैनिकी शाळा, गृहरक्षक दल, पोलिस दल यांनी संचलनात सहभाग घेतला. त्यानंतर राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात तीन वर्षे सेवा बजावल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील व पोलीस उपनिरीक्षक पल्लेवाड यांचा सत्कार ही राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
       त्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ध्वजारोहणाच्या शासकीय कार्यक्रमास उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार यांची भेट घेऊन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अनिता येेेलमेटे यांनी केले तर आभार नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी मानले.
               ********